नाशिक Aaditya Thackeray Manmad Speech : मनमाड नांदगाव विधानसभा क्षेत्रात आज (22 ऑगस्ट) शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांची 'महाराष्ट्र स्वाभिमान सभा' पार पडली. या सभेदरम्यान आदित्य ठाकरेंनी महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. "जनतेला भूलथापा देण्याचं काम भाजपा आणि मिंदे सरकार करत असून या भूलथापांना बळी न पडता जनतेनं या सरकारला त्यांची जागा दाखवावी," असं आवाहन आदित्य ठाकरेंनी केलं.
नेमकं काय म्हणाले आदित्य ठाकरे? : बदलापूरमधील शाळेतील मुलींवरील अत्याचाराच्या घटनेवरून आदित्य ठाकरे यांनी भाजपा आणि शिवसेना शिंदे पक्षावर टीका केली. आदित्य ठाकरे म्हणाले,"भाजपा दहा वर्षांपूर्वी पंधरा लाख रुपयांबद्दल बोलत होती. तिच भाजपा आता पंधराशे रुपयांवर आली. आमदारकी, मंत्री पद आणि अजून बरंच काही स्वीकारून स्वतःच्या स्वार्थासाठी उद्धव ठाकरेंसोबत गद्दारी करणारा मिंदे तुमचा लाडका भाऊ होऊ शकतो का? चार वर्षाच्या मुलींवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या भाजपाच्या कार्यकर्त्याला पाठीशी घालणारा तुमचा लाडका भाऊ होऊ शकतो का? गर्भवती महिलेला दहा तास पोलीस ठाण्यात बसवून ठेवणारा लाडका भाऊ होऊ शकतो का?", असा संतप्त सवालही त्यांनी केला.
'लाडकी बहीण योजना' केवळ निवडणूक स्टंट : पुढं ते म्हणाले की, "भाजपा-शिंदे सरकार हे लबाड लोकांचं सरकार आहे. ते कुणालाही पैसे देत नाहीत. उलट पैसे घेऊन ते गद्दारी करतात. त्यांच्या नावावर गद्दार असा शिक्का आहे. भाजपासोबत जाऊन ते खोटं बोला, पण रेटून बोला हेदेखील चांगल्याप्रकारे शिकलेत. लाडकी बहीण योजना ही केवळ निवडणूक स्टंट आहे. निवडणूक होताच या योजेतून अनेक महिलांना डावलण्यात येईल. याशिवाय पुन्हा परत पैसेही मिळणार नाहीत", असा दावा ठाकरेंनी केला.
- आदित्य ठाकरे यांच्या ताफ्यातील वाहनाला अपघात : आदित्य ठाकरेंचा ताफा मनमाड शहरात पोहोचला असताना त्यांच्या ताफ्यातील एका कारला दुचाकीस्वारानं धडक दिली होती. यात दुचाकीस्वार किरकोळ जखमी झाला. तर कारचं मोठं नुकसान झालंय.
हेही वाचा -
- अजित पवारांच्या जनसन्मान यात्रेत भाजपानं दाखवले काळे झेंडे; आदित्य ठाकरे म्हणाले, "महायुतीत ताळमेळ..." - Aaditya Thackeray News
- 'मनसे हा सुपारीबाज पक्ष...,' आदित्य ठाकरेंचा टोला - Aditya Thackeray Pune Visit
- मुंबईच्या रस्त्यांवरील खड्ड्यांवर आणि भ्रष्ट कंत्राटदारांवर आदित्य ठाकरेंचा संताप; दिला 'हा' इशारा - Aaditya Thackeray Mumbai PC