नवी दिल्ली Microsoft Global Outage : मायक्रोसॉफ्ट डाऊनवर मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेला यांनी शुक्रवारी प्रतिक्रिया दिली. "अमेरिकन सायबर सुरक्षा समूह क्राउडस्ट्राइकनं जारी केलेल्या अपडेटचा जागतिक स्तरावर आयटी प्रणालींवर परिणाम होऊ लागला आहे. आम्हाला या समस्येची जाणीव असून, ग्राहकांना त्यांच्या सिस्टमला सुरक्षितपणे ऑनलाइन परत आणण्यासाठी तांत्रिक मार्गदर्शन तसंच समर्थन देण्यासाठी Crowd Strike युद्धपातळीवर काम करत आहे," अशी प्रतिक्रिया सत्या नडेला यांनी 'X' वर पोस्ट करत दिली.
Yesterday, CrowdStrike released an update that began impacting IT systems globally. We are aware of this issue and are working closely with CrowdStrike and across the industry to provide customers technical guidance and support to safely bring their systems back online.
— Satya Nadella (@satyanadella) July 19, 2024
विविध क्षेत्रावर परिणाम : शुक्रवारी झालेल्या आउटेजमुळं विमान कंपन्या, बँका, टीव्ही चॅनेलसह इतर व्यवसायांचं कामकाज विस्कळीत झालं. Crowd Strike मुळं Windows सिस्टीमवर तांत्रिक बिघाड झाला. क्राउडस्ट्राइकच्या फाल्कन सेन्सरवरील अपडेटमुळं ही समस्या निर्माण झाली. विंडोज सिस्टमचं संरक्षण करण्यासाठी डिझाइन केलेलं आयटी सोल्यूशन CrowdStrike चे CEO जॉर्ज कुर्ट्झ यांच्या म्हणण्यानुसार, तांत्रिक बिघाड नेमका कुठं झाला, याची संपूर्ण माहिती मिळाली आहे. ती दुरुस्त करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मायक्रोसॉफ्टनं नोंदवल्याप्रमाणे, मॅक किंवा लिनक्स सिस्टमवर परिणाम न करणारा अपडेट बग गुरुवारी 1900 GMT सक्रिय झाला होता. त्यामुळं शुक्रवारी सकाळपासून अनेक कंपन्यांमध्ये तांत्रिक अडचण होत असल्याचं आढळून आलं होतं.
विमानतळावर गोंधळाचं वातावरण : यामुळं मुंबईतील विमानतळावरही गोंधळाचं वातावरण निर्माण झालं. अनेक ठिकाणी प्रवाशांच्या मोठ्या रांगा लागल्याचं चित्र पाहायला मिळालं. स्पाइसजेट, इंडिगो, अकासा या विमान कंपन्यांना या तांत्रिक बिघाडाचा मोठा फटका बसला. अकासा एअर लाइनच्या प्रवक्त्यानं दिलेल्या माहितीनुसार, आमच्या सेवा पुरवणाऱ्या कंपनीमध्ये काही तांत्रिक बिघाडामुळं चेक-इन बुकिंग, इतर सहायक सेवांवर विपरित परिणाम झाला. मात्र, प्रवाशांना त्रास होऊ नये, म्हणून आम्ही पर्यायी उपाययोजना करत आहोत. प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून चेक इन प्रक्रियेसाठी अतिरिक्त कर्मचारी तैनात करण्यात आल्याची माहिती देण्यात आली.
मुंबई विमानतळावर प्रवासी खोळंबले : मुंबई, दिल्लीसह देशभरातील विविध विमानतळांवर चेक इन प्रक्रिया करणाऱ्या मायक्रोसॉफ्टमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने त्याचा फटका देशभरातील विविध विमानतळांना बसला. मायक्रोसॉफ्टच्या प्रक्रियेमध्ये जगभरात तांत्रिक बिघाड झाल्याने विमानतळावरील चेक इन प्रक्रिया खोळंबली. त्यामुळे हजारो प्रवाशांना त्याचा फटका बसला. मुंबई विमानतळावरही प्रवासी खोळंबले होते.
'हे' वाचलंत का :