ETV Bharat / opinion

पाकिस्तानमध्ये सत्तास्थापनेची काय आहेत गणितं? सैन्यदल बजाविणार आहे महत्त्वाची भूमिका

Pakistan Elections Result : नुकत्याच झालेल्या पाकिस्तानच्या निवडणुका आतापर्यंत समोर आलेल्या निकालांनी पाकिस्तानच्या राजकीय व्यवस्थेसाठी काही मोठी आव्हाने उभी केली आहेत. विरोधकांनी इम्रान खान यांच्या गंभीर आरोप करून लोकशाहीचा गळा घेटण्याचा प्रयत्न केलाय. याबाबत ज्येष्ठ पत्रकार संजय कपूर यांनी पाकिस्तानी सैन्यदलाची भूमिका आणि नवाझ शरीफ यांची सत्ता याचं विश्लेषण केलं आहे.

Pakistan Elections Result
Pakistan Elections Result
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 11, 2024, 7:35 PM IST

हैद्राबाद Pakistan Elections Result: पाकिस्तानच्या सार्वत्रिक निवडणुकाच्या निकालांनी सर्वांनाच आश्चर्यचकित केलंय आहे. पाकिस्तानच्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये नवाझ शरीफ यांच्या पाकिस्तान मुस्लिम लीग (नवाझ) पक्षानं निवडणूक जिंकल्याचं जाहीर केलं आहे. तर दुसरीकडं तुरुंगात असलेल्या इम्रान खान यांनीही X या सोशल मीडियाच्या माध्यमातून ही निवडणूक जिंकल्याचा दावा केला आहे. या पार्श्वभूमीवर या निवडणुकीचा काय आहे निकाल? सत्तास्थापनेचे काय गणित? याबद्दल आपण माहिती घोणार आहोत.

पाकिस्तानच्या सार्वत्रिक निवडणुकीत मतदारांनी प्रथम इम्रान खानच्या पाकिस्तान तहरीक इन्साफचं (पीटीआय) समर्थन केलेल्या अपक्ष उमेदवारांना पाठिंबा दिल्याचं दिसून आलं आहे. पीटीआयच्या नेत्याला तुरुंगात टाकून, पक्षाला निवडणूक लढवण्यावर बंदी घालण्यात आली होती. पीटीआय पक्षाचं चिन्ह काढून घेण्यापासून तर, इम्रान खान यांना 20 वर्षे तुरुंगात टाकण्याच्या प्रकरणांमध्ये पीटीआयला निवडणुकीत सहभागी होण्यापासून रोखण्यासाठी सैन्यदलाच्या नेतृत्वाखालील जोरदार प्रयत्नांनंतरही इम्रान यांच्या पक्षाच्या पारड्यात लोकांनी भरघोस मत टाकली आहेत. याबात पाकिस्तानच्या आघाडीच्या असललेल्या माध्यमानं सैन्यदलावर कडाडून टीका केली. त्या माध्यमानं म्हटलं की, " सैन्यदलानं हे लक्षात घेतलं पाहिजे की नागरी व्यवहारात हस्तक्षेप करणं आता मतदारांना मान्य नाही." या निकालांच्या धक्क्यानं सैन्याला धक्का बसला असेल. परंतु पीटीआयच्या नेतृत्वाखालील अपक्षांना सत्तेत येण्यापासून रोखण्यासाठी विरोधक सर्व प्रयत्न करतील असं दिसंतय.

पैशांची ऑफर देऊन घोडेबाजार - निवडणुकीत पीटीआयच्या समर्थित अपक्ष उमेदवारांनी 92 जागा जिंकल्या आहेत. तर, पाकिस्तान मुस्लिम लीगच्या उमेदवारांना 71 जागांवर समाधान मानावं लागलंय. नवाझ शरीफ यांच्या पीएमएल (एन) तसंच पाकिस्तान पीपल्स पार्टी (पीपीपी) यांनी बहुमताचा दावा केला आहे. तसंच त्यांनी पाकिस्तानात सरकार स्थापन करण्याचा दावा केला आहे. निवडणूक लढवलेल्या तसंच जिंकलेल्या अपक्षांना मोठ्या पैशांची ऑफर देऊन घोडेबाजार केल्याच्या बातम्या पाकिस्तानमधील माध्यम देत आहेत. दरम्यान, आंतरराष्ट्रीय समुदायानं पाकिस्तानमध्ये कथित अनियमिततेच्या मतदानाचा निषेध केला आहे. पीटीआयनं इम्रान खानच्या पदच्युतीला पाश्चिमात्य देशांनी पाठिंबा दिल्याचा आरोप केला असला तरी, अमेरिका, ब्रिटन, ईयूनं 8 फेब्रुवारीच्या मतदानाच्या अनियमिततेच्या चौकशीची मागणी केली आहे. पाकिस्तानमध्ये निवडणुका कशा आयोजित केल्या, याचा आंतराष्ट्रीय समुदायानं पुरावा मागितला आहे.

सैन्यदलाकडून निवडणुकीत हस्तक्षेप- पाकिस्तानच्या निवडणूक आयोगानं (ECP) निकाल जाहीर करण्यासाठी वेळ घेतल्यावर अनेक माध्यामांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली होती. इंटरनेट तसंच मोबाईल बंदीवरही टीका करण्यात आली होती. नवाझ शरीफ यांच्या पीएमएल (एन), पीपीपीला फायदा मिळवून देण्यासाठी निकाल जाहीर करण्यात उशीर झाल्याचा त्यांचा दावा करण्यात आला आहे. सैन्यदलानं हस्तक्षेप केला नसता, तर त्यांचे अनेक उमेदवार पराभूत झाले असते. निकालांनं हे सिद्ध केलं आहे, की शक्तिशाली गटांनी केलेली कोणतीही हेराफेरी मतदारांना त्यांचा राग व्यक्त करण्यापासून रोखू शकत नाही. मतदारांना सत्तास्थापनेच्या भीतीनं वेठीस धरता आलं नाही. इम्रान खान भलेही चांगले प्रशासक नसतील, पण पाकिस्तानसाठी त्यांचं प्रेम कायम दिसून येतंय. तसंच ते एक सद्बुद्धी असलेले व्यक्ती म्हणून परिचीत आहेत. मात्र, अशीच प्रतिष्ठा नवाझ शरीफ तसंच झरदारींना लाभलेली नाही.

लोकांना समस्या सोडविण्याकरिता हवी आहे जादूची कांडी- नवाझ शरीफ तसंच बिलावल-झरदारी यांचं युतीचं सरकार पाकिस्तानात येण्याची दाट शक्यता आहे. सध्याचे पाकिस्तानचे सैन्यदलाचे जनरल असीम मुनीर यांच्या नेतृत्वाखालील सैन्य नक्कीच त्यांना पाठीशी घालेल. कारण या निवडणुकांमध्ये मतदान करणाऱ्यांपैकी बहुसंख्य लोक त्यांच्या विरोधात होते. पाकिस्तानचं सैन्यदल अनेक अर्थानं प्रत्येक राजकारण्याला कळून चुकलं आहे. पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेच्या दयनीय अवस्थेमुळं, तेथील लोक समस्या सोडवण्यासाठी जादूची कांडी शोधत आहेत. भारतासोबतचे संबंध पुन्हा दृढ करणं यावर तोडगा काढण्याची सुरुवात असू शकते. तरीही, दिल्लीतील भाजपा सरकारनं इस्लामाबादमधील संकटात सापडलेल्या सरकारला लाइफलाइन देण्यात खरोखर रस दाखवला नाही.

हे वाचलंत का :

  1. एल निनोमुळं भारताला बसणार फटका? हवामान बदलांवर परिणाम
  2. भारतात संशोधनावर खर्च वाढवण्याची गरज, ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्समध्ये भारत खूपच खालच्या स्थानी
  3. भारताच्या विकासाची गाथा, भारतात गरिबी वाढली की घटली

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.