हेदराबाद Can wait be toxic : प्रतीक्षा करायला लावणाऱ्यांपासून स्वत:ला दूर ठेवा, असं ज्येष्ठ पत्रकार तौफिक रशीद लिहितात. तुम्ही पाठवलेल्या मेसेजला २४ तासांनंतरही उत्तर न मिळाल्यास तुम्हाला चिंता वाटते का? तुमचा मूड बदलतो का, तुम्हा अपेक्षित असलेला कॉल वेळेत आला नाही तर तुम्ही अस्वस्थ होता का. नोकरीकरता पाठवलेल्या अर्जाचं काय झालं हे तुम्हाला वेळेत कळलं नाही तर तुम्ही चिंताग्रस्त होता. ही वस्तुस्थिती असेल तर ती तुम्हीच बदलू शकता. तुमच्या परीक्षेच्या निकालांची प्रतीक्षा असताना तुम्ही चिंताग्रस्त होता. डॉक्टरांच्या भेटीसाठी, शस्त्रक्रियेची तारीख ठरवण्यासाठी वेळ लागत असेल तर तुमची अस्वस्थता वाढते. थोड्याफार प्रमाणात या गोष्टी प्रत्येकानंच अनुभवलेल्या असतात. शतकानुशतके वाट पाहण्याच्या संकल्पनेवर कविता आणि पुस्तके लिहिली गेली आहेत. शास्त्रज्ञ आणि संशोधक आता म्हणतात की प्रतीक्षा करणे ही चांगली कल्पना नाही. एखाद्या व्यक्तीच्या मानसिक आरोग्यावर प्रतीक्षेचा विपरित परिणाम होऊ शकतो.
पूर्वीच्या काळात, यासंदर्भात जास्त लक्ष दिलं जात नव्हतं आणि मानसिक आरोग्यावरील अभ्यास देखील केवळ दुःखद किंवा आनंदी घटनांचा मानसिक आरोग्यावर होणाऱ्या परिणामावर केंद्रित होता. आता तज्ञांचा असा विश्वास आहे की प्रतीक्षा करणे, एखाद्या व्यक्तीसाठी किंवा एखाद्या घटनेमुळे होऊ शकते. मात्र यातून मनःस्थिती बदलते आणि चिंता वाढते. प्रतीक्षा करण्यात जस-जसा वेळ जातो तसा व्यक्तीचा मूड बदलतो, आणि चिंता वाढवू शकतो. भारतातील एक जाणकार मानसिक आरोग्य तज्ज्ञ आणि मानसोपचारतज्ज्ञ डॉ. जितेंद्र नागपाल यांनी ही माहिती दिलीय.
डॉ. नागपाल म्हणतात की प्रतीक्षा ही अस्वस्थता वाढवते आणि माणूस चिंता करू लागतो. आपले मूड बदलतात जे आपल्या आरोग्याच्या जाणिवेसाठी आणि नैराश्यासारख्या विकारांमध्ये देखील महत्वाचे आहे. वेळ निघून गेल्यावर आपला मूड कसा बदलतो? त्याचा काय परिणाम होतात यावर आता संशोधन झालं आहे, त्यातून अनेक गोष्टी समोर आल्या आहेत.
युनिव्हर्सिटी कॉलेज लंडन आणि एनआयएचच्या संशोधकांनी केलेल्या शोधनिबंधात, नेचरच्या ह्युमन बिहेवियर जर्नलमध्ये प्रकाशित झालं आहे की, सरासरी व्यक्तीचा मूड प्रति मिनिट सुमारे 2% बदलतो त्यात प्रतीक्षा कारण होते. संशोधकांनी या परिणामाला "मूड ड्रिफ्ट ओव्हर टाईम" किंवा थोडक्यात "मूड ड्रिफ्ट" म्हटलं आहे. अभ्यासात 28,000 हून अधिक लोकांना वेळोवेळी त्यांच्या मूडचे मूल्यांकन करण्यास सांगितलं. सहभागींना वाट पाहण्यास सांगण्यात आलं आणि नंतर मेंदू स्कॅन करण्यात आले. त्यातून काही निष्कर्ष निघाले आहेत.
सोप्या शब्दात सांगायचं तर, संशोधकांनी सांगितलं की प्रयोगातील सहभागींच्या एका गटाला एखाद्या कार्यापूर्वी दुसऱ्यापेक्षा जास्त वेळ प्रतीक्षा करण्यास भाग पाडले गेले तर ते कार्य अधिक वाईट मूडमध्ये सुरू करतील. यामुळे मेंदूच्या क्रियाकलाप आणि वर्तनात असे बदल होऊ शकतात की त्याचा विपरीत परिणाम कार्यावर होतोच.
2014 मध्ये एका अभ्यासात जो सायन्स मॅगझिनमध्ये प्रकाशित झाला होता, त्यात म्हटलंय की, लोक एकटे बसून विचार करण्यापेक्षा स्वतःला विजेचे झटके देण्यास प्राधान्य देतात. प्रतीक्षा केल्याने चिंता आणि मनःस्थिती का बदलते? त्यामागे खरं तर विज्ञान आहे. प्रतीक्षा ही एक प्रकारची निष्क्रियता आणि त्यातून होणारा विलंब आहे. जरी तुम्ही काहीतरी करत असला तरीही, तुमच्यातील एक भाग काही घडण्याची अपेक्षा करताना निष्क्रिय राहतो. सायकेसेंट्रल मधील एका लेखात, तज्ञ म्हणतात की मेंदूचे दोन भाग प्रतीक्षा करण्याच्या आपल्या कल्पनेमध्ये गुंतलेले आहेत - ॲमिग्डाला चिंता आणि भीती वाटत राहते, त्यातून अलार्म सिस्टम म्हणून कार्य करते, धोक्यासाठी सतत स्कॅन करते.
आणि आणखी एक म्हणजे मेंदूतील सेरेब्रल कॉर्टेक्स हे लक्ष देण्यास जबाबदार आहे, समज, भाषा आणि विचार यातून कळतात. प्रतीक्षा करण्याच्या कालावधीत मेंदू सतत कशाचा तरी विचार करत असतो; आणि मनाला अपेक्षा असते तर चिंता, भीती यांची जाणीव सतत होत असते.
मेंदू सतत प्रतीक्षेत काय सहन करतो याचा विचार करता; मन अपेक्षा, चिंता, भीती यांच्या पाशात अडकून जाते, असं अभ्यास सांगतो. प्रतीक्षा करणाऱ्या व्यक्तीला असं वाटतं की त्यांच्या नियंत्रणात परिस्थिती नाही. यातून रक्तदाब वाढणे, स्नायूंमध्ये ताण आणि श्वासोच्छवासाचा त्रास होतो. यातून आलेल्या प्रतिक्रिया आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर परिणाम करते. प्रदीर्घ प्रतीक्षा कालावधी इतर प्रकारच्या तणावाच्या तुलनेत जास्त तणाव देतो. त्यामुळे सभोवतालची कोणतीही परिस्थिती, कोणतीही जागा किंवा कोणतीही व्यक्ती तुमच्या अस्वस्थतेत भर घालत असते. त्यामुळे प्रतीक्षा करायला लावणाऱ्यांपासून दूर राहण्याचा सल्ला दिला जातो.
प्रतीक्षा चिंता कमी करण्यासाठी टिप्स
1. आत्म-जागरूकता महत्वाची आहे. स्वत:वर विश्वास ठेवा. सध्याची परिस्थिती स्वीकारा, तसंच माझ्यासाठी परिस्थिती कठीण आहे हे समजून घ्या. भावनांवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करा.
2. प्रतीक्षा करत असताना असे काहीतरी करा ज्यातून तुम्हाला आनंद मिळतो. म्हणजेच तुम्हाला आवडणारं संगीत ऐका, मालिश सारख्या काही विश्रांती देणाऱ्या गोष्टी करा.
3. प्राणायाम करा, श्वासोच्छवासाचे व्यायाम करा.
4. जुन्या मित्राला कॉल करा, तुमचा आवडता चित्रपट पुन्हा पाहा.
5. जर परिस्थिती एखाद्या व्यक्तीमुळे उद्भवली असेल तिच्यापासून दूर होण्याचा प्रयत्न करा.
प्रतीक्षा चिंता कशी सुधारायची
1. लोकांमध्ये वेळ घालवा.
2. प्रतीक्षा ही आपल्यासाठी कामाची आहे याचा विचार करा. बिनकामाची प्रतीक्षा तणाव वाढवते.
3 प्रतीक्षा करावी लागणार आहे, याचा विचार मनाशी करुन घ्या. यामुळे प्रतीक्षेचा त्रास होणार नाही.
4. प्रतीक्षा करण्याचे कारण स्पष्ट करा, कारण स्पष्ट असेल तर ती प्रतीक्षा त्रासदायक होत नाही. अनिश्चित
अमर्यादित प्रतीक्षेपेक्षा ठराविक प्रतीक्षा करणे चांगले आहे.
5. तणाव दूर करा. एखाद्याला वाट बघायला लावल्याबद्दल माफी मागा, तुम्ही कोणाला ताण दिला असेल तर हीही करणे गरजेचे आहे.