हैदराबाद World Photography Day 2024 : आजकाल बहुतेक लोकांना त्यांच्या आयुष्याशी संबंधित प्रत्येक अपडेट सोशल मीडियावर शेअर करायला आवडतं. तुम्हाला प्रवास करताना वेगवेगळ्या ठिकाणांची सुंदर छायाचित्रे क्लिक करायला आवडत असतील. प्रत्येकाच्या आयुष्यात फोटो खूप महत्त्वाचे असतात. लोक आपला इतिहास केवळ छायाचित्रांमधूनच पाहत आले आहेत. फोटो प्रत्येकासाठी खास असतात. दरवर्षी १९ ऑगस्ट रोजी छायाचित्रण दिन साजरा केला जातो. हा दिवस प्रत्येकासाठीच महत्वाचा आहे.
छायाचित्रण दिनाचा इतिहास : वर्ल्ड फोटोग्राफी डे साजरा करण्याची सुरुवात फ्रान्समध्ये १८३७ मध्ये झाली. फ्रान्सचे जोसेफ निसेफोर आणि लुई डग्युरे यांनी त्यावर्षी १९ ऑगस्ट रोजी याची सुरुवात केली. त्यानंतर तेथील सरकारने हा दिवस साजरा करण्याची घोषणा केली होती. तेव्हापासून दरवर्षी १९ ऑगस्ट रोजी जागतिक छायाचित्रण दिन साजरा केला जातो.
छायाचित्रण दिनाची सुरुवात : आजच्या युगात फोटोग्राफर फोटो काढण्यासाठी एकापेक्षा एक अत्याधुनिक तंत्रज्ञान असलेल्या कॅमेऱ्यांचा वापर करतात. याशिवाय फोटो काढण्यासाठी आता प्रत्येकाकडे स्मार्ट फोन आहेत. त्यामुळे आज फोटो काढणे ही गोष्ट खूप सोपी झाली. मात्र, पूर्वी फोटो काढणे खूप कठीण काम होतं. १८३९ मध्ये रॉबर्ट कॉर्नेलियसने आपल्या वडिलांच्या दुकानाचा फोटो काढण्यासाठी कॅमेरा लावला होता. त्यानंतर दुकानाचा फोटो त्यांनी क्लिक केला आणि ३ मिनिटांनी एक फोटो बाहेर आला. त्यानंतर हळूहळू फोटो काढण्याची सुरुवात होऊ लागली.
छायाचित्रण दिनाचा उद्देश : छायाचित्रण दिन साजरा करण्यामागचा उद्देश छायाचित्रण कलेला प्रोत्साहन देणे हा आहे. त्यानिमित्त या दिवशी अनेक प्रकारचे कार्यक्रम आयोजित केले जातात आणि छायाचित्रण प्रदर्शनही आयोजित केलं जातं, ज्याद्वारे देशातील प्रसिद्ध छायाचित्रकारांनी क्लिक केलेले दुर्मीळ फोटो या कार्यक्रमात प्रदर्शित केले जातात.