मुंबई : भारतीय जनता पक्षाने राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी भावी उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केलीय. या यादीत जास्त प्रमाणात जुन्याच चेहऱ्यांना संधी देण्यात आली असून काही नवीन चेहऱ्यांचाही समावेश करण्यात आला आहे. जत मधून भाजपाचे विधान परिषदेचे आमदार धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे. तर पहिल्या यादीत पत्ता कट केलेल्या नाशिक मध्य देवयानी फरांदे यांना दुसऱ्या यादीत स्थान देण्यात आलं आहे. यापूर्वी भाजपाने आपल्या पहिल्या यादीत ९९ उमेदवारांची घोषणा केली होती, तर आता २२ उमेदवारांची घोषणा करून आतापर्यंत भाजपाने एकूण १२१ उमेदवार घोषित केले आहेत.
भाजपाच्या दुसऱ्या यादीतील 22 नावे -
1. धुळे ग्रामीण - राम भदाणे
2. मलकापूर - चैनसुख मदनलाल संचेती
3. अकोट - प्रकाश गुणवंतराव भारसाकले
4.अकोला पश्चिम - विजय अग्रवाल
5. वाशिम (अजा) - श्याम रामचरणी खोडे
6. मेळघाट (अजजा) - केवलराम काले
7. गडचिरोली - मिलिंद नरोटे
8. राजुरा - देवराव भोंगले
9. ब्रह्मपुरी - कृष्णलाल सहारे
10. वरोरा - करण देवतले
11. नाशिक मध्य - देवयानी फरांदे
12. विक्रमगढ (अजजा) - हरिश्चंद्र भोये
13. उल्हासनगर - कुमार आयलानी
14. पेण - रवींद्र पाटील
15. खडकवासला - भिमराव तापकीर
16. पुणे छावनी (अजा) - सुनील कांबळे
17. कसबा पेठ - हेमंत रासने
18. लातूर ग्रामीण - रमेश कराड
19. सोलापूर शहर मध्य - देवेंद्र कोठे
20. पंढरपूर - समाधाना आवताडे
21. शिराळा - सत्यजीत देशमुख
22. जत - गोपीचंद पडळकर
99 उमेदवारांची पहिली यादी : भाजपाकडून 20 ऑक्टोबर रोजी 99 उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली होती. यामध्ये पुण्यातील कोथरूड पर्वती तसंच शिवाजीनगर मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली. तर कसबा, खडकवासला आणि पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघात पेच अजूनही कायम असल्यानं पहिल्या यादीत येथील उमेदवारांची नाव घोषित करण्यात आलेली नाही.
हेही वाचा -