ETV Bharat / politics

"ओ..बापू आता 5 लाख 80 हजार पवार विरोधी मतदारांचं करायचं काय?", विजय शिवतारेंना कार्यकर्त्याचं खरमरीत पत्र - Vijay Shivtare letter - VIJAY SHIVTARE LETTER

Vijay Shivtare Letter : बारामती लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे नेते माजी राज्यमंत्री विजय शिवतारे (Vijay Shivtare) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविरोधात भूमिका घेत बारामतीतून अपक्ष म्हणून लढण्याचा इशारा दिला होता. मात्र, त्यांनी आता माघार घेतली असून महायुतीच्या उमेदवाराचा प्रचार करणार असल्याचं जाहीर केलंय. विजय शिवतारे यांनी माघार घेतल्यानंतर आता त्यांच्या कार्यकर्त्यांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.

baramati lok sabha constituency vijay shivtare party worker letter viral on social media after he take step back to contest election against sunetra pawar
विजय शिवतारेंना कार्यकर्त्याचं खरमरीत पत्र
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 31, 2024, 10:55 PM IST

पुणे Vijay Shivtare Letter : शिवसेना शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे (Vijay Shivtare) यांनी बारामती लोकसभा निवडणुकीतून (Baramati Lok Sabha Constituency) माघार घेतलेली आहे. मात्र, विजय शिवतारेंच्या या निर्णयामुळं आता त्यांना एका कार्यकर्त्यानं संतापून पत्र पाठवलं आहे. 'माझा नेता पलटूराम निघाला,' असा उल्लेख पत्रात करण्यात आला आहे. तसंच पाच लाख पवार विरोधी मतदारांचं आता काय करायचं? असा परखड सवालही या पत्रातून विचारण्यात आलाय. दरम्यान, हे पत्र सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

विजय शिवतारे यांना कार्यकर्त्यानं लिहिलेलं पत्र वाचा जशाच तसं :

पुरंदरचा तह...

प्रति,

श्री. विजय बापू शिवतारे, शिवसेना नेते, पुरंदर

स.न.वि.वि. बापू, 13 मार्च 2024 रोजी तुम्ही बंडाची भूमिका घेवून बारामती लोकसभेची निवडणूक 'अपक्ष' लढवण्याचा निर्धार केला. त्यानंतर मीडियानं तुम्हाला अगदी डोक्यावर घेतलं. दर अर्ध्या तासाच्या बुलेटीनला 'तुमची' स्फोटक विधानं गाजू लागली. चॅनेल कुठलंही लावा दिसणार फक्त 'शिवतारे बापू' हे ठरलेलं. त्यानंतर तुम्ही जेजुरीच्या खंडोबाच्या साक्षीनं 'एल्गार' पुकारला. पुढं तुमचे दौरे, भेटीगाठी, पत्रकार परिषद गाजू लागल्या. तुम्ही सुद्धा अगदी 'राणा भीमदेवी' थाटानं बोलत राहिलात. आरोप, टीका-टिप्पणी करू लागलात. 'काहीही झालं तरी आता माघार नाही', 'बारामती कोणाची जाहागिरी नाही' यासह तुमची अनेक विधानं गाजली. तुम्हाला समर्थक मिळाले. माय-बाप जनता, पदाधिकारी कार्यकर्ते यांची 'वज्रमूठ' तुम्ही उभी केली. प्रसंगी शिवसेनेचा 'राजीनामा' देवू. पण, आता निर्णय घेतलाय, ही तुमची भूमिका अवघ्या महाराष्ट्रात गाजली. घोडा-मैदान जवळ आलं असताना बापू, तुम्ही 30 मार्च 2024 रोजी अचानक माघार घेतली आणि आमचीही मोठी अडचण झाली.

अजित पवारांची गुर्मी तशीच आहे. ते उर्मट आहेत. पण, अजित पवारांना तो पश्चात्तापही नाही. जणू काही लोकांना फसवणे हा त्यांचा जन्मजात अधिकार असल्यासारखं ते वागत आहेत. इथून मतदान घेऊन त्या जोरावर राज्यात, देशात ब्लॅकमेलिंग केलं जात आहे. हा ब्रह्मराक्षस आम्हीच तयार केला आहे. या पापाचं परिमार्जन आम्हा मतदारांनाच करावं लागेल. या रामायणातला रावणाच्या विरोधात लढणारा रामाच्या बरोबर असणारा विभीषण विजय शिवतारे आहे, अशीही टीका बापू तुम्हीचं केली होती. मात्र, आज तुम्हाला अजित पवारांचा काय साक्षात्कार झाला आहे? आता तुम्ही रामायणातले विभीषण आहात की नाही? हेही आम्हाला कळू द्या. बापू, पवारांच्या विरोधातल्या 5 लाख 80 हजार मतदारांनी आता नेमकं काय करायचं? आता तुम्हाला अजित पवार उर्मट आणि नालायक वाटत नाहीत का? तुमच्याचं भाषेत त्यांची गुर्मी उतरली आहे का? सुनेत्रा पवार या अजित पवारांच्या पत्नी आहेत, म्हणून आम्ही त्यांना मतदान द्यायचं का? त्यांचं कॉलिफिकेशन काय? असा प्रश्न तुम्हीचं उपस्थित केला होता. मग आता आम्ही मतदार म्हणून सुनेत्रा वहिनींना मतदान कारायचं का आणि कशासाठी? यावरही बापू तुम्हीचं अधिकारवाणीने प्रकाश टाकला तर बरं होईल.

बापू, मी तुमचा कट्टर समर्थक आहे. तुमच्या राजकीय प्रवासात कायम तुमच्या पाठीशी उभा असतो आणि राहीन सुध्दा. तुम्ही म्हणाल तसं आजपर्यंत करीत आलो आहे. 2019 ला सुध्दा अजित पवार यांच्या समर्थकांशी तुमच्यामुळं भांडलो आहे. कारण, तुम्ही माझे नेते आहात. पण, काल माझा नेता असा संधीसाधू, पोटात एक आणि ओठात एक असणारा निघाला, याचं फार वाईट वाटलं. बापू, ज्या मीडियानं तुम्हाला डोक्यावर घेतलं, त्याचं मीडियानं तुमची लया फार घालवून टाकलं. सोशल मीडियात तर तुम्हाला 'महाराष्ट्राचा पलटूराम' म्हणून 'हॅशटॅग' फिरवला जात आहे. 'पुरंदरचा मांडवली सम्राट', 'पाकीट भेटलं का?', 'घुमजाव', 'शिवतारे जमी पर', 'चिऊतारे', 'शेवटी, आपला आवाका दाखविला', '50 खोके शिवतारे ओके', अशा खोचक कंमेंटचा सोशल मिडीयात मुसळधार पाऊस पडतो आहे.

अजित पवारला माझा आवाका कळेल? म्हणणारे तुम्ही आवाका दाखविण्याच्या आधीच 'शेपूट' घातलंत. मुख्यमंत्र्यांना माझ्यामुळे अडचण होत आहे, हे खतगावकर यांनी सांगितले. असं बाळबोध समर्थन करणाऱ्या विजय शिवतारेंना हे आधी समजलं नव्हतं का? आता त्या 5 लाख 80 हजार पवार विरोधी मतदारांनी नेमकं काय करायचं? हे तुम्ही सांगू शकाल का? तुम्ही स्वतः हा घटनाक्रम घडवून आणला की, तुमचा बोलविता धनी दुसराच कुणी होता? तुम्ही कुणाची स्क्रिप्ट वाचत होतात? आता तुमची वैयक्तिक भूमिका काय? आज तुमची राजकीय विश्वासार्हता शिल्लक आहे का? तुम्ही म्हणजे 'फाडा पोस्टर निकला चूहा' नव्हेत का? आदरणीय बापू, याचीही उत्तरे तुम्ही दिलीच पाहिजेत.

असो, हे सगळं वाचून तुम्हाला राग येईल. तुमची चिडचिड होईल. पण, बापू तुमचा कार्यकर्ता म्हणून समर्थन केलं. तेव्हा अख्ख्या गावानं दस्तुरखुद्द अजित पवार यांच्या समर्थकांनी आणि कार्यकर्त्यांनी मला वेड्यात काढलं आणि तुम्हाला 'पोपटलाल' म्हटलं. त्यामुळे चिडून मी सर्व पै पाहुणे, नातेवाईक, आप्तेष्ट, सगेसोयरे, मित्र परिवार, गावात आणि तालुक्यात तुमचा प्रचार केला. तुमची भूमिका लोकांना समजावून सांगितली. पण, आज तुम्ही माघार घेतली आणि माझी गोची झाली. आता लोक फोन करून माझ्यासह तुमचाही उध्दार करू लागलेत. त्यामुळे मी फोन बंद करून बसलोय. म्हणून आता तुम्हीचं एखादी पत्रकार परिषद घेवून या सगळ्या प्रश्नांची सविस्तर उत्तरे द्या. तसाही पत्रकार परिषद घेवून 'गोंधळ' घालण्याचा तुम्हाला जुनाचं 'नाद' आहे. असो, जमेल तेवढं करा ओ. माझी अडचण होत आहे. तूर्तास तरी थांबतो !

कळावे आपला, कट्टर कार्यकर्ता.

हेही वाचा -

  1. विजय शिवतारे यांनी अजित पवारांच्या विरोधात का घेतली भूमिका? - Lok Sabha election
  2. वाल्याचा वाल्मिकी ऋषी होतो...; विजय शिवतारेंची बारामतीतून माघार घेतल्यानंतर पहिली प्रतिक्रिया - Vijay Shivtare
  3. विजय शिवतारे नरमले; अजित पवारांच्या वादावर म्हणाले, राजकारणात कोणीच कुणाचा कायमचा मित्र किंवा शत्रू नसतो! - Vijay Shivtare on backfoot

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.