ETV Bharat / politics

मुख्यमंत्र्यांनी फोनद्वारे प्रचार सभेला केलं संबोधित; पाहा व्हिडिओ - MAHARASHTRA ASSEMBLY ELECTION 2024

विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा आजचा शेवटचा दिवस असल्यानं सगळ्याच पक्षांमध्ये प्रचारघाई सुरू आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मतदारांशी फोनवरून संवाद साधला.

CM Eknath Shinde Call
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे फोन कॉल (File Photo)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 18, 2024, 4:28 PM IST

कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं राज्यभरात प्रचाराचा चांगलाच धुराळा उडाला आहे. अनेक दिग्गज नेते प्रचारासाठी वेगवेगळी शक्कल लढवत असून, कोल्हापुरातील शिरोळ मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या प्रचारसभेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट फोनवरून हजेरी लावत मतदारांना संबोधित केलं. महायुतीचे उमेदवार यड्रावकर यांना मताधिक्य देण्याची विनंती त्यांनी मतदारांना केली. तर मुख्यमंत्र्यांचा मतदारांशी संवाद साधतानाचा व्हिडिओ सध्या समाज माध्यमांवर व्हायरल होत आहे.

मतदारांशी फोनद्वारे साधला संवाद : कोल्हापुरातील शिरोळ विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या प्रचारासाठी जयसिंगपूर येथे जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. पक्षाच्या उमेदवारांसाठी खुद्द मुख्यमंत्री राज्यभरात दौरे करत आहेत. शिरोळ विधानसभेत काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांची सभा झाली होती. मात्र, विधानसभेचा प्रचार अंतिम टप्प्यात आल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे यड्रावकर यांच्यासाठी कोल्हापुरात पोहोचू शकले नाहीत. मात्र, आपला उमेदवार निवडून यावा यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर सभेसाठी जमलेल्या मतदारांना फोनवरून आवाहन केलं.

फोनवरून मतदारांशी संवाद साधताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (ETV Bharat Reporter)

खंबीरपणे उभा : "राजेंद्र पाटील यड्रावकर यांना इतकं मताधिक्य द्या की, विरोधकांचं डिपॉझिट जप्त झालं पाहिजे. शिरोळ तालुक्याच्या सर्वांगीण विकासाची चिंता इथल्या जनतेने करू नये, त्यासाठी मी खंबीर आहे. तुम्ही फक्त राजेंद्र पाटील यड्रावकर यांना निवडून द्या, मुख्यमंत्री म्हणून मी त्यांच्या मागे खंबीरपणे उभा राहतो," असा आश्वासन फोनवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मतदारांना दिलं.

अशी आहेत शिरोळ विधानसभेची गणितं : शिरोळ विधानसभा मतदारसंघात राजेंद्र पाटील यड्रावकर हे शिट्टी चिन्हावर लढत आहेत. दोनवेळा शिरोळ विधानसभेची जागा राखत एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून तर, एकदा अपक्ष निवडणूक जिंकणारे यड्रावकर तिसऱ्यांदा विधानसभेला सामोरे जात आहेत. त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीचे उमेदवार गणपतराव पाटील तर तिसऱ्या आघाडीतून शिरोळचे माजी आमदार उल्हास पाटील रिंगणात आहेत. उल्हास पाटील यांना राजू शेट्टींची साथ आहे. मात्र, जातीय समीकरणं जुळल्यास यड्रावकर हॅट्रिक करू शकतात. स्वाभिमानी शेतकरी संघटनेत पडलेली फूट उल्हास पाटील यांची डोकेदुखी वाढवू शकते. तर महाविकास आघाडीचे उमेदवार गणपतराव पाटील यांचा जनसंपर्क कमी असल्यानं यंदाही यड्रावकर यांची जिंकण्याची शक्यता अधिक आहे, असं राजकीय जाणकार सांगतात.

हेही वाचा -

  1. 80 टक्के समाजकारण अन् 20 टक्के राजकारण हाच आमचा ध्यास- मंगेश कुडाळकर
  2. तेलंगणाचे मुख्यमंत्री रेड्डी यांचं पंतप्रधानांना आव्हान, म्हणाले," हिम्मत असेल तर संसद भवनातून..."
  3. विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस, संध्याकाळी नेत्यांच्या तोफा थंडावणार

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.