ETV Bharat / politics

भिवंडीत समाजवादीला धक्का! आमदार रईस शेख यांचा राजीनामा - Rais Shaikh Resignation - RAIS SHAIKH RESIGNATION

Rais Shaikh Resignation : भिवंडी विधानसभा मतदारसंघाचे समाजवादी पार्टीचे आमदार रईस शेख यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे. समाजवादी पक्षाचे महाराष्ट्र अध्यक्ष अबू आझमी यांच्याकडं त्यांनी आपला राजीनामा सोपवला असून पक्ष नेतृत्वानं यावर योग्य निर्णय घ्यावा असं त्यांनी म्हटलंय.

Bhiwandi Samajwadi Party MLA Rais Shaikh resignation over disputes within party
भिवंडीत समाजवादीला धक्का! आमदार रईस शेख यांचा राजीनामा
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 20, 2024, 9:16 PM IST

मुंबई Rais Shaikh Resignation : समाजवादी पार्टीचे राज्यात पक्षाचे महाराष्ट्र अध्यक्ष अबू आझमी यांच्यासह तीन आमदार आहेत. यापैकी भिवंडी येथील आमदार रईस शेख यांनी आज (20 एप्रिल) आपल्या आमदारकीचा राजीनामा सोपवला आहे.

काय म्हणाले रईस शेख? : या संदर्भात माहिती देताना, रईस शेख यांनी सांगितलं की, "समाजवादी पक्षाचा राज्यात विस्तार करण्यासंदर्भात माझी वेगळी भूमिका आहे. गेले वर्षभर मी त्यासंदर्भातील मुद्दे राज्य नेतृत्वाकडं मांडतोय. मात्र, त्यावर पक्षाकडून कोणतीही कार्यवाही झाली नाही", असं ते म्हणालेत. तसंच माझी समाजवादी पक्षावरील निष्ठा कायम आहे. पक्षानं मला आमदार म्हणून काम करण्याची संधी दिली आहे. मी पक्षाचा एक कट्टर कार्यकर्ता आहे आणि सदैव राहीन. मी आमदार नसलो तरी पक्षाची संघटनात्मक ताकद आणि विस्तार वाढवण्याची माझी बांधिलकी कायम आहे, असे शेख म्हणाले.

अजित पवार गटात प्रवेश करणार? : पुढं ते म्हणाले की, "मी उपस्थिती केलेल्या मुद्द्यांच्या पार्श्वभूमीवर मी माझ्या आमदारकीचा राजीनामा समाजवादी पक्षाचे महाराष्ट्र अध्यक्ष अबू आजमी यांच्याकडं दिलाय. मला आशा आहे की राज्यातील पक्षनेतृत्व पक्षाच्या हिताचा उचित निर्णय घेईल." दरम्यान, रईस शेख यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा विधानसभा अध्यक्षांकडं अद्याप सोपवला आहे की नाही याबाबत अद्याप माहिती मिळू शकली नाही. तसंच राजीनामा दिल्यानंतर त्यांनी आपल्या पुढील वाटचाली बाबतची भूमिकाही स्पष्ट केलेली नाही. यासंदर्भात त्यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. मात्र, मागील काही दिवसांपासून ते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सातत्यानं संपर्कात असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळं कदाचित ते राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश करतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

हेही वाचा -

  1. गौरव वल्लभ यांची काँग्रेसला सोडचिठ्ठी : म्हणाले, 'सनातन धर्माविरोधात घोषणा देऊ शकत नाही' - Gourav Vallabh Resigns Congress
  2. असाही खासदार जो केवळ एकच दिवस गेला सभागृहात! जल, जंगल जमीनसाठी दिला खासदारकीचा राजीनामा - Lal Shyam Shah
  3. आरोग्य विभागात करोडोंचा रुग्णवाहिका घोटाळा? आरोग्य मंत्री तानाजी सावंतांनी राजीनामा द्यावा - रोहित पवार - Rohit Pawar criticizes Tanaji Sawat

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.