ETV Bharat / international

ऑलिम्पिक उद्घाटन समारंभाच्या आधी फ्रान्समध्ये मोठा गोंधळ; हाय-स्पीड रेल्वे नेटवर्कमध्ये तोडफोड, रेल्वेसेवा विस्कळीत - Paris Olympics 2024 - PARIS OLYMPICS 2024

Paris Olympics 2024 : पॅरिस ऑलिम्पिकच्या उद्घाटन समारंभाच्या काही तास आधी फ्रान्सची रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे. फ्रान्सच्या वाहतूक मंत्र्यांनी रेल्वे नेटवर्कवरील या हल्ल्यांचं वर्णन गुन्हेगारी म्हणून केलं आहे. लाखो प्रवाशांना याचा फटका बसल्याचं SNCF चे मुख्य कार्यकारी जीन पियरे यांनी सांगितलं.

Paris Olympics 2024
ऑलिम्पिक उद्घाटन समारंभाच्या आधी फ्रान्समध्ये मोठा गोंधळ (AP Photo)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 26, 2024, 3:40 PM IST

पॅरिस Paris Olympics 2024 : पॅरिस ऑलिम्पिक उद्घाटन समारंभाच्या काही तास आधी फ्रान्सची रेल्वेसेवा पुर्णपणे विस्कळीत झाली आहे. फ्रान्सचे राष्ट्रीय रेल्वे ऑपरेटर (SNCF) नं माहिती देताना त्यांच्या हाय-स्पीड रेल्वे नेटवर्कमध्ये तोडफोडीच्या अनेक घटना घडल्या असून यामुळं रेल्वेसेवा मोठ्या प्रमाणावर विस्कळीत झाल्याचं सांगितलंय.

संपूर्ण वाहतूक व्यवस्था प्रभावित : फ्रेंच ट्रेन ऑपरेटर कंपनी SNCF नं ऑलिम्पिक उद्घाटन समारंभाच्या काही तास आधी या संपूर्ण प्रकरणाची माहिती दिली आहे. फ्रान्सच्या हाय-स्पीड रेल्वे नेटवर्कवर जाळपोळ केल्याचंही एसएनसीएफनं म्हटलं आहे. त्यामुळं संपूर्ण वाहतूक व्यवस्था प्रभावित झाली आहे.

फ्रान्सच्या रेल्वेसेवेवर वाईट परिणाम : मिळालेल्या माहितीनुसार, फ्रान्सच्या पश्चिम, उत्तर आणि पूर्व भागातील रेल्वे मार्ग प्रभावित झाले आहेत. त्यामुळं देशांतर्गत गाड्याच नव्हे तर चॅनल टनेलद्वारे शेजारील देश बेल्जियम आणि लंडनला जाणाऱ्या गाड्याही विस्कळीत झाल्या आहेत. या तोडफोड आणि जाळपोळीमुळं झालेलं नुकसान दुरुस्त करण्यासाठी रविवारपर्यंत किमान कालावधी लागू शकतो.

अधिकाऱ्यांकडून तीव्र शब्दांत निषेध : फ्रेंच अधिकाऱ्यांनी राष्ट्रीय पोलिसांच्या नेतृत्वानुसार या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे. SNCF नं या घटनांचं वर्णन 'दुर्भावनापूर्ण कृत्यं' असं केलं आहे. परंतु तोडफोडीबद्दल अधिक माहिती दिलेली नाही. पॅरिस ऑलिम्पिकच्या उद्घाटन समारंभाच्या काही तास आधी घडलेल्या या घटनेचा फ्रेंच सरकारी अधिकाऱ्यांनी तीव्र शब्दात निषेध केला आहे. फ्रान्सच्या अनेक भागांमध्ये ऑलिम्पिक खेळ आयोजित केले जाणार आहेत. परंतु पॅरिस ऑलिम्पिकशी त्याचा थेट संबंध आहे की नाही हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

लाखो रेल्वे प्रवाशांना फटका : स्थानिक मीडिया रिपोर्टनुसार फ्रान्सच्या क्रीडा मंत्र्यांनी या हिंसाचारावर संताप व्यक्त केला असून त्याचं वर्णन भयावह असल्याचं म्हटले आहे. खेळांना लक्ष्य करणं हे फ्रान्सलाच लक्ष्य करण्यासारखं असल्याचं त्यांनी म्हटलंय. तर फ्रान्सच्या वाहतूक मंत्र्यांनी रेल्वे नेटवर्कवरील या हल्ल्यांचं वर्णन गुन्हेगारी म्हणून केलं आहे. लाखो प्रवाशांना याचा फटका बसल्याचं SNCF चे मुख्य कार्यकारी जीन पियरे यांनी सांगितलं.

सीन नदीवर आज पॅरिस ऑलिम्पिकचा उद्घाटन सोहळा : पॅरिस ऑलिम्पिकचा उद्घाटन सोहळा फ्रान्समध्ये अनोख्या शैलीत पार पडणार आहे. उद्घाटन समारंभाचा संपूर्ण कार्यक्रम आयफेल टॉवर आणि सीन नदीवर होणार आहे. या स्पर्धेत 10 हजार 500 खेळाडू सहभागी होणार आहेत. याशिवाय हजारो प्रेक्षक आणि पाहुणे या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. 1896 मध्ये ऑलिम्पिक खेळांना सुरुवात झाली, तेव्हापासून आतापर्यंत स्टेडियममध्ये उद्घाटन समारंभ आयोजित केला जात होता. मात्र यावेळी हा कार्यक्रम पहिल्यांदाच स्टेडियमबाहेर आयोजित केला जाणार आहे. पण फ्रान्सच्या रेल्वे नेटवर्कवर झालेल्या या हल्ल्याचा उद्घाटन सोहळ्यावर काही परिणाम होईल की नाही हे पाहणं बाकी आहे.

हेही वाचा :

  1. पॅरिस ऑलिम्पिकसाठी बॉक्सिंग ड्रॉ जाहीर; स्टार बॉक्सर निखत झरीन आणि लोव्हलिनासमोर कडवं आव्हान - Paris Olympics 2024
  2. पॅरिस ऑलिम्पिकचं आज भव्य उद्घाटन; 128 वर्षांच्या इतिहासात प्रथमच 'असा' होणार उद्घाटन सोहळा - Paris Olympics 2024

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.