ETV Bharat / politics

Anil Parab On Eknath Shinde : खासदारांना उमेदवारी मिळाली नाही तर राजीनामा देणार का? अनिल परब यांचा मुख्यमंत्र्यांना खोचक सवाल - Loksabha Election 2024

Anil Parab On Eknath Shinde : शिवसेनेत फूट पडल्यानंतर सोबत आलेल्या खासदार, आमदारांना निवडून आणेन, अन्यथा राजीनामा देईन असा छातीठोक दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी केला होता. आता लोकसभेच्या निवडणुकीत भाजपाने सर्वाधिक जागांसाठी आग्रह धरला आहे. त्यामुळं निवडून आणणं सोडा, विद्यमान खासदारांना उमेदवारी मिळाली नाही तर शिंदे राजीनामा देणार का? असा खोचक टोला शिवसेना (ठाकरे) नेते अनिल परब यांनी पत्रकार परिषदेत लगावला.

Anil Parab On Eknath Shinde
अनिल परब यांचा मुख्यमंत्र्यांना खोचक सवाल
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 13, 2024, 9:30 PM IST

मुंबई Anil Parab On Eknath Shinde : लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात मिशन ४५ चा नारा भाजपानं दिला आहे. या पार्श्वभूमीवर भाजपाचा सर्वाधिक जागा पारड्यात पाडून घेण्याचा प्रयत्न आहे. शिवसेना, भाजपा आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस या महायुतीत जागा वाटपाचा तिढा निर्माण झाला आहे. दिल्ली स्तरावरून देखील यावर अद्याप तोडगा निघालेला नाही. शिवसेना (ठाकरे) नेते अनिल परब यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde )यांना लक्ष्य केलं. सेनेत फूट पडल्यानंतर बाळासाहेबांनी कधी झुकायला शिकवलं नाही. आम्ही कोणासमोर झुकणार नाही. सोबत आलेल्या सर्वच आमदार, खासदारांना मोठ्या संख्याबळानं निवडून आणणार, अन्यथा राजीनामा देईन अशी घोषणा केली होती. परंतु सध्या महायुतीतील जागा वाटपाच्या चर्चेवरून शिंदेंनी खासदारांना निवडून आणणं सोडा, विद्यमान खासदारांना उमेदवारी मिळवून द्यावी. नाही तर थेट राजीनामा द्यावा, अशी मागणी परब यांनी केलीय.

तर दिघे यांचा फोटो काढून टाकावा : दिवंगत नेते आनंद दिघे यांनी बाळासाहेबांना गळ घालून ठाणे हा मतदार संघ शिवसेनेच्या ताब्यात घेतला. आजवर ही जागा शिवसेनेकडं आहे. सध्या शिंदेंच्या महायुतीत भाजपाने या जागेवर दावा ठोकला आहे. शिंदे यांनी जर ठाण्याची जागा भाजपाला दिल्यास दिघे यांचा फोटो त्यांनी कार्यालयातून यापुढे काढून टाकावा, असं परब (Anil Parab) यांनी ठणकावलं.

संजय निरुपम यांचा आटापिटा : उत्तर-पश्चिम मुंबई मतदार संघातून अमोल कीर्तीकर यांना ठाकरेंनी उमेदवारी जाहीर केल्यानंतर कॉंग्रेसचे नेते संजय निरूपम यांनी नाराजी व्यक्त केलीय. मात्र, पक्षात त्यांना काहीच स्थान नाही. निवडणूक लढविण्यासाठी त्यांचा आटापिटा सुरू असल्याचं परब म्हणाले. गजानन कीर्तीकर, आमदार रवींद्र वायकर आणि भाजपाच्या किरीट सोमैया यांचा तीव्र शब्दांत समाचार घेतला.

थीम पार्कला बाळासाहेबांचे नाव द्या : महालक्ष्मी येथील रेसकोर्सवर थीम पार्क उभारलं जात आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या नावानं हे पार्क बनविण्याचा निर्णय आम्ही घेतला होता. भाजपाने याला विरोध केला आहे. आता पुन्हा थीम पार्क बनवण्यात येत असेल तर त्याला बाळासाहेबांचं नाव द्यावं, अशी मागणी परब यांनी केलीय.

आचारसंहिता काळात एक खिडकी योजना सुरू करा : लोकसभा निवडणुकीमुळं कधीही आचारसंहिता लागू होईल. या काळात सण येत आहेत. तसंच शिवजयंती आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती येत आहेत. आचारसंहितेचा याला फटका बसू नये, याकरता लागणाऱ्या परवानगी करता एक खिडकी योजना लागू करावी, जेणेकरून हेलपाटे मारावे लागणार नाहीत. त्यामुळं निवडणूक आयोगाला या संदर्भात पत्रव्यवहार करणार असल्याचं परब यांनी सांगितलं.

हेही वाचा -

  1. MLA Anil Parab : ठाकरे गटाचे आमदार अनिल परब शिंदे गटाच्या वाटेवर; वाचा काय आहे कारण
  2. Bawankule On Padmakar Valvi : काँग्रेस नेते पद्माकर वळवी यांचा भाजपा प्रवेश; काँग्रेसला अनेक मोठे धक्के बसणार - चंद्रशेखर बावनकुळे
  3. Uddhav Thackrey News : "भाजपानं निवडणुकीसाठी उमेदवार..", आघाडीत येण्याची ऑफर दिल्यानं गडकरींचा उद्धव ठाकरेंना टोला

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.