ETV Bharat / politics

बारामतीवर एकहाती वर्चस्व गाजवलेल्या पवार कुटुंबातच वर्चस्वाची 'लढाई'; लोकसभेत शरद पवारांची 'लेक आणि सुने'मध्ये थेट लढत? - बारामती लोकसभा

Baramati Loksabha 2024 : बारामतीमध्ये आतापर्यंत एकहाती सत्ता असलेल्या पवार कुटुंबात अजित पवारांच्या बंडामुळं फुट पडली. विद्यमान खासदार सुप्रिया सुळेंच्या विरोधात सध्या उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांची उमेदवारी निश्चित मानली जातेय. अशात या मतदारसंघात नणंद आणि भावजय यांच्यातच थेट लढत पाहायला मिळु शकते.

बारामतीवर एकहाती वर्चस्व गाजवलेल्या पवार कुटुंबातच वर्चस्वाची 'लढाई'; लोकसभेत शरद पवारांची 'लेक आणि सुने'मध्ये थेट लढत?

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 26, 2024, 8:45 AM IST

बारामती Baramati Loksabha 2024 : देशात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष आणि इच्छुक उमेदवार कामाला लागले आहेत. अशातच महाराष्ट्रातील सर्वाधिक महत्त्वाचे समजल्या जाणाऱ्या बारामतीकडे आता सर्वांचंच लक्ष लागलंय. कारण पवार कुटुंबातच पडलेली राजकीय फुट आणि लोकसभा मतदारसंघातील असमतोल परिस्थिती यामुळं बारामती लोकसभा मतदारसंघाची निवडणूक फारच रंजक व राजकीयदृष्ट्या महत्त्वाची ठरणार आहे.

भाजपाचा वातावरण निर्मितीचा प्रयत्न : बारामती लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षानं मागील दोन वर्षांपूर्वी वातावरण निर्मिती करताना 'ए फॉर अमेठी' व 'बी फॉर 'बारामती अशी स्लोगन वापरली. अर्थातच सत्ताधारी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते यामुळं कमालीचे अस्वस्थ झाले होते. त्यामध्ये अजित पवारांचा त्यावेळी राष्ट्रवादीमध्ये समावेश होता. मात्र भाजपानं कितीही आदळापट केली तरी फरक पडणार नाही. हा एक कार्यकर्त्यांचा वर्ग एकीकडं असतानाच दुसरीकडं भाजपानं लोकसभा प्रवासाच्या निमित्तानं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची या मतदारसंघासाठी निवड केली होती. त्यामुळं तर हा मतदारसंघ 'हाय व्होल्टेज' स्वरूपाचा ठरला होता. कार्यकर्त्यांमध्येही नवचैतन्य पसरवण्यात भाजपा यशस्वी झाला. मात्र त्याची वातावरण निर्मिती नंतरच्या काळात टिकली नाही.

राष्ट्रवादीची ताकद दुभागली : आता मात्र खुद्द अजित पवार हे राष्ट्रवादी पासून म्हणजेच शरद पवारांपासून वेगळे होऊन त्यांनी आपला भाजपा बरोबरचा मार्ग शोधलाय. अशा परिस्थितीत आता राष्ट्रवादीची ताकद दुभागली गेलेली आहे. दुसरीकडे या लोकसभेतील खडकवासला, दौंड हे मतदारसंघ भाजपच्या ताब्यात आहेत. राष्ट्रवादीची या ठिकाणची ताकद तालुका आणि या कार्यकर्त्यांमध्ये असली तरी देखील इंदापूर, बारामती वगळता त्यांच्याकडं स्वतःच्या पक्षाचा आमदार नाही. त्यातच आता बारामती आणि इंदापूर हे दोन्ही तालुके भाजपाच्या समर्थनात आहेत. अशा परिस्थितीत जर महायुतीची निवडणूक महायुतीप्रमाणेच लढली गेली आणि ती जागा अजित पवार यांच्या गटाकडे गेली तर अजित पवार यांचा उमेदवार कोण असणार याचीच चर्चा सगळ्यात जास्त आहे.

अजित पवारांच्या पत्नी मैदानात : मागील काही दिवसांपासून अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार या मतदारसंघ पिंजून काढत आहेत. त्यांनी विकासकामांचा धडाका लावलाय. अजित पवारही बारामतीत तळ ठोकून आहेत. इतकचं नव्हे तर बारामतीत सुनेत्रा पवारांचा प्रचार रथही तयार करण्यात आलाय. त्यामुळं राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अजित पवार गटाकडून त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांची उमेदवारी जवळपास निश्चित असल्याचं मानलं जातंय. त्यांच्या उमेदवारीची फक्त औपचारिक घोषणा बाकी असल्साचं दिसतंय. अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनीही याचे स्पष्ट संकेत देत, बारामतीतून सुनेत्रा वहिनींनी लढावं अशी तिथल्या कार्यकर्त्यांची इच्छा असल्याचं म्हटलं होतं. त्यामुळं महायुतीकडून सुनेत्रा पवार यांची उमेदवारी निश्चित मानली जातेय.

सुप्रीया सुळेंसाठी खडतर वाट : दुसरीकडे विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांच्यासाठी ही निवडणूक खडतर मानली जातेय. मात्र, जर समीकरणं बदलली आणि सहानभूतीचा डाव राष्ट्रवादीच्या पथ्यावर पडला तर समीकरणं वेगळी ठरु शकतात. सुप्रिया सुळे यांनी या मतदारसंघात गेल्या अनेक वर्षांपासून सातत्यानं संपर्क ठेवलेला आहे. त्यांनी सलग तीनदा या मतदारसंघाचं नेतृत्त्व केल्यानं त्यांचा जनसंपर्कही दांडगा आहे. त्यातच राष्ट्रवादीतील फुटीची सहानुभूती ही सुप्रिया सुळे यांच्या बाजूनं असल्याचं सांगितलं जातंय, तसं चित्र एकंदरीत दिसतंय. अशा परिस्थितीत अजित पवार यांना त्याचा फायदा होणार का हे पाहणंही औत्सुक्याचं ठरणार आहे.

मतदारसंघावर पवारांच एकहाती वर्चस्व : गेल्या अनेक वर्षांपासून बारामती लोकसभा मतदारसंघावर पवारांचं एकहाती वर्चस्व राहिलंय. 1984 साली शरद पवार पहिल्यांदा या मतदारसंघातून निवडून आले होते. त्यानंतर कायमच हा मतदारसंघ आघाडीकडे राहिलाय. 1989 ते 91 मध्ये इंदापूरचे शंकरराव पाटील (हर्षवर्धन पाटील यांचे काका) निवडून आले. त्यानंतर 1991 साली अजित पवारांना खासदारकीची संधी मिळाली. पण राजकीय परिस्थितीत अजित पवारांना राजीनामा द्यावा लागला. मात्र त्यानंतर शरद पवारांनी 2009 पर्यंत या मतदारसंघाचं नेतृत्व केलं. सन 2009 साली सुप्रिया सुळे यांना बारामती लोकसभा मतदारसंघाची जागा सोडून शरद पवार माढा लोकसभा मतदारसंघातून उभे राहिले आणि निवडून आले. 2009 पासून आजपर्यंत सुप्रीया सुळे या मतदारसंघाचं प्रतिनिधीत्त्व करत आहेत.

मागील दोन्ही निवडणुकीत सुप्रीया सुळेंचा दणदणीत विजय : मागील दोन लोकसभा निवडणुकीची आकडेवारी बघितल्यास 2014 साली महादेव जानकर हे सुप्रिया सुळे यांच्या विरोधात उभे राहिले होते. त्यात जानकर यांना 4,51,843 मतं मिळाली होती. तर सुप्रीया सुळे यांना 5,21,562 मतं मिळाली होती. सुप्रीया सुळेंनी जानकर यांचा 69 हजार 666 मतांनी पराभव केला होता. तर मागील 2019 च्या निवडमुकीत भाजपाचे आमदार राहुल कुल यांच्या पत्नी कांचन कुल या सुप्रिया सुळे यांच्या विरोधात उभ्या राहिल्या होत्या. त्यावेळी कांचन कुल यांना 5,28,711 मतं मिळाली होती. तर सुप्रीया सुळेंना 6,83,705 मतं मिळाली होती. यात कांचन कुल यांचा 1 लाख 30 हजार मतांनी पराभव झाला होता.

हेही वाचा :

  1. 'कोळशाच्या खाणी'त कोणाच्या 'विजाया'चा 'चंद्र'? कॉंग्रेस 'प्रतिभा' राखणार की भाजपाचं 'कमळ' पुन्हा फुलणार, काय असेल समीकरण?
  2. चालिसा पठणामुळं तुरुंगात गेलेल्या नवनीत राणांना लोकसभेत 'हनुमान' पावणार का? काय आहे समीकरण?

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.