ETV Bharat / politics

सर्वसामान्यांच्या विकासाचा माविआचा विचार घराघरात पोहोचवा - बाळासाहेब थोरात - Lok Sabha Election 2024 - LOK SABHA ELECTION 2024

Lok Sabha Election 2024 : शिर्डी येथे आज लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची नियोजनाची बैठक झाली. यावेळी बाळासाहेब थोरात यांनी पदाधिकाऱ्यांना काही सूचना दिल्या आहेत.

Maha Vikas Aghadi Meeting In Shirdi
महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची संयुक्त बैठक
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 10, 2024, 10:11 PM IST

Updated : Apr 10, 2024, 10:34 PM IST

शिर्डी Lok Sabha Election 2024 : देशात वाढलेली महागाई आणि बेरोजगारी, याचबरोबर महिलांचे, शेतकऱ्यांचे मोठे प्रश्न आहेत. मात्र, यावर सरकार बोलत नसून धार्मिकतेचे मुद्दे पुढे केले जात आहेत. भाजपाच्या फसव्या जाहिरातबाजीला लोक कंटाळले असून राज्यात महायुतीच्या विरोधात मोठी लाट आहे. तर महाविकास आघाडीचीच सर्वत्र हवा आहे. जन कल्याणाचा महाविकास आघाडीचा विचार सर्वांनी घराघरात पोहोचवावा असं आवाहन, काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी केलंय.

पदाधिकाऱ्यांची नियोजनाची बैठक : शिर्डीतील अमृता लॉन्स येथे लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची नियोजनाची बैठक संपन्न झाली यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर माजी मंत्री आमदार प्राजक्त तनपुरे, आमदार लहू कानडे, माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे, मा.आमदार सुधीर तांबे, शिवसेनेचे रावसाहेब खेवरे, कॉम्रेड डॉ. अजित नवले, हेमंत ओगले, डॉ. एकनाथ गोंदकर, श्रीकांत मापारी, करण ससाने, शिवाजी नेहे, श्रीमती सुनीता भांगरे, मधुकर तळपाडे, शिवसेनेचे जगदीश चौधरी, संजय फड, आप्पासाहेब केसकर, सुधीर म्हस्के, दुर्गा तांबे, कॅन्सरतज्ञ डॉ .जयश्री थोरात, बाबा ओहोळ, इंद्रजीत थोरात, रणजीत सिंह देशमुख आदींसह शिर्डी लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या मित्र पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते.

देशात इंडिया आघाडीला आणि राज्यात महाविकास आघाडीला अत्यंत अनुकूल वातावरण आहे. सर्वत्र वाढलेली बेरोजगारी आणि महागाई हे महत्त्वाचे मुद्दे आहेत. मात्र, यावर सरकार बोलत नाही. धार्मिकतेचे मुद्दे पुढे केले जात आहेत. फसव्या जाहिराती मधून दिशाभूल होत आहे. आता जनता या लोकांना कंटाळली आहे. - बाळासाहेब थोरात, आमदार

मीडियावर दबाव टाकला जात आहे : महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीला मोठे यश मिळणार असून अहमदनगर जिल्ह्यातील अत्यंत चांगलं वातावरण आहे. आपसातील मतभेद दूर करून सर्वांनी एक महिन्याभर अत्यंत चांगलं नियोजन करा. सध्याच्या सरकार विरोधात कमीत कमी प्रत्येकाला 100 मुद्दे सापडतील. राज्यातील आणि केंद्रातील सरकार गोंधळलेलं आहे. सर्व क्षेत्रात अपयशी ठरत आहे. मात्र, मीडिया शांत बसून आहे. सत्ताधाऱ्यांच्या विरोधात मीडिया बोलायला तयार नाही. त्यांच्यावर दबाव टाकला जात आहे. माध्यमे एकतर्फी झाली की काय अशी शंका देशाला निर्माण होत आहे. राज्यघटनेचा आणि सर्वसामान्य जनतेच्या सर्वांगीण विकासाचा महाविकास आघाडीचा विचार घराघरात पोहोचवा यश आपलंच आहे, असं थोरात म्हणाले.

महाविकास आघाडीला मोठे यश : तर माजी मंत्री प्राजक्त तनपुरे म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारनं सत्तेवर येतात सर्वांना कर्जमाफी दिली. कोरोना काळात अत्यंत चांगलं काम केलं. सरकारमध्ये गद्दारी झाली आणि तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पदाचा मोह न ठेवता तातडीनं राजीनामा दिला, तो दिवस सर्वांना आठवतो. संपूर्ण महाराष्ट्र हळहळला होता. आज शरद पवार, उद्धव ठाकरे, आमदार बाळासाहेब थोरात आणि सर्व नेते एकत्र असून महाविकास आघाडीला मोठं यश मिळणार आहे.

जनतेचा विश्वास सार्थ ठरवू : तर भाऊसाहेब वाकचौरे म्हणाले की, पक्षानं टाकलेला विश्वास आपण सार्थ ठरवून जनतेचा खासदार म्हणून आपल्या सर्वांच्यासोबत अत्यंत प्रामाणिकपणं काम करायचं आहे. मागील पाच वर्षाच्या काळात अनेक विकासाच्या योजना गावोगावी राबविल्या आहेत.

त्यांना आता जनता पाडणार : आमदार तांबे म्हणाले की, ही निवडणूक लोकशाहीच्या अस्तित्वाची आहे. पुढील पिढ्यांचं भवितव्य ठरवणारी आहे. तर आमदार लहू कानडे म्हणाले की, प्रत्येकानं आपल्यातील मतभेद विसरून लोकशाहीच्या रक्षणासाठी एकत्र या. तर कॉम्रेड अजित नवले म्हणाले की, ज्यांनी सातत्याने शेतमालाचे भाव पाडले. फोडाफोडी करून सरकार पाडले त्यांना जनता पाडणार आहे. तर आज काँग्रेसनं महाराष्ट्रातील उमेदवार जाहीर केले असून धुळे येथून शोभा बच्चन यांना, तर जालना येथून कल्याण काळे यांची उमेदवारी जाहीर करण्यात आलीय.

हेही वाचा -

  1. भाऊ आणि बहिणीच्या नात्याला समर्पित 'भावंड दिन'; 'हे' आहेत राजकीय क्षेत्रातील चर्चेतील भावंड - Sibling Day 2024
  2. राजकारणातील चाणक्यानं फेकला शेवटचा पत्ता, धैर्यशील मोहिते पाटील 13 एप्रिलला शरद पवार गटात करणार प्रवेश - loksabha election 2024
  3. "मला जर शिवसेना पक्षप्रमुख व्हायचं असतं तर...."; राज ठाकरेंनी थेटच सांगितलं - Raj Thackeray speech

Last Updated : Apr 10, 2024, 10:34 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.