नवी दिल्ली Ajit Pawar On Sharad Pawar : लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीला जोरदार फटका बसला. त्यानंतर आता विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीनं पुन्हा एकदा तयारी सुरू केलीय. याच पार्श्वभूमी उपमुख्यमंत्री अजित पवारांनीदेखील महाराष्ट्र दौरा सुरू केलाय. अशा परिस्थितीत अजित पवार यांना एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत विविध राजकीय मुद्द्यांवर मत व्यक्त केलं आहे.
काय म्हणाले अजित पवार? : एका मुलाखतीदरम्यान बारामतीत शरद पवार यांच्यासोबत पुन्हा जाणार का? असा सवाल अजित पवार यांना विचारण्यात आला. तेव्हा अजित पवार यांनी 'नो कमेंट्स' असं उत्तर दिलं. "माझी शरद पवारांशी स्पर्धा नाही. मी माझ्या हिशोबानं पुढं जातोय. ते त्यांच्या हिशोबानं पुढं जात आहेत. शरद पवारांना लोक ज्येष्ठ नेते म्हणून पाहतात. यापुढील काळातही आम्ही त्यांचा आदर करत राहू, असं आम्ही ठरवलंय. शरद पवार जवळपास 62 वर्षे राजकारणात आहे. दोन-तीन पिढ्यांनी त्यांचं राजकारण पाहिलंय."
सुप्रिया सुळे आणि शरद पवार यांची राजकारणाची शैलीसारखी नाही. प्रत्येक पिढीमध्ये बदल होत असतात. सुप्रियाला जे योग्य वाटतं ते करते. शरद पवार नेहमीच तरुण पिढीला जवळ ठेवण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्याशी संवाद साधतात. काळाशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करतात- उपमुख्यमंत्री अजित पवार
- महायुतीत मतभेद नाही : महायुतीत मतभेद आहेत का? असा सवाल अजित पवार यांना विचारला गेला. तेव्हा अजित पवारांनी महायुतीत मतभेद नसल्याचं स्पष्ट सांगितलं.
अजित पवारांच्या वक्तव्यावरून राजकीय वर्तुळात चर्चा- अजित पवार यांनी राज्यात आढावा बैठका, सभा घेत आगामी निवडणुकीसंदर्भात उमेदवारांची आणि मतदारसंघाची चाचपणी सुरू केली आहे. त्यात दोन दिवसांपूर्वी, बारामती लोकसभा निवडणुकीत पत्नी सुनेत्रा पवार यांना बहीण सुप्रिया सुळे यांच्या विरोधात उमेदवारी देऊन चूक केल्याची कबुली अजित पवार यांनी दिली होती. राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये फूट पडल्यापासून अजित पवार आणि शरद पवार यांचे दोन्ही गट पुन्हा एकत्र येतील का? असा प्रश्न राज्याच्या राजकारणात कायम चर्चेत असतो. काही दिवसांपूर्वी शरद पवारांनाही प्रश्न विचारण्यात आला होता. "अजित पवारांना पुन्हा पक्षात घेतलं जाईल का? यावर शरद पवार म्हणाले, "हा निर्णय माझ्या एकट्याचा नसेल. संकट काळात साथ दिलेल्या पक्षातील सर्व नेत्यांशी चर्चा करून यासंदर्भातील निर्णय घेतला जाईल." त्यानंतर आता या मुद्द्यावर अजित पवारांनी थेट उत्तर देण्याचं टाळलं आहे.
त्यांना बोलण्याचा अधिकार नाही- सुषमा अंधारे- निवडणुका न लढता उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्याचं वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत केले. त्यावर शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी सडेतोड उत्तर दिलं आहे. सुनेत्रा पवार यांचा बारामती लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर त्यांची राज्यसभेतून खासदार म्हणून वर्णी लावण्यात आली. यावरून सुषमा अंधारे यांनी नाव न घेता अजित पवारांना टोला लगावला आहे. सुषमा अंधारे यांनी म्हटलं," त्यांना आठवण करून दिली पाहिजे की लोकसभेत नाकारल्यानंतर राज्यसभेत पाठवायची तयारी करण्यात आली. अशा व्यक्तींना इतरांवर बोलण्याचा अधिकार प्राप्त होतो का?"
हेही वाचा -
- 'बारामतीत मला रस नाही'; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची धक्कादायक माहिती, विधानसभेबाबत सूचक विधान - Ajit Pawar On Assembly Election
- सुनेत्रा पवार-सुप्रिया सुळे यांच्या लोकसभा लढतीवर अजित पवारांची मोठी प्रतिक्रिया, "ती माझी चूक.." - Ajit Pawar News
- "मुंबई नाशिक महामार्गावरील वाहतूक दहा दिवसात सुरळीत करा, अन्यथा...", अजित पवारांचा अधिकाऱ्यांना इशारा - Mumbai Nashik Highway issue