ETV Bharat / politics

"एकेका मतदारसंघात 100 कोटी रुपये खर्च होण्याची शक्यता"- बच्चू कडूंचं निवडणुकीपूर्वी मोठं वक्तव्य - Bachchu Kadu

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : 2 hours ago

Bachchu Kadu Criticized Mahayuti and MVA : छत्रपती संभाजीनगरमध्ये गुरुवारी (26 सप्टेंबर) तिसऱ्या आघाडीचा (परिवर्तन आघाडी) सहभागी पक्ष पदाधिकाऱ्यांचा संयुक्त मेळावा पार पडला. या मेळाव्याला प्रहारचे बच्चू कडू, माजी खासदार संभाजीराजे छत्रपती आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सर्वेसर्वा राजू शेट्टी उपस्थित होते. यावेळी तिन्ही नेत्यांनी महाविकास आघाडीसह महायुतीवर जोरदार हल्लाबोल केला.

Bachchu Kadu criticized Mahayuti and MVA during tisari aghadi parivartan mahashakti melava at Chhatrapati Sambhajinagar
बच्चू कडू (ETV Bharat Reporter)

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) Bachchu Kadu Criticized Mahayuti and MVA : "आम्ही सतरंजी उचलणारे आहोत. पण ज्यांच्यासाठी सतरंज्या टाकल्या त्यांचं वाटोळं केल्याशिवाय हा कार्यकर्ता राहणार नाही", अशी टीका प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांनी महायुतीवर केली. छत्रपती संभाजीनगर येथे परिवर्तन आघाडीचा मेळावा घेण्यात आला. यावेळी बच्चू कडू यांच्यासह माजी खासदार संभाजीराजे छत्रपती आणि स्वाभिमानी नेते राजू शेट्टी यांनी सत्ताधारी आणि विरोधी पक्षांवर टीकास्त्र सोडलं.

मोदी सरकारनं देश खड्ड्यात घातला : यावेळी बोलत असताना बच्चू कडू म्हणाले की, "काँग्रेसवाल्यांची कोथळे बाहेर काढण्यासाठी ही सभा आहे. ज्या गडावर भेटतील त्या गडावर मारू. काँग्रेसनं स्वामीनाथन आयोग आणला. पण शिफारस मान्य केली नाही. मग, मोदी आले. त्यांनीही देश खड्ड्यात घातला. धर्मा-धर्मात भिडवणे ही यांची पॉलीसी आहे. बाप मेला तरी चालेल, पण नेता जिवंत राहिला पाहिजे, असं धोरण राज्यात चाललंय. एकेका मतदारसंघात 100 कोटी रुपये खर्च होण्याची शक्यता आहे. आम्ही छत्रपतींचे भक्त आहोत. ज्यानं शेतमालाला भाव दिला नाही, त्यांना आमचं मत नाही. काँग्रेसला वाटतं दलित, मुस्लिम आमच्यासोबत आहेत. भाजपाला वाटतं हिंदू आमच्यासोबत आहेत. पण आमच्यासोबत शेतमजूर आहेत."

दोन पक्षांचे खुर्द बुद्रुक असे भाग झाले : तिसऱ्या आघाडीच्या परिवर्तन महाशक्ती मेळाव्यात बोलताना संभाजीराजे छत्रपती यांनी राज्यातील सद्य परिस्थितीवर भाष्य करत महायुती आणि मविआवर सडकून टीका केली. ते म्हणाले, "राज्यात आता राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्षात खुर्द आणि राष्ट्रवादी बुद्रुक झालं. पण हे लोकांच्या प्रश्नासाठी खुर्द आणि बुद्रुक झाले नाही, तर स्वतःच्या स्वार्थासाठी असे झालेत. 75 वर्षे होऊनही तेच प्रश्न आहेत. आरोग्यमंत्र्यांच्या गावातील आरोग्यकेंद्रात इतकी घाण होती की, मी थांबू शकत नव्हतो. माझं यांना आव्हान आहे की, माझ्यासमोर बसून सांगा, किल्ल्यासाठी किती पैसे दिले? साडेचारशे कोटी खर्च करतो म्हणाले, पण किती केले सांगा? राजकोट किल्ल्यावर शिवरायांचा पुतळा बसवला, तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहलं होतं. 12 डिसेंबर रोजी सांगितलं की, योग्य पद्धतीनं काम झालं नाही. मात्र, तेव्हा कुणी काही बोललं नाही. विरोधक गप्प बसले होते", असे संभाजीराजे म्हणाले.

आधी तुमचा मुख्यमंत्री कोण हे सांगा : "महाविकास आघाडीत मुख्यमंत्री चार-चार महिने भेटत नव्हते. महायुतीत यांचं एकमत नाही. राजकारण चाललंय की टोळीयुद्ध? असा प्रश्न उपस्थित होतोय. एकमेकांचा पाणउतारा करण्यात याचा पूर्ण वेळ चाललाय. महाराष्ट्रात सर्वाधिक बेरोजगारी आहे. पण त्यांच्यासाठी यांनी काय केलं? सर्वच पक्ष आलटून-पालटून सत्तेत गेले. मात्र, यांनी काय केलं? महाविकास आघाडीनं सांगावं, पावसात भिजत तुम्ही सांगितलं आम्ही शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी एकत्र आलो आहोत. पण, पावसाच्या पाण्यात ढेकूळ जसं विरघळून जातं तसं तुमचं आश्वासन विरघळून गेलंय", असं म्हणत स्वाभिमानी नेते राजू शेट्टी यांनी शरद पवारांवर निशाणा साधला.

हेही वाचा -

  1. "तिसरी आघाडी तयार केली तर लोक सुपारीबाज पक्ष म्हणून बघतील..." रोहित पवार यांची टीका - Rohit Pawar news
  2. बच्चू कडूंची महायुतीला सोडचिठ्ठी; तिसऱ्या आघाडीचं नाव ठरलं 'परिवर्तन महाशक्ती', 288 जागांवर लढवणार निवडणूक - Third Alliance In Maharashtra
  3. दिव्यांगांच्या विविध मागण्यांसाठी बच्चू कडू यांचं भर पावसात आंदोलन... पाहा व्हिडिओ - Bacchu Kadu

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.