ETV Bharat / politics

अजित पवार भाजपासाठी 'नाकापेक्षा मोती जड'; पवारांना बाजूला कसं सारायचं? भाजपासमोर प्रश्न - Ajit Pawar - AJIT PAWAR

Ajit Pawar : शरद पवार यांच्या पक्षाला फोडून महायुतीची ताकद वाढावी यासाठी अजित पवारांना सत्तेत सामावून घेतलं. मात्र, आता अजित पवार यांच्यामुळं भाजपाचा ब्रँड खराब झाल्याची भावना भाजपाची आहे. परंतु, आता अजित पवारांना बाजूला कसं सारायचं हा भाजपासमोर नवा प्रश्न उभा ठाकला आहे.

Ajit Pawar
अजित पवार (File Photo)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 15, 2024, 7:44 PM IST

मुंबई Ajit Pawar : राज्यात सत्तेत असलेल्या महायुती सरकारनं लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election) जास्तीत जास्त जागा जिंकण्यासाठी काही गणिते मांडली. मतांची टक्केवारी जर पाहिली तर ती 42 टक्के इतकी शिवसेना शिंदे गट आणि भाजपा यांची मिळून होईल, असा अंदाज होता. तर त्याचवेळी विरोधकांच्या महाविकास आघाडीची टक्केवारी ही 50 टक्क्यांच्या आसपास जाताना दिसत होती. यावर उतारा म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद कमी करायची आणि अजित पवार यांच्यासोबत 40 आमदार महायुतीत आल्यानंतर पक्षाची ताकद आणि मतांची टक्केवारी आपोआप वाढेल आणि महाराष्ट्रात महायुतीला चांगले यश येईल, या विचारानं अजित पवार यांना सत्तेत सामावून घेण्यात आलं.

प्रतिक्रिया देताना अनिकेत जोशी (ETV BHARAT Reporter)

जनतेला निर्णय रुचला नाही : मात्र, सिंचन घोटाळा आणि शिखर बँक घोटाळ्याचे आरोप असलेल्या अजित पवार यांना पक्ष सोबत घेतल्यानं भारतीय जनता पक्षाचा ब्रँड खराब झाल्याचं संघाच्या मुखपत्रात ऑर्गनायझरमध्ये रतन सारडा यांनी जाहीरपणे मांडलं होतं. तोपर्यंत भाजपा नेत्यांच्या मनात असलेली खदखद या निमित्तानं मांडली गेल्याचं जेष्ठ राजकीय विश्लेषक अनिकेत जोशी यांचं म्हणणं आहे.

आता यांना बाजूला कसं करायचं : वास्तविक राष्ट्रवादी काँग्रेसलासोबत घेऊन भाजपाला या निवडणुकीत काहीही फायदा झाला नाही हे स्पष्ट झालंय. त्यामुळं अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर भाजपाचे नेते नाराज आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसला केंद्रात मंत्री पदही देण्यात भाजपानं टाळाटाळ केली. त्यानंतर राज्यसभा उमेदवारी दाखल करताना भाजपाच्या वतीनं किंवा शिवसेना शिंदे गटाच्यावतीनं कोणीही हजर नव्हते. संसदीय कामकाज सल्लागार समितीलाही राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं कोणीही उपस्थित राहिले नाही. हे सर्व घटनाक्रम पाहता भारतीय जनता पक्षाला राष्ट्रवादी काँग्रेस सोबत नको आहे हे स्पष्ट होते. त्यांना आता राष्ट्रवादीला दूर सारायचं आहे. मात्र, असं तातडीनं दूर सारलं तर भारतीय जनता पक्ष हा केवळ वापरतो आणि फेकून देतो हा संदेश जाऊ शकतो. यामुळं भारतीय जनता पक्षाचे हात दगडाखाली अडकले असल्याचं जोशी यांनी सांगितलं.

भाजपाला नाकापेक्षा मोती जड : या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद्र पवार पक्षाचे नेते रोहित पवार यांनीही अजित पवार यांच्या बद्दल भाजपामध्ये असलेली नाराजी आणि त्यांच्या पक्षाला जड झालेले अजित पवार याबाबत जाहीर भाष्य केलंय. तर दुसरीकडं जितेंद्र आव्हाड यांनीही अण्णा हजारे यांनी आताच का शिखर बँक घोटाळ्याच्या क्लोजर रिपोर्टबाबत मागणी केली आहे हे सुद्धा तपासलं पाहिजे. ही सर्व वातावरण निर्मिती राष्ट्रवादीला हळूहळू दूर करण्यासाठी आहे का असा प्रश्नही जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केलाय. त्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेस आता भाजपाला नाकापेक्षा मोती जड झाला असल्याचं अनिकेत जोशी यांनी सांगितलं.

हेही वाचा -

  1. ठरलं! विधानसभा निवडणूक महाविकास आघाडी एकत्रित लढवणार; बंडखोरांबाबत घेतला मोठा निर्णय - Mahavikas Aghadi PC
  2. "दबाव आला असावा..."; इंद्रेश कुमार यांच्या विधानावर विजय वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया - Vijay Wadettiwar On Indresh Kumar
  3. सरकारला पावसाळी अधिवेशन गुंडाळायची घाई, तर अधिवेशनाचा कालावधी वाढवण्याची विरोधकांची मागणी - Monsoon Session Period

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.