बीड Beed Lok Sabha Election Results 2024 : शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांनी जवळपास सहा हजार पाचशे मतांनी पकंजा मुंडेंचा (Pankaja Munde Lost) पराभव केलाय. दिवसभर अटीतटीची लढत सुरु असताना शेवटच्या फेरीत बजरंग सोनवणेंनी (Bajrang Sonawane Wins) विजय मिळवलाय. तर पंकजा मुंडेंकडून बीड, गेवराई विधानसभा मतदारसंघात फेर मतमोजणीची मागणी करण्यात आली होती.
राज्यात अटीतटीची लढत बीड लोकसभेत : भाजपा उमेदवार पंकजा मुंडेंकडून बीड, गेवराई विधानसभा मतदारसंघात फेर मतमोजणीची मागणी करण्यात आली होती. बीड लोकसभा मतदारसंघात अतिशय अटीतटीच्या लढतीत 32 व्या फेरीमध्ये निकाल समोर आला होता. 31 व्या फेरीनंतर पंकजा मुंडे 400 मतांनी आघाडीवर होत्या. मात्र, शेवटच्या फेरीपर्यंत बीडमध्ये ट्वीस्ट पाहायला मिळाला. पंकजा मुंडे यांनी 34 हजारांचा लीड घेतला होता. तो बजरंग सोनवणे यांनी 4 ते 5 फेऱ्यांमध्ये मोडित काढला होता. मंगळवारी सकाळपासूनच बीडमध्ये अटीतटीचा सामना पाहायला मिळत होता. बीड लोकसभा मतदारसंघ मराठा विरुद्ध ओबीसी राजकारणामुळं अतिशय संवेदनशील बनला होता. प्रत्येक फेरीत आघाडी घेणारा उमेदवार बदलत होता. त्यामुळं राज्यात सर्वांत अटीतटीची लढत बीड लोकसभेत पाहायला मिळाली.
मराठा आरक्षणाचा मुद्दा तापला : बीड लोकसभा मतदारसंघात मराठा आरक्षणाचा मुद्दा सर्वांत तापलेला पाहायला मिळाला. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यामुळं आणि मनोज जरांगे फॅक्टरमुळं मराठवाड्यातील अनेक जागांवर भाजपला पराभव स्वीकारावा लागल्याच्या चर्चा आहेत. बीडमध्ये लोकसभा निवडणुकीत सर्वांत मोठा परिणाम झाल्याचं बोललं जातंय.
मुंडेंचं अख्ख कुटुंबं होतं प्रचारात : पंकजा मुंडे यांच्यासाठी त्यांचे भाऊ मंत्री धनंजय मुंडे यांनी बहिणीसाठी पायाला भिंगरी लावून प्रचार केला होता. तसंच बहिणीसाठी खासदारकी सोडणाऱ्या प्रितम मुंडे यादेखील प्रचारात उतरल्या होत्या. मात्र, निकालात पंकजा मुंडे यांचा पराभव झालाय. दिवंगत गोपीनाथ मुंडे यांचं निधन झाल्यापासून ते आतापर्यंत या मतदारसंघात मुंडे घराण्याचं वर्चस्व राहिलं. मात्र, आता येथून बजरंग सोनावणे विजयी झाले आहेत.
हेही वाचा -
- अजित पवारांना 'दे धक्का'! बारामतीत सुप्रिया सुळेंचाच डंका, तब्बल दीड लाखानं नणंदबाईंना हरवलं - Baramati Lok Sabha Results 2024
- राज्यात महाविकास आघाडीमुळं महायुतीचं टेन्शन वाढलं; तुमच्या मतदारसंघाचा खासदार कोण? वाचा संपूर्ण लिस्ट - maharashtra lok sabha 2024 winner list
- बीडमध्ये मतमोजणी प्रक्रिया शांततेत; गोळीबार, मारामारी केवळ अफवा - पोलीस अधीक्षक - Maharashtra lok Sabha election