ETV Bharat / politics

समाजासाठी छगन भुजबळ सरकारची साथ सोडणार? पंतप्रधानांकडं केली महत्त्वाची मागणी - Chhagan Bhujbal - CHHAGAN BHUJBAL

Chhagan Bhujbal : लोकसभा आणि आणि आता राज्यसभा निवडणुकीत संधी न मिळाल्यानं छगन भुजबळ राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाराज असल्याची जोरदार चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर भुजबळांनी समता परिषदेची तातडीची बैठक बोलावली होती. भुजबळांनी या बैठकीतून पंतप्रधान नरेंद्र मोदींकडं जातनिहाय जनगणेची मागणी करत ओबीसी (OBC Reservation) आंदोलनकर्त्यांना पाठिंबा दिला.

Chhagan Bhujbal
छगन भुजबळ (File Photo)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 17, 2024, 7:22 PM IST

Updated : Jun 17, 2024, 7:39 PM IST

मुंबई Chhagan Bhujbal : गेल्या काही दिवसांपासून छगन भुजबळ त्यांची नाराजी अप्रत्यक्षपणे बोलून दाखवत आहेत. त्यातच सोमवारी भुजबळांनी समता परिषदेची तातडीची बैठक बोलावली होती. या बैठकीत समता परिषदेच्या कार्यकर्त्यांचा सूर 'भुजबळांनी किती दिवस हा अपमान सहन करायचा' असाच होता. मुंबईतील वांद्रे येथे सोमवारी समता परिषदेची बैठक झाली. या समता परिषदेच्या बैठकीत अँड. मंगेश ससाने आणि लक्ष्मण हाके यांच्या तब्येतीबाबत चर्चा झाली. मंत्री छगन भुजबळ यांनी बैठकीदरम्यान या दोघांशीही फोनवरून संपर्क साधला आणि समता परिषद पाठीशी असल्याचं आश्वासन दिलं. दोघांनीही तब्येतीची काळजी घ्यावी, अशी भुजबळांनी विनंती केली.

ओबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण नको : "ओबीसी प्रवर्गातून कोणत्याही परिस्थितीत मराठा समाजाला आरक्षण नको, या आंदोलकांच्या भूमिकेशी आम्ही देखील ठाम आहोत," अशी भुजबळ आणि आंदोलक यांच्यात फोनवरून चर्चा झाल्याचं यावेळी कार्यकर्त्यांनी सांगितलं. मागील 4 दिवसांपासून मंगेश ससाणे यांचं पुण्यात तर लक्ष्मण हाके यांचं वाडीगोद्री गावात उपोषण सुरू आहे. त्यांना यावेळी पाठिंबा दिल्याचं छगन भुजबळ यांनी सांगितलं.

जातनिहाय जनगणना करा : यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडं जातनिहाय जनगणना करण्याची विनंती करणार असल्याचं छगन भुजबळ यांनी सांगितलं. "आता दलितांप्रमाणं ओबीसी समाजालाही विकासनिधी दिला जावा," अशी मागणीही यावेळी भुजबळ यांनी केली. दरम्यान, समता परिषदेच्या पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करून भुजबळ मोठा निर्णयही घेऊ शकतात, अशी चर्चा राजकीय वर्तुळात होती. मात्र, अजूनही आपण सबुरीनं घेत असल्याची भूमिका भुजबळ यांनी घेतल्याचं समजतंय. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे, राज्यात मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याचा मुद्दा पुन्हा तापू लागला आहे. त्याला भुजबळांचा विरोध आहे. या मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

हेही वाचा -

  1. "कोणीही नाराज...."; नाराजी नाट्यावर अजित पवारांनी थेटच सांगितलं - Ajit Pawar
  2. लोकसभेत आम्ही दोनच जागा लढवल्या, मग 48 मतदारसंघात कसा परिणाम दिसला? छगन भुजबळांचा सवाल - Chhagan Bhujbal
  3. राज्यसभेची उमेदवारी डावलल्याच्या मुद्द्यावर काय म्हणाले छगन भुजबळ... - Chhagan Bhujbal

Last Updated : Jun 17, 2024, 7:39 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.