लंडन UK Election 2024 : ब्रिटनच्या संसदेत सर कीर स्टारमर यांच्या मजूर पक्षानं जोरदार घोडदौड केली आहे. त्यामुळे भारतीय वंशाचे ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांना मोठा धक्का बसला. ऋषी सुनक यांच्या हूजूर पक्षानं आपला पराभव मान्य केला आहे. सर कीर स्टारमर यांच्या मजूर पक्षानं 650 पैकी 326 जागा जिंकल्या असून ऋषी सुनक यांच्या हूजूर पक्षाला केवळ 80 जागांवर समाधान मानावं लागलं. त्यामुळे ऋषी सुनक यांनी आपला पराभव स्वीकारला आहे. यावेळी त्यांनी जनतेनं दिलेला कौल मान्य असल्याचं स्पष्ट केलं.
United Kingdom Prime Minister Rishi Sunak concedes the general election to Keir Starmer and the Labour Party.
— ANI (@ANI) July 5, 2024
United Kingdom Prime Minister Rishi Sunak says " ...the labour party has won this general election and i have called keir starmer to congratulate him on his victory.… pic.twitter.com/JqxZHJYPbn
ब्रिटनच्या संसदेत 'सिंह आला पण गड गेला' : ब्रिटनच्या संसदेत भारतीय वंशाचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या हूजूर पक्षाला केवळ 80 जागा मिळाल्यानं त्यांचा पराभव निश्चित झाला. मात्र या निवडणुकीत ऋषी सुनक यांनी त्यांची जागा जिंकली आहे. ऋषी सुनक यांचा विजय झाला असला, तरी पक्ष हारल्यानं सिंह आला, पण गड गेला, अशी त्यांची अवस्था झाली आहे.
" you have voted, now it's time for us to deliver": keir starmer after exit polls show landslide win for uk's labour party
— ANI Digital (@ani_digital) July 5, 2024
read @ANI Story | https://t.co/BGWAGmbLGY#UKElections #RishiSunak #KeirStarmer #London pic.twitter.com/dz4y1FvgGT
सर कीर स्टारमर होऊ शकतात ब्रिटनचे पंतप्रधान : ब्रिटनच्या संसदीय निवडणुकीत मजूर पक्षाचे नेते सर कीर स्टारमर यांनी 326 पेक्षा जास्त जागा जिंकल्या आहेत. त्यामुळे ब्रिटनमध्ये सर कीर स्टारमर यांच्या मजूर पक्षाचं सरकार येणार हे निश्चित झालं आहे. मजूर पक्षाचे नेते सर कीर स्टारमर यांच्या नेतृत्वात ही निवडणूक लढवण्यात आली असल्यानं सर कीर स्टारमर हेच ब्रिटनचे नवे पंतप्रधान होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे.
हेही वाचा :
- ब्रिटनमध्ये मतदानाला सुरूवात; मूळ भारतीय वंशाचे ऋषी सुनक केयर स्टारर यांना पराभूत करणार का? - Voting IN Britain
- मनीषा कोईरालानं ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची घेतली भेट, फोटो केले शेअर - Manisha Koirala meets UK PM
- UK PM Sunak Hosts Jaishankar : दिवाळीच्या दिवशी ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची जयशंकर यांनी घेतली भेट; दिली 'ही' खास गोष्ट