पुणे Shaina NC Criticized Sharad Pawar : बारामती लोकसभा मतदारसंघातील (Baramati Lok Sabha Constituency) महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठी भाजपाचे नेते मोठ्या संख्येनं उपस्थित राहात आहेत. तसंच शरद पवार यांनी अजित पवार गटाच्या उमेदवार सुनेत्रा पवार या बाहेरच्या आहेत, असं म्हटल्यापासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांसह (अजित पवार गट) भाजपाचे नेतेही पवारांवर निशाणा साधत टीका करताय. यावरुनच आता "इटलीच्या सुनेचा स्वीकार करणाऱ्यांना बारामतीच्या सुनेला बाहेरची म्हणणं शोभतं का?", असा खोचक सवाल भाजपाच्या राष्ट्रीय प्रवक्त्या शायना एनसी (Shaina NC) यांनी केलाय. पुण्यातील भाजपा उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचार कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.
नेमकं काय म्हणाल्या शायना : यावेळी बोलत असताना शायना एनसी म्हणाल्या की, जर इटलीची सून तुम्हाला चालते. इटलीच्या सुनेचा तुम्ही स्वीकार केला, तर बारामतीची सून बाहेरची आहे, हे म्हणणं तुम्हाला शोभतं का? जेव्हा एक महिला लग्न करुन तुमच्या घरात येते, सक्रिय पद्धतीनं सामाजिक क्षेत्रात काम करते. अशा महिलेला काम करण्याची संधी द्यायला हवी, असं आवाहनही शायना यांनी केलं.
मोदींचं काम बघून मतदान होणार : पुढं त्या म्हणाल्या की, "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिलांसाठी केलेली कामं बघूनच महिला भाजपाला मतदान करतील. त्यामध्ये नारीशक्ती धोरण, महिलांना गॅस सिलेंडर असेल आणि जास्तीत जास्त सन्मान महिलांना देण्यासाठी त्यांच्या नावानं असलेलं घर उपलब्ध करून देणं असेल. आजपर्यंत कुठल्याही नेत्यानं महिलांसाठी जेवढं काम केलं नाही, तेवढं काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलंय."
हेही वाचा -
- शरद पवारांनी बारामती वाचवून दाखवावी; बावनकुळेंचं थेट आव्हान - Lok Sabha Election 2024
- धर्मावर आधारित आरक्षणाचं विधान करून समाजातील तणाव वाढविण्याचा प्रयत्न-शरद पवारांची पंतप्रधानांवर टीका - Sharad Pawar
- "...हे शरद पवारांनी कोल्हापुरात येऊन म्हणावं", संजय मंडलिकांचं ओपन चॅलेंज - Lok Sabha Election 2024