ETV Bharat / politics

आम्हाला राज्य नाही तर सेवा करायचीय; अनुराग ठाकुर यांचं उद्धव ठाकरेंना प्रतिउत्तर - Anurag Thakur

Anurag Thakur : देशातील लोक काँग्रेस पक्षाला मतदान करण्यासाठी इच्छुक नसल्याचं म्हणत भाजपा नेते अनुराग ठाकुर यांनी विरोधी पक्षावर हल्लाबोल केलाय. ते आज नागपूर दौऱ्यावर होते.

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 13, 2024, 3:10 PM IST

Anurag Thakur On Uddhav Thackeray
अनुराग ठाकुर यांचं उद्धव ठाकरेंना प्रतिउत्तर
प्रतिक्रिया देताना अनुराग ठाकुर

नागपूर Anurag Thakur : भारतीय जनता पक्षाची हवा संपूर्ण देशात असल्याचा दावा भाजपाचे नेते अनुराग ठाकुर यांनी केलाय. देशातील लोकांना माहीत आहे की, आम्ही इमानदारीनं काम करतोय. मागील 10 वर्षात लोकांनी बघितलं आहे की, गरिबांसाठी कल्याणकारी योजनांच्या (PM Garib Kalyan Yojan) माध्यमातून लोकांचा विकास करतोय. ज्यावेळी काँग्रेस विरुद्ध भाजपा अशी तुलना करतात तेव्हा त्यांना स्पष्ट दिसतं की, भाजपानं गरिबांचं कल्याण आणि देशाचा विकास केलाय. दुसरीकडं काँग्रेस परिवारवाद, जातीवाद तुष्टीकरणाचं राजकारण करत आहे. म्हणून देशातील लोक काँग्रेस पक्षाला मतदान करण्यासाठी इच्छुक नसल्याची प्रतिक्रिया ठाकुर यांनी दिलीय.

आम्हाला राज्य नाही तर सेवा करायची आहे : आम्ही 2014 ते 2019 मध्ये जनतेसमोर गेलो, आमचा उद्देश जनतेची सेवा करणं हाच होता. तेव्हा लोकांनी आम्हाला पूर्ण बहुमत दिलं होतं. आता 2024 मध्ये आम्ही जनतेसमोर जात असताना, आमचा उद्देश सेवाभावचं आहे. तर दुसरीकडं उद्धव ठाकरे यांच्या शब्दातून कळतं की, त्यांना देशात राज्य करण्याची इच्छा आहे. तर आम्ही सेवाभाव करण्याची गोष्ट करतोय.

६२ वेळा संविधानात संशोधन करणारे भाजपावर आरोप करतात : काँग्रेसकडं ज्यावेळी काही बोलण्यासाठी उरत नाही तेव्हा ते भाजपावर बोलतात. काँग्रेसनं एक दोनदा नाही तर तब्बल 62 वेळा संविधानात संशोधन केल्याचा आरोप अनुराग ठाकुर यांनी केलाय. काँग्रेसनं डॉ. बाबासाहेबांचा एकदा नाही तर अनेकदा अपमान करून त्यांना पक्षाच्या बाहेर काढलं होतं. या उलट नरेंद्र मोदी ज्यावेळी भारतीय संसदेत पहिल्यांदा गेले तेव्हा त्यांनी संविधानावर डोकं टेकवून सांगितलं होतं की, "सबका साथ सबका विकास" करणार.

तेव्हा कळतं की विष कसं पसरतं : काँग्रेसचं सरकार गेल्यानंतर बाबासाहेबांना सन्मान मिळाला, हे विसरायल नको असं देखील अनुराग ठाकुर म्हणाले. नरेंद्र मोदी विनाशकारी विष असल्याची टीका संजय राऊत यांनी केली. त्याला उत्तर देताना अनुराग ठाकुर म्हणाले की, विष कसं पसरलं जातंय हे संजय राऊत यांच्या बोलण्यावरून दिसून येतय. दरवेळेस सकाळी ते काही वेगळं नाही तर हेच करत असतात.

हेही वाचा -

  1. माढ्याचा उमेदवार मोहिते पाटील कुटुंबातीलच, कधी होणार मोहिते पाटलांचा पक्षप्रवेश, खुद्द शरद पवारांनीच सांगितलं - Madha Lok Sabha Constituency
  2. युक्रेनमधून 20 हजार मुलं परत आली, ही मोदींची गॅरंटी : परराष्ट्र मंत्री एस जयशंकर - EAM S Jayshankar
  3. नाक रगडण्यासाठी मातोश्रीवर आला होतात, कोण नकली, कोण असली हे ठरवणारे तुम्ही कोण- राऊतांचा अमित शाह यांच्यावर हल्लाबोल - Sanjay Raut News

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.