ETV Bharat / politics

"अमरावतीत सर्वत्र तुल्यबळ लढत, आपला आमदार जनताच ठरवणार" - MAHARASHTRA ASSEMBLY ELECTION 2024

राज्यात 20 नोव्हेंबरला विधानसभा निवडणूक आहे. तर या निवडणुकीच्या निकालाकडं सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. असं असतानाच राजकीय विश्लेषकांनी याबाबत प्रतिक्रिया दिली.

Maharashtra Assembly Election 2024
सुनील देशमुख, सुलभा खोडके, जगदीश गुप्ता (File Photo)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 19, 2024, 5:13 PM IST

अमरावती : विधानसभा निवडणुकीत आपल्या मतदारसंघाच्या विकासाकरिता नेमका कोणता उमेदवार योग्य आहे हे बुधवारी मतदार ठरवणार आहेत. अमरावती जिल्ह्यात अमरावती विधानसभा मतदारसंघासह सर्वच आठही विधानसभा मतदारसंघात तुल्यबळ लढतीचं चित्र आहे. तर निवडणुकीचा प्रचार राजकीय विश्लेषक म्हणून अगदी जवळून पाहणाऱ्या वृत्तपत्र क्षेत्रातील मंडळींचं नेमकं काय आकलन आहे यासंदर्भात "ईटीव्ही भारत"चा हा रिपोर्ट.

अमरावतीत कोणाचं पारडं जड सांगणं कठीण : अमरावती विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार आणि महायुतीच्या उमेदवार सुलभा खोडके. महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. सुनील देशमुख आणि भाजपाचे बंडखोर अपक्ष उमेदवार जगदीश गुप्ता यांच्यात तुल्यबळ लढत आहे. आजच्या स्थितीपर्यंत नेमकं कोणाचं पारडं जड हे सांगता येणं फार अवघड. मात्र आता समोर काय परिस्थिती निर्माण होते यावरच निवडणुकीचं सारं गणित अवलंबून असल्याचं गिरीश येरेकर यांचं म्हणणं आहे.

प्रतिक्रिया देताना राजकीय विश्लेषक (ETV Bharat Reporter)

बंडखोरीमुळं निवडणूक रंजक : अमरावती मतदारसंघात डॉ. सुनील देशमुख आणि सुलभा खोडके यांच्यात थेट लढत होईल असंच वाटत होतं. मात्र भाजपाशी बंडखोरी करत जगदीश गुप्ता हे अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात उतरले. त्यांनी हिंदुत्वाची साद घातली आणि ही निवडणूक खरंतर रंजक वळणावर आणली. जगदीश गुप्ता यांच्या उमेदवारीमुळं महायुतीला काहीसा धक्का बसेल असं वाटतं असताना, मतदारसंघातील मुस्लिम आणि दलित मतदार हे नेमके काय निर्णय घेतील यावर देखील बरसं चित्र अवलंबून असल्याचं शैलेश धुंदी यांनी सांगितलं.

पक्षात गटबाजी, मतदारांचं मौन : यावेळी निवडणुकीत अनेक पक्षांमध्ये बंडखोरी झाली. यासह पक्षांतर्गत विरोधी काम मोठ्या प्रमाणात आठही विधानसभा मतदारसंघात झालेल्या दिसतात. यामुळं सर्वच मतदारसंघात कुठे तिहेरी तर कुठे चौरंगी लढत पाहायला मिळते. या परिस्थित निवडणुक ही रंजक वळणावर आली असून नेमकं कोण निवडून येईल हे आता अजिबात सांगता येत नाही. या सर्व धामधुमीत मतदार मात्र मौन आहे. यामुळं देखील नेमकं कोण बाजी मारेल याचा अंदाज लागणं कठीण असल्याचं प्रवीण कपिले म्हणाले.

असं आहे मतदारसंघाचं चित्र : अमरावती विधानसभा मतदारसंघात सुलभा खोडके, सुनील देशमुख आणि जगदीश गुप्ता अशा तिहेरी लढतीचं चित्र आहे. तिन्ही उमेदवारांनी प्रचारात आघाडी घेतली असताना मतदार कोणाला कौल देईल याचा अंदाज लावणं कठीण आहे. मतदारसंघात एकूण तीन मुस्लिम उमेदवार निवडणूक रिंगणात असून या तिघांच्या बाजूनं किती मतदार जातील यावर खरं तर तीनही मुख्य उमेदवारांचे भवितव्य अवलंबून आहे असं राजकीय विश्लेषक म्हणतात.

मतदानाच्या माध्यमातूनच चित्र होणार स्पष्ट : बडनेरा विधानसभा मतदारसंघात रवी राणा यांच्याविरुद्ध अपक्ष उमेदवार प्रीती बंड यांचं तगड आव्हान दिसत आहे. तिवसा विधानसभा मतदारसंघात यशोमती ठाकूर यांची लढत महायुतीचे राजेश वानखडे यांच्यासोबत आहे. अचलपूर विधानसभा मतदारसंघात बच्चू कडू यांच्या विरोधात काँग्रेसचे बबलू देशमुख आणि भाजपाचे प्रवीण तायडे हे उमेदवार असून अचलपूर मध्ये तिहेरी लढत पाहायला मिळते. मेळघाट, दर्यापूर, मोर्शी, धामणगाव रेल्वे या मतदारसंघात देखील नेमकं कोण बाजी मारणार याचा अंदाज येणं कठीण असून आता मतदाराच त्यांना जो आमदार हवा त्याचा निर्णय मतदानाच्या माध्यमातूनच स्पष्ट करतील.

हेही वाचा -

  1. नालासोपाऱ्यात बहुजन विकास आघाडी आणि भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा; पैसे वाटल्याचा आरोप, विनोद तावडेंना घेरलं
  2. अनिल देशमुख यांच्या वाहनावर 'इतक्या' जणांनी केलीदगडफेक; नारे लावत गेले निघून, तक्रारीत नमूद केला 'हा' घटनाक्रम
  3. मतदान कार्ड जमा करुन लोकशाहीचा हक्क न बजाविण्यासाठी दिले पैसे? दोघांना अटक

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.