ETV Bharat / international

अमेरिकेत 'या' कारणामुळं झाल्या राष्ट्राध्यक्षांच्या हत्या, वाचा अब्राहम लिंकन, जॉन एफ केनेडी, जेम्स गारफिल्ड यांच्या हत्येची कारणं - Firing On Donald Trump - FIRING ON DONALD TRUMP

Firing On Donald Trump : पेनसिल्व्हेनियामध्ये प्रचार रॅलीदरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर गोळीबार करण्यात आला आहे. त्यामुळं राजकीय नेत्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा निर्माण झाला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर गोळीबार होण्यापूर्वीही अमेरीकेच्या राष्ट्राध्यक्षांवर हल्ला झाला आहे. त्यात अब्राहम लिंकन, जॉन एफ केनेडी, जेम्स गारफिल्ड, विल्यम मॅककिन्ले यांची हत्या करण्यात आली आहे. त्याची काही कारण आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

Abraham Lincoln, John F Kennedy
अब्राहम लिंकन, जॉन एफ केनेडी (Etv Bharat MH Desk)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 14, 2024, 10:38 PM IST

नवी दिल्ली Firing On Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर गोळीबार होण्यापूर्वीही अनेक अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना लक्ष्य करण्यात आलं आहे. पेनसिल्व्हेनियातील बटलर शहरात माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प एका निवडणूक रॅलीला संबोधित करत होते. ते भाषण करत असतानाच त्यांच्यावर गोळीबार झाला. त्यांच्या कानाला एक गोळी चाटून गेली. त्यामुळं त्यांच्या चेहरा रक्तानं माखला होता. या घटनेनं संपूर्ण जगाला अमेरिकेत झालेल्या राजकीय हत्यांची आठवण करून दिलीय. ट्रम यांच्या आगोदर देखील अमेरिकेच्या नेत्यांना लक्ष करण्यात आलं आहे. राजकीय इतिहासात अशी अनेक नावं सांगता येतील, ज्यांच्यावर हल्ले झाले आहेत. या हल्यात काही नेत्यांचा मृत्यू झालाय. याचबाबत आज आपण अमेरिकेत झालेल्या नेत्यांवरी हल्यांचा आढावा घेणार आहोत.

अब्राहम लिंकन : अमेरिकेचे 16 वे राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन वॉशिंग्टनमधील फोर्ड थिएटरमध्ये 'अवर अमेरिकन कजिन' हे नाटक पाहत होते. त्याच वेळी त्यांच्यावर हल्ला झाला होता. तारीख होती 14 एप्रिल 1865. घटनेच्या वेळी बाल्कनीत बसलेले लिंकन यांचा सुरक्षा रक्षक 'जॉन पार्कर' त्याच्यासोबत उपस्थित नव्हता. मध्यंतरातच तो थिएटरमधून बाहेर पडला होता. रात्री 10.15 वाजता संधी पाहून हल्लेखोर जॉन वाईक्स बूथनं लिंकन यांच्या डोक्यावर गोळी झाडली होती. त्यानंतर लिंकन यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. दुसऱ्या दिवशी सकाळी 15 एप्रिल 1865 रोजी त्यांचा मृत्यू झाला. शूटर, जॉन वाईक्स बूथ, एक व्यावसायिक थिएटर कलाकार होता. त्याला अमेरिकनं सैन्यानं 10 दिवसांनी व्हर्जिनियामध्ये ठार केलं होतं.

'हे' आहे हत्येचं कारण : १९व्या शतकात अमेरिकेत गुलामगिरी प्रचलित होती. या काळ्यामध्ये माणसांचीच खरेदी-विक्री होत होती. अमेरिकेतील गोरे माणसं काळ्या माणसांना गुलाम बनत होते. भारतात ज्या प्रमाणे जातीय भेद होते अगदी तसाच भेद अमेरिकेत सुद्धा होता. त्यामुळं अब्राहम लिंकन यांनी गुलामगिरीला विरोध केला. अमेरिकेत त्यांनी कृष्णवर्णीयांच्या स्वातंत्र्यासाठी आवाज उठवाला. राष्ट्रपती झाल्यानंतर 1863 मध्ये त्यांनी गुलामगिरी बेकायदेशीर घोषित केली. त्यामुळं काही गुलामगिरीची प्रथा सुरू ठेवू इच्छिणाऱ्या लोक त्यांच्या निर्णयामुळं संतप्त आला. ज्यामुळं देशात गृहयुद्धाची परिस्थिती निर्माण झाली. मात्र, लिंकन त्यांच्या निर्णयावर ठाम होते. या निर्णयानं जॉन वाईक्स बूथला लिंकन यांचा राग आला. त्यानंतर त्यांनं लिंकन यांची हत्या केली.

जेम्स गारफिल्ड : अमेरिकेचे 20 वे राष्ट्राध्यक्ष जेम्स गारफिल्ड यांनी पदभार स्वीकारून केवळ 4 महिने झाले होते. त्यांना वॉशिंग्टन डीसीच्या बालमोर स्टेशनवरवरून न्यू इंग्लंडला जाणारी ट्रेन पकडायची होती. त्यांना न्यू इंग्लंडमधील विल्यम कॉलेजमध्ये जायचं होतं. जिथं ते शिक्षण घेत होते. त्यांच्यासोबत त्यांची दोन मुलं देखील होती. त्याचवेळी त्यांच्यावर चार्ल्स गिटो नावाच्या व्यक्तीनं त्यांच्या छातीत गोळी झाडली. गोळी काढण्यासाठी डॉक्टरांनी अनेक दिवस प्रयत्न केले, मात्र त्यानं त्यात यश आलं नाही. टेलिफोनचा शोध लावणाऱ्या ग्रॅहम बेलनं यासाठी खास मशिन तयार केली होती. जेणेकरुन ते छातीत अडकलेली गोळी काढू शकेल, पण त्यांनाही यश आलं नाही. अडीच महिन्यांनंतर, 19 सप्टेंबर रोजी अध्यक्ष जेम्स गारफिल्ड यांचं निधन झालं. 39 वर्षीय गिटोला गारफिल्डच्या हत्येप्रकरणी दोषी ठरवण्यात आलं.

'हे' होतं हत्येचं कारण : अनेक व्यवसायात अयशस्वी झाल्यानंतर आरोपी गिटो राजकारणात आला होता. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या वेळी, गिटोनं त्याच्या विचाराचा प्रसार करण्यासाठी मोहिम हाती घेतली होती. त्यामुळं गारफिल्ड यांनी निवडणूक जिंकली, असं त्याला वाटलं. गारफिल्ड यांनी केवळ माझी छापलेली भाषणं विजय मिळवला असं त्यानं म्हटलं होतं. त्यामुळं त्यांला बक्षीस म्हणून राजनैतिक जबाबदारी मिळाली पाहिजे, असं वाटायचं. त्यानं युरोपातील अनेक दूतावासात काम करण्यासाठी चकरा मारल्या पण त्याला यश आलं नाही. त्यामुळं गिटोनं न्यूयॉर्क शहरातील रिपब्लिकन कार्यालयांच्या फेऱ्या मारणे सुरू ठेवलं होतं. तो माझ्या कामासाठी प्रयत्न करत राहिला, पण काही उपयोग झाला नाही. यामुळं त्याच्या मनात गारफिल्डबद्दल तिरस्कार निर्माण झालं. त्यानंतर त्यानं राष्ट्रपतींच्या हत्येची योजना आखून संधी पाहून आपलं काम केलं. गारफिल्डच्या मृत्यूच्या दिवशी, गिटोनं नवीन अध्यक्ष चेस्टर आर्थर यांना एक पत्र लिहिलं. त्यानं त्यात म्हटलं की, मी हे देवाच्या आदेशानं केलंय. मला माहीत आहे की, तुम्ही माझ्या कामाचं कौतुक करत असाल. तुम्ही याला खून म्हणून पाहू नका, ही देवाची कृती होती. गारफिल्ड स्वतःच्या मृत्यूला जबाबदार आहेत. गारफिल्ड यांच्या मृत्यूनंतर त्याला एका वर्षानं फासावर लटकवण्यात आलं.

विल्यम मॅककिन्ली : 6 सप्टेंबर 1901 ला बफोलोत अमेरिकेचे 25 वे राष्ट्राध्यक्ष म्हणून विल्यम मॅककिन्ले त्यांची दुसऱ्यांदा काम करत होते. त्यांच्या आधी दोन अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचा मृत्यू झाला होता, पण त्यांना त्यांच्याभोवती कडेकोट सुरक्षा नको होती. खरं तर, मॅककिन्ली लोकांना भेटण्याचा आनंद घेत असे. राष्ट्रपतींना बफोलो येथील एका कार्यक्रमात जायचं होतं. त्याचवेळी त्यांच्या सेक्रेटरीला त्यांच्या हत्येची भीती वाटत होती. म्हणून त्यांनी दोनदा कार्यक्रम रद्द केला, परंतु दोन्ही वेळा अध्यक्ष मॅककिन्ले यांनी त्यांचं काही ऐकलं नाही. मॅककिन्ले कार्यक्रमाला उपस्थित राहिल्यानंतर लोकांशी हस्तांदोलन करत होते. तेव्हा लिओन झोलगोस नावाचा एक व्यक्ती त्याच्या जवळ आला. त्याचवेळी त्यानं त्यांच्यावर अचानक हल्ला चढवत दोन गोळ्या झाडल्या. एक गोळी त्याच्या शरीरातून बाहेर पडली. दुसरी गोळी त्याच्या पोटात घुसली. त्यांना तातडीनं रुग्णालयात नेण्यात आलं. पोटातील जखमेमुळं गोळी डॉक्टरांना काढता आली नाही. 8 दिवसांनंतर 14 सप्टेंबर 1901 रोजी त्यांचा मृत्यू झाला.

काय होतं कारण : 1893 च्या आर्थिक संकटात राष्ट्राध्यक्षांना गोळ्या घालणाऱ्या लिओन झोलगोझची नोकरी गेली होती. देशाच्या या अवस्थेला हे नेते कारणीभूत आहेत, असं त्यांला वाटलं. त्यामुळं त्यानं सरकारविरोधी भूमीका घेतली. त्यांनी देशाच्या स्थितीसाठी मॅककिन्लेला जबाबदार धरला. राष्ट्राध्यक्षांची हत्या केल्याशिवाय देशाची स्थिती सुधारणार नाही, असं झोलगोसला वाटलं. त्यामुळं त्यानं राष्ट्राध्यक्षांची हत्या केली. हत्येच्या खटल्यात दोषी आढळल्यानंतर 29 ऑक्टोबर 1901 रोजी त्याला मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आली.

जॉन एफ केनेडी : डॅलसमध्ये 22 नोव्हेंबर 1963 रोजी तत्कालीन अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जॉन एफ. केनेडी पुन्हा एकदा राष्ट्राध्यक्ष बनण्याच्या तयारीत व्यस्त होते. ते पुन्हा एकदा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी निवडून येतील, असा त्यांना विश्वास होता. दरम्यान त्यांनी टेक्सासला भेट देण्याचं ठरवलं. जिथं त्यांच्या डेमोक्रॅटिक पक्षाच्या काही नेत्यांमध्ये परस्पर वाद झाला. निवडणुकीपूर्वी केनेडींना कोणत्याही किंमतीत हा वाद संपवायचा होता. 21 नोव्हेंबरला ते टेक्सासला पोहोचले. तिथं त्यांनी काही कार्यक्रमात भाग घेतला. दुसऱ्या दिवशी ते डॅलसला परत आले. त्यांना पाहण्यासाठी रस्त्यावर नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. केनेडी त्यांच्या एअर फोर्स वन विमानातून बाहेर पडले. त्यांची पत्नी जॅकलीनदेखील त्यांच्यासोबत होती. ते दोघेही जवळंच उभ्या असलेल्या लिमोझिन कारमध्ये बसले. त्यावेळी रस्त्याच्या दुतर्फा नागरिकांनी जयघोष सुरू केला. त्यामुलं केनेडींना खूप आनंद झाला. त्याचवेळी जमावातून कोणीतरी दोन गोळ्या झाडल्या. एक गोळी थेट केनेडी यांच्या डोक्यात, तर दुसरी त्यांच्या मानेत घुसली. त्यांना त्यांची पत्नी ओनासिसानं मांडीवर घेतलं. केनडींच्या सुरक्षेत गुंतलेल्या अधिकाऱ्यांनी त्यांना पार्कलँड मेमोरियल हॉस्पिटलमध्ये दाखलं केलं. मात्र दुपारी एक वाजता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. केनडी यांच्यावर ओस्वाल्ड नावाच्या निवृत्त लष्करी अधिकाऱ्यानं गोळी झाडली होती. या हल्ल्यात केनेडींच्या गाडीतून प्रवास करणारे गव्हर्नर कोनली हे देखील जखमी झाले होते. परंतु ते लवकरच बरे झाले. केनेडी यांच्यावर गोळीबार केल्याबद्दल ओस्वाल्ड या निवृत्त लष्करी जवानाला अटक करण्यात आली. मात्र, दोन दिवसांनंतर केनेडी यांच्या समर्थकानं त्याची हत्या केली.

हत्येचं कारण अद्याप अस्पष्ट : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉन एफ. केनेडी यांच्या हत्येबाबत अनेक सिद्धांत समोर आले. मात्र, त्यांची हत्या का करण्यात आली याबाबत अद्याप काहीच माहिती समोल आली नाहीय. त्यामुळं त्याच्या हत्येचं कारण अद्याप अस्पष्ट आहे.

केनडींच्या हत्येबात काही अंदाज : अमेरिकन एजन्सी एफबीआयनं केनेडी यांच्या मारेकऱ्याचा शोध घेतला तेव्हा त्यांना एक महिला छायाचित्र दिसली. हत्येच्या वेळी महिला फोटो काढत होती. केनेडींची हत्या याच महिलेनं कॅमेरात पिस्तुल लपवून केल्याची चर्चा होती. परंतु या महिलेची कधीच ओळख पटली नाही. तसंच तिच्या विरोधात कोणातीही पुरावा मिळाला नाही. यानंतर केनेडी यांची हत्या कोणी केली? ती महिला त्यांच्यासोबत होती का, अशी चर्चा सुरू झाली. या महिलेचं नाव द बाबुष्का लेडी होतं.

दुसरा कयास : या हत्येच्या वेळी अमेरिका तसंच रशियामध्ये शीतयुद्ध सुरू होतं. अवघ्या वर्षभरापूर्वी रशियानं अमेरिकेच्या शेजारी देश क्युबामध्ये अण्वस्त्र क्षेपणास्त्रं तैनात केली होती. जगात तिसरं महायुद्ध पेटणार होतं, पण केनेडींनी रशियाशी करार करून हे संकट दूर केलं. त्यामुळं केवळ अमेरिकेतच नव्हे तर रशियातही केनेडींची प्रशंसा झाली. त्यामुळं चिडून रशियाचं नेते ख्रुश्चेव्ह यांनी केजीबी या गुप्तचर संस्थेच्या सहकार्यानं केनेडी यांची हत्या घडवून आणल्याचं सांगण्यात आलं. मात्र, या आरोपाबाबत ठोस पुरावे मिळू शकले नाहीत.

तिसरा अंदाज : अमेरिकन माफियांनी क्युबामध्ये खूप पैसा गुंतवला होता, असं सांगण्यात आलं. अमेरिकेच्या क्युबासोबतच्या संबंधात आलेल्या कटुतेमुळं त्यांची मोठी हानी झाली. त्यामुळं अमेरिका तसंच क्युबाच्या माफियांनी मिळून अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या हत्या केली. मात्र, या प्रकरणातही अमेरिकन एजन्सीकडून तपासात फारशी मदत मिळाली नाही.

रोनाल्ड रेगन : 30 मार्च 1981ला वॉशिंग्टन डीसीत अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष रोनाल्ड रेगन एका कार्यक्रमानंतर कारमध्ये बसणार होते. त्यांच्या आजूबाजूला पत्रकारांची गर्दी होती. याच गर्दीतून अचानक एका व्यक्तीनं रेगन यांच्यावर गोळीबार केला. त्यांच्यार सहा गोळ्या झाडल्या गेल्या. त्यातील पाच गोळ्या त्यांनी चुकवल्या. तसंच सहाव्या गोळीला देखील त्यांनी चकवा दिला, मात्र, सहावी गोळी बुलेटप्रूफ कारला धडकून परत रीगन यांच्या छातीत घुसली. त्यानंतर त्यांना तातडीनं रुग्णालयात नेण्यात आलं. डॉक्टरांनी वेळीच त्यांच्या छातीतून गोळी काढल्यानं त्याचा जीव वाचला. या घटनेत रेगन यांच्या तीन साथीदारांनाही गोळ्या लागल्या, पण रेगनप्रमाणे तेही बचावले. गोळीबार करणाऱ्या जॉन हिंकलेला घटनास्थळी पकडण्यात आलं.

काय होत गोळीबाराचं कारण : हिंकलेच्या वकिलानx न्यायालयात युक्तिवाद केला की, त्याचा क्लायंट मानसिक आजारी आहे. त्यांनं जोडी फॉस्टरचा 'टॅक्सी ड्रायव्हर' हा चित्रपट 18 वेळा पाहिला होता. चित्रपट पाहिल्यानंतर, भ्रष्ट राजकारण्याला मारणाऱ्या एका पात्रानं हिंकले प्रभावित झाला. त्यामुळं त्यानं राष्ट्राध्यक्षांची हत्या केली. हिंकले मानसिकदृष्ट्या आजारी असल्याचं त्याच्या विकिलानं न्यायालयात सिद्ध केलं. यानंतर न्यायालयानं हिंकलेला अधिक उपचारासाठी मानसिक रुग्णालयात पाठवलं. तो तिथं 35 वर्षे राहिला. 2016 मध्ये त्याची सुटका झाली. जून 2022 मध्ये, 41 वर्षांनी, न्यायालयानं हिंकलेची पूर्णपणे निर्दोष मुक्तता केली.

'हे' वाचंलत का :

  1. 20 वर्षीय तरुणानं डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर झाडल्या गोळ्या; सीक्रेट सर्व्हिसनं केलं ठार, 52 वर्षापूर्वी.... - Donald Trump Rally Firing
  2. गोळीबारानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा विजय निश्चित? जगातील 'या' बड्या नेत्यांना ठार करण्यासाठी झाले हल्ले - Donald Trump Firing
  3. डोनाल्ड ट्रम्प यांच्या रॅलीत गोळीबार; थोडक्यात बचावले, पाहा घटनेचा व्हिडिओ - DONALD TRUMP NEWS

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.