ETV Bharat / politics

"काही लोक साथ तर देतात, मात्र मागून..."; नवनीत राणांचा गद्दारांना टोला - Navneet Rana - NAVNEET RANA

Navneet Rana : युवा स्वाभिमान पक्षाच्या वतीनं रविवारी अमरावती येथील नवाथे चौक परिसरात दहीहंडी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी बोलताना भाजपा नेत्या नवनीत राणा यांनी लोकसभा निवडणुकीत दगाफटका देणाऱ्यांवर निशाणा साधला.

Navneet Rana
नवनीत राणा (Source - ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 1, 2024, 10:03 PM IST

Updated : Sep 1, 2024, 10:08 PM IST

अमरावती Navneet Rana : बडनेराचे आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाच्या वतीनं रविवारी (1 सप्टेंबर) नवाथे चौक परिसरात दहीहंडी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं. यावेळी बोलताना भाजपा नेत्या नवनीत राणा यांनी लोकसभेत झालेल्या पराभवावर भाष्य केलं. "काही लोक चपलासारखी असतात, साथ तर देतात. मात्र, पाठीमागून चिखल फेकतात. मी ज्यांच्याबद्दल बोलतेय त्यांनी ते नीट समजून घ्यावं," असं वक्तव्य करत लोकसभा निवडणुकीत दगाफटका देणाऱ्यांना नवनीत राणांनी टोला लगावला.

नवनीत राणांची प्रतिक्रिया (Source - ETV Bharat Reporter)

विधानसभेत गद्दारांना उत्तर देऊ : "लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर राजकमल चौकात जे काही घडलं त्यामुळं अनेकांचे रक्त खवळलं आहे. जे राजकमल चौकात पोहोचू शकतात ते नवा चौकापर्यंत देखील पोहोचू शकतात. मात्र, आम्ही असं होऊ देणार नाही. विधानसभा निवडणुकीत विरोधकांना धडा शिकवण्यासोबतच आम्ही गद्दारांना देखील उत्तर देऊ," असा इशारा नवनीत राणा यांनी दिला. "आमदार रवी राणा हे किराणा वाटतात, अशी टीका विरोधक करतात. विरोधकांनी मूठभर साखर तरी वाटून दाखवावी," असं आव्हान देखील नवनीत राणा यांनी यावेळी विरोधकांना दिलं.

चंकी पांडे, तुषार कपूर आणि शरद केळकर यांची उपस्थिती : युवा स्वाभिमान पक्षाच्या दहीहंडी स्पर्धेला सिने अभिनेता चंकी पांडे, तुषार कपूर आणि शरद केळकर यांच्या उपस्थितीनं अमरावतीकराचं लक्ष वेधलं. अभिनेता चंकी पांडे यानं त्याच्या चित्रपटातील अनेक लोकप्रिय गाण्यांवर नृत्य सादर केलं. तुषार कपूर यानं देखील विविध नृत्य सादर करून लक्ष वेधलं.

दहीहंडीसाठी गोविंदांची गर्दी : युवा स्वाभिमान पक्षातर्फे आयोजित विदर्भ दहीहंडी स्पर्धेत विदर्भातील विविध भागातून एकूण 16 संघ सहभागी झाले. पावसामुळं दहीहंडी स्पर्धेची रंगतही वाढली होती. या दहीहंडीसाठी मोठ्या प्रमाणात गोविंदांनी गर्दी केली होती.

हेही वाचा

  1. "शिवाजी महाराजांचं नाव घेतात अन् काम औरंगजेब आणि अफजलखानासारखं"; मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार - Shivaji Maharaj Statue Collapse
  2. "उद्धव ठाकरे, शरद पवार माफी मागणार का?"; महाराजांच्या 'त्या' घटनांचा संदर्भ देत देवेंद्र फडणवीसांचा सवाल - Chhatrapati Shivaji Maharaj Statue
  3. "शिवद्रोही सरकारला 'गेट आऊट' म्हणायची वेळ आलीय"; महाविकास आघाडीचा सरकारवर हल्लाबोल - MVA Protest Mumbai
  4. 'तेल लावलेला पैलवान' उतरला आंदोलनात; छत्रपती शाहू महाराजांचा हात धरुन शरद पवार आंदोलनात सहभागी, पाहा उत्साह - MVA Protest In Mumbai

Last Updated : Sep 1, 2024, 10:08 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.