ETV Bharat / politics

अहमदनगरात निलेश लंके विरुद्ध सुजय विखे लढतीत आणखी एका 'निलेश लंके'ची उडी; रोहित पवारांचा विखेंवर हल्लाबोल - Lok Sabha election - LOK SABHA ELECTION

Lok Sabha election 2024 : अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे निलेश लंके विरुद्ध भाजपाचे सुजय विखे यांच्यात थेट लढत होणार हे स्पष्ट असताना अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी अपक्ष उमेदवार निलेश लंके यांनी अर्ज भरत ट्विस्ट निर्माण केलाय. यावरुन अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचं राजकारण तापलं असून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून भाजपावर निशाणा साधलाय.

Lok Sabha election 2024
अहमदनगरात निलेश लंके विरुद्ध सुजय विखे लढतीत आणखी एका 'निलेश लंके'ची उडी; रोहित पवारांचा विखेंवर हल्लाबोल
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 27, 2024, 1:20 PM IST

मुंबई Lok Sabha election 2024 : महाराष्ट्रात पहिल्या, दुसऱ्या टप्प्यातील लोकसभा निवडणूक मतदान प्रक्रिया आटोपल्यानंतर तिसऱ्या आणि चौथ्या टप्प्यात होणाऱ्या दिग्गजांच्या लढतीकडं सर्वांचं लक्ष लागलंय. अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे निलेश लंके विरुद्ध भाजपाचे सुजय विखे यांच्यात थेट लढत होणार स्पष्ट असताना अर्ज भरण्याची शेवटच्या दिवशी अपक्ष उमेदवार निलेश लंकेंनी अर्ज भरत ट्विस्ट निर्माण केलाय. अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचं राजकारण तापलं असून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून भाजपावर निशाणा साधलाय.

दोन निलेश लंकेंचे अर्ज : मे महिन्यातील 13 तारखेला महाराष्ट्रात चौथ्या टप्प्यात लोकसभा निवडणूक मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात 13 तारखेला मतदान होणार आहे. त्या अनुषंगानं उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत शुक्रवारी संपलीय. मतदारसंघात महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाचे उमेदवार निलेश लंके आणि महायुतीकडून भाजपाचे उमेदवार सुजय विखे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. मतदारसंघात जवळजवळ विखे विरुद्ध लंके अशी लढत राहणार आहे. मात्र उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी निलेश साहेबराव लंके यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलाय. अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात दोन निलेश लंके आणि सुजय विखे असा सामना रंगणार आहे.

सुजय विखेंवर टीका : अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील अपक्ष निलेश लंके यांनी एन्ट्री केल्यामुळं मतदारसंघातील राजकारण तापलंय. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार निलेश लंके यांच्यासह जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी भाजपा उमेदवार सुजय विखे यांच्यावर टीका केली. आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनीदेखील यात उडी घेत सोशल मीडियाच्या माध्यमातून सुजय विखे यांच्यावर हल्लाबोल केलाय.

रोहित पवार यांची पोस्ट काय : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून सुजय विखे यांच्यावर निशाणा साधलाय. माझे मित्र डॉ सुजय विखे पाटील आपल्या विजयासाठी डमी उमेदवाराचा आधार घ्यावा लागतोय यावरुनच नगर लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीचा निर्णय स्पष्ट होतोय. त्यामुळं पराभवाची नामुष्की पत्करण्यापेक्षा उमेदवारी अर्ज मागं घेतला तर सन्मान राहील, असा टोला रोहित पवारांनी सुजय विखे यांना लगावलाय. तसंच हा मित्राचा सल्ला असल्याचं रोहित पवारांनी म्हटलंय.

43 उमेदवारी अर्ज दाखल : अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून 43 उमेदवारांचे अर्ज दाखल झाले आहेत. महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश ज्ञानदेव लंके हे असून निलेश साहेबराव लंके असं अपक्ष उमेदवाराचं नाव आहे. त्यामुळं मतदारांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवाराला मत देण्याऐवजी अपक्ष उमेदवारला मत जाण्याची भीती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला आहे. राजकारणात अनेक ठिकाणी दिग्गज नावांनी सादर असलेल्या उमेदवारांना निवडणुकीत उतरवलं जात असतं. 2014 साली रायगड लोकसभा मतदारसंघात देखील आनंद गीते यांच्या विरोधात दोन सुनील तटकरे असल्यानं तेंव्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुनील तटकरे यांना दोन हजार मतांनी पराभव पत्करावा लागला होता, तर त्यांच्या नावासारखे नाव असलेले सुनील तटकरे यांना 11 हजार मतं पडली होती.

हेही वाचा :

  1. विरोधकांच्या रावण रूपी लंकेचे दहन करा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे आवाहन; राहुल गांधींनाही लगावला टोला - Sujay Vikhe Election Assembly
  2. ठरलं! नगरमधून विखेंविरुद्ध लंकेंची फाईट; होईल का टाईट? - Sujay Vikhe Vs Nilesh Lanke

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.