ETV Bharat / international

20 वर्षीय तरुणानं डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर झाडल्या गोळ्या; सीक्रेट सर्व्हिसनं केलं ठार, 52 वर्षापूर्वी.... - Donald Trump Rally Firing - DONALD TRUMP RALLY FIRING

Donald Trump Rally Firing : अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर गोळीबार झाला. या हल्ल्यात गोळी ट्रम्प यांच्या कानाजवळून गेली. सध्या ट्रम्प सुरक्षित आहेत. हा हल्ला करणाऱ्या एका शूटरला सीक्रेट सर्व्हिसनं ठार केलं. रॅलीत उपस्थित असलेल्या आणखी एका व्यक्तीचाही मृत्यू झाला. जो-बायडन यांनी माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी संवाद साधला आणि घटनेची माहिती घेतली. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या घटनेचा निषेध केला.

Donald Trump Rally Firing
डोनाल्ड ट्रम्प रॅली फायरिंग (File Photo)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 14, 2024, 4:15 PM IST

Updated : Jul 14, 2024, 5:16 PM IST

नवी दिल्ली Donald Trump Rally Firing : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर गोळीबार झाला. त्यांच्या उजव्या कानाजवळून गोळी गेली. मात्र, ते सुरक्षित आहेत. त्यांना रुग्णालयातून डिस्चार्जही देण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. भारतीय वेळेनुसार रविवारी पहाटे चार वाजता ही घटना घडली. अमेरिकेतील पेनसिल्व्हेनिया राज्यातील बटलर शहरात ट्रम्प निवडणूक रॅलीला संबोधिक करत होते. त्याचवेळी त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला. यात त्यांच्या कानाला गोळी चाटून गेली. सुरक्षा रक्षकांनी त्यांना तत्काळ तिथून बाहेर काढलं.

मला गोळी लागल्याचं जाणवलं : ट्रम्प यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एका पोस्टमध्ये म्हटलं आहे की, "पेनसिल्व्हेनियाच्या बटलरमध्ये झालेल्या गोळीबारावर त्वरीत कारवाई करणाऱ्या सर्व पोलीस अधिकाऱ्यांचे आभार मानू इच्छितो. रॅलीत मारल्या गेलेल्या व्यक्तीच्या कुटुंबाप्रती आणि गंभीर जखमी झालेल्या दुसऱ्या व्यक्तीच्या कुटुंबाप्रती संवेदना व्यक्त करतो. आपल्या देशात अशी घटना घडणं अत्यंत दुर्दैवी आहे. शूटर मारला गेला असला तरी अद्याप त्याबद्दल काहीही माहिती नाही. माझ्या उजव्या कानाच्या वरच्या भागातून गोळी घासून गेली. माझ्या कानाला मुंग्या आल्याचं जाणवलं, ज्यामुळं मला लगेच लक्षात आले, की काहीतरी घडलंय. गोळी माझ्या कानाजवळून जात असल्याचं मला जाणवलं. खूप रक्तस्त्राव झाला होता."

संशयित शूटर ठार : या गोळीबारात रॅलीत उपस्थित असलेल्या एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. तसंच 2 गंभीर जखमी आहेत. पेनसिल्व्हेनिया पोलिसांनी सांगितलं की, ट्रम्प यांच्यावर सुमारे 400 फूट अंतरावरील इमारतीच्या छतावरून गोळीबार करण्यात आला. त्यांच्यावर AR-15 रायफलमधून 8 राउंड फायर करण्यात आले. पहिल्या फेरीत 3 तर दुसऱ्या फेरीत 5 गोळ्या झाडण्यात आल्या. पोलिसांनी सांगितलं की, यातील संशयित शूटर ठार केला आहे. त्याचं वय 20 वर्षे होतं. हल्ल्याचा हेतू अद्याप समजू शकलेला नाही."

52 वर्षांनंतर राष्ट्रपती पदाच्या उमेदवारावर हल्ला : अमेरिकेत 52 वर्षांनंतर राष्ट्रपती पदाच्या उमेदवारावर हल्ला झाला. यापूर्वी 1972 मध्ये जॉर्ज सी. वॉलेस यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. ते राष्ट्रपतीपदाचे उमेदवार होते. एका शॉपिंग सेंटरमध्ये त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. यानंतर ते मरेपर्यंत व्हील चेअरवरच राहिले. यापूर्वी 1972 मध्ये माजी राष्ट्राध्यक्ष जॉन एफ. केनेडी यांचे भाऊ रॉबर्ट एफ. केनेडी यांच्यावर हल्ला झाला होता. लॉस एंजेलिसमधील निवडणूक प्रचार आटोपून ते परतत असताना त्यांच्यावर हल्ला करण्यात आला होता.

'हे' वाचलंत का :

  1. डोनाल्ड ट्रम्प यांच्या रॅलीत गोळीबार; थोडक्यात बचावले, पाहा घटनेचा व्हिडिओ - DONALD TRUMP NEWS
  2. डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर गोळीबार झाल्यानं पंतप्रधानांसह राहुल गांधींनी व्यक्त केला निषेध, वाचा काय म्हणाले? - Donald Trump News

Last Updated : Jul 14, 2024, 5:16 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.