ETV Bharat / international

नेपाळमध्ये भूस्खलन; 63 प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या 2 बस गेल्या नदीत वाहून, शोध कार्य सुरु - Nepal Landslide

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 12, 2024, 10:23 AM IST

Nepal Landslide : नेपाळमध्ये भूस्खलनामुळं एक भीषण अपघात घडलाय. मदन-आश्रित हैफा येथे दोन बस त्रिशूली नदीत वाहून गेल्या. बसमध्ये चालकासह सुमारे 63 प्रवासी होते.

Nepal Landslide
Nepal Landslide (Source - ANI)

Nepal Landslide : नेपाळमधील खराब हवामानामुळं गेल्या काही दिवसांपासून येथील लोकांना त्रास सहन करावा लागत आहे. शुक्रवारी (12 जुलै) सकाळी तीनच्या सुमारास नेपाळमधील मदन-आशीर हैफा येथे भूस्खलनामुळं दोन बस त्रिशूली नदीत वाहून गेल्या. या बसमध्ये चालकासह सुमारे 63 प्रवासी होते. अपघातानंतर सर्व प्रवासी बेपत्ता आहेत. घटनास्थळी बचाव पथकं दाखल झाली असून शोध मोहीम राबवत आहेत. सतत पाऊस सुरू असल्यामुळं नदीत वाहून गेलेल्या दोन्ही बसचा शोध घेण्यात अडचणी येत आहेत.

रौतहाटच्या दिशेने जात होत्या दोन्ही बस : जिल्हा दंडाधिकारी इंद्रदेव यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार, नेपाळमध्ये झालेल्या भूस्खलनात एंजल आणि गणपती डिलक्स कंपनीच्या बस वाहून गेल्या आहेत. या दोन्ही बस नेपाळमधील काठमांडू येथून रौतहाटच्या दिशेने जात होत्या. आतापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार, एंजल बसमध्ये 24 जण प्रवास करत होते. तर गणपती डिलक्स बसमध्ये सुमारे 41 जण प्रवास करत होते. गणपती डिलक्स बसमधील तीन प्रवाश्यांनी खिडकीतून उड्या मारल्यामुळं बचावले.

नेपाळमध्ये संपत्तीचं मोठं नुकसान : दुर्घटनेबद्दल दु:ख व्यक्त करताना नेपाळचे पंतप्रधान पुष्प कमल दहल यांनी 'एक्स'वर पोस्ट शेअर करत लिहिलं की, "पाऊस, पूर आणि भूस्खलनामुळे नेपाळमध्ये संपत्तीचं मोठं नुकसान झालं आहे. नारायणगड-मुग्लिन रोडवर झालेल्या भूस्खलनात 2 बस वाहून गेल्या. देशाच्या विविध भागांमधून पूर आणि भूस्खलनाच्या बातम्या आहेत. मी गृह प्रशासनासह सरकारच्या सर्व एजन्सींना बचाव अभियान राबवून जास्तीत जास्त प्रवाशांना वाचवण्याचं आवाहन केलंय."

बचाव कार्य सुरू : खराब हवामानामुळं काठमांडू ते चितवनच्या भरतपूरला जाणारी सर्व उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. गणपती डिलक्समधील तीन प्रवासी वाहनातून उडी मारून पळून जाण्यात यशस्वी झाले. नेपाळ पोलीस आणि सशस्त्र पोलीस दलाचे जवान बचाव कार्यासाठी घटनास्थळी जात आहेत. ठिकठिकाणी दरड कोसळल्यानं नारायणघाट-मुगलिंग मार्गावरील वाहतूक खोळंबली आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक भावेश रिमल यांनी दिली.

हेही वाचा

  1. दक्षिण कोरियात लिथियम कारखान्यात भीषण आग; 22 कामगारांचा होरपळून मृत्यू - Fire in Lithium Battery Factory
  2. रशियातील चर्चवर दहशतवादी हल्ला; 20 जणांचा मृत्यू, तीन दिवसांचा शोक पाळणार - Terror Attack In Russia
  3. कुवेतमध्ये इमारतीला भीषण आग, 49 जणांचा मृत्यू; मृतांमध्ये बहुतांश भारतीय असण्याची भीती - Kuwait Building Fire

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.