ETV Bharat / politics

विधान परिषद निवडणुकीपूर्वी महाविकास आघाडीत झाला असता भूकंप; अनेक खुलासे आले समोर - Maha Vikas Aghadi Vidhan Parishad - MAHA VIKAS AGHADI VIDHAN PARISHAD

Uddhav Thackeray : विधान परिषद निवडणुकीत (Vidhan Parishad Election) काँग्रेसच्या आमदारांनी क्रॉस व्होटिंग केल्याचं निष्पन्न झालं असून त्यांच्यावर कारवाई करण्याचे संकेत काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी दिले आहेत. तर दुसरीकडं विधान परिषद निवडणुकीत शरद पवार पुरस्कृत शेकापचे उमेदवार जयंत पाटील (Jayant Patil) यांचा पराभव झाल्यानंतर आता अनेक राजकीय गोष्टींचा उलगडा होत असून याबाबत आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत. या निवडणुकीदरम्यान नेमकं काय घडलं? त्या एकेक बाबी आता समोर येत आहेत.

Uddhav Thackeray  Sharad Pawar  Jayant Patil
उद्धव ठाकरे, शरद पवार, जयंत पाटील (ETV Bharat File Photo)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 15, 2024, 4:58 PM IST

मुंबई Uddhav Thackeray : विधान परिषद निवडणुकीत (Vidhan Parishad Election) उद्धव ठाकरे गटाने मिलिंद नार्वेकर (Milind Narvekar) यांच्या नावाने बारावा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवला आणि याच कारणाने शेकापचे जयंत पाटील (Jayant Patil) फार नाराज झाले. ही निवडणूक बिनविरोध होण्यासाठी शरद पवार यांनीही प्रयत्न केले होते. परंतु मिलिंद नार्वेकर यांना उद्धव ठाकरे यांनी निवडणुकीच्या रिंगणात उतरवल्यानं जयंत पाटील यांच्यासाठी ती धोक्याची घंटा होती. अशात शरद पवार यांनी जयंत पाटील यांना पूर्ण पाठिंबा दिला असला तरी, उद्धव ठाकरे यांचा जयंत पाटील यांच्या उमेदवारीला विरोध होता, अशी चर्चा आता समोर आलीय.

उद्धव ठाकरेंनी पवारांचा फोन घेतला नाही? : लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार अनंत गीते यांच्या विरोधात जयंत पाटील यांनी प्रचार केल्याचा उद्धव ठाकरे यांना संशय आहे. म्हणून त्यांनी जयंत पाटील यांच्या उमेदवारीस विरोध केला होता. इतकंच नाही तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी विधान परिषद निवडणुकीच्या मतदानाच्या आदल्या दिवशी उद्धव ठाकरे यांच्याशी संपर्क साधण्यासाठी अनेक वेळा फोन केले होते. परंतु उद्धव ठाकरे यांनी त्या फोनला उत्तर दिलं नाही अशी सुद्धा माहिती समोर येत आहे.

काँग्रेसच्या कुठल्या आमदाराने पाठिंबा द्यायचा यावरून वाद : मिलिंद नार्वेकर यांच्या विजयासाठी काँग्रेसकडून ज्या आमदारांचा पाठिंबा भेटण्याचा प्रस्ताव उद्धव ठाकरे यांना देण्यात आला होता. त्यामध्ये हिरामण खोसकर, मोहनराव हंबर्डे, सुलभा खोडके, शिरीष चौधरी आणि कुणाल पाटील या काँग्रेसच्या आमदारांच्या नावांचा समावेश होता. परंतु या आमदारांची मतं फुटतील अशी भीती उद्धव ठाकरे यांना होती. तर दुसरीकडं उद्धव ठाकरे यांचे उमेदवार मिलिंद नार्वेकर यांना पाठिंबा द्यायचा की, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार गट पुरस्कृत तसेच शेकापचे नेते जयंत पाटील यांना पाठिंबा द्यायचा यावरून काँग्रेसमध्ये सुद्धा दोन गट पडले होते. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, पृथ्वीराज चव्हाण यांनी उद्धव ठाकरे यांचे उमेदवार मिलिंद नार्वेकर यांना पाठिंबा देण्याची तयारी दर्शवली होती. तर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार हे शेकाप उमेदवार जयंत पाटलांच्या बाजूने मत देण्याच्या भूमिकेत होते. यामुळं मिलिंद नार्वेकर यांच्या उमेदवारीला धोका निर्माण झाला होता.

अपमानास्पद केली टिपणी : विधान परिषद निवडणुकीच्या आदल्या दिवशी रात्री मुंबईतील हॉटेल इंटर कॉन्टिनेन्टल मध्ये काँग्रेसचे प्रभारी रमेश चेनिथला आणि उद्धव ठाकरे यांच्यात बैठक झाली. या बैठकीत जयंत पाटील यांचे पुत्र तसेच पुतणे निनाद पाटील बैठकीत घुसले. निनाद पाटील यांनी ठाकरे गटाचे खासदार अनिल देसाई यांच्या विरोधात अपमानास्पद टिपणी केली. ठाकरे सेना त्यांचे काका जयंत पाटील यांच्या विरोधात या निवडणुकीत कट रचत असल्याचा आरोप सुद्धा त्यांनी केला. यावरून या बैठकीत तीव्र संघर्ष बघायला भेटला.

नार्वेकरांसाठी काँग्रेसचा कोटा मजबूत करण्यात आला : महाविकास आघाडी निवडणुकीवरून निर्माण झालेला संघर्ष शिगेला पोहोचला होता. अखेर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, के सी पाडवी, सुरेश वरपूडकर, शिरीष चौधरी, मोहनराव हंबर्डे, हिरामण खोसकर आणि सहसराम कोरोटे हे सात जण उद्धव ठाकरे गटाचे मिलिंद नार्वेकर यांच्या समर्थनार्थ मत देतील असा प्रस्ताव अंतिम करण्यात आला. परंतु इतके होऊन सुद्धा ठाकरे गटाचे मिलिंद नार्वेकर यांना पहिल्या पसंतीची 22 मतं मिळाली आणि 23 मतांचा कोटा पूर्ण करण्यासाठी त्यांना शेवटपर्यंत झगडावे लागले. काँग्रेसच्या दुसऱ्या पसंतीच्या मतांवर त्यांचा विजय झाला आणि शेकापचे जयंत पाटील यांचा पराभव झाला. जयंत पाटील यांचा झालेला पराभव हा शरद पवार यांच्यासह काँग्रेसच्याही जिव्हारी लागला असून महाविकास आघाडीतील ही धुसफूस लवकर संपणारी नाही आहे.

हेही वाचा -

  1. "बेसावध राहिलो, पण..."; विधानपरिषद निवडणुकीत पराभवानंतर जयंत पाटीलांनी व्यक्त केली खंत - MLC Election Results 2024
  2. महाविकास आघाडीत बिघाडीची शक्यता : वर्धा जिल्ह्यात राजकीय समीकरण बदललं, 'या' पक्षानं केला दावा - Mahavikas Aghadi
  3. विधान परिषद निवडणुकीसाठी अपक्ष, छोट्या घटक पक्षांची मागणी वाढली; 'ही' मतं ठरणार किंगमेकर - MLC Election

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.