लंडन King Charles Cancer : ब्रिटनचे राजे चार्ल्स तिसरे कर्करोगानं ग्रस्त आहेत. बकिंघम पॅलेसनं एक निवेदन जारी करून ही माहिती दिली. बकिंगहॅम पॅलेसनं जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे की, किंग चार्ल्स यांच्या प्रोस्टेट ग्रंथीची तपासणी केली असता त्यांना कर्करोग असल्याचं निष्पन्न झालं. मात्र, कर्करोगाचा प्रकार समोर आलेला नाही. हा कर्करोग कोणत्या प्रकारचा आणि शरीराच्या कोणत्या भागात आहे देखील अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
ऋषी सुनक यांचा संदेश : निवेदनात म्हटलं आहे की, किंग चार्ल्स यांना नियमित उपचारादरम्यान कर्करोग झाल्याचं निदान झालं. यामुळे डॉक्टरांनी त्यांना कोणत्याही प्रकारच्या सार्वजनिक कामापासून दूर राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. मात्र, या काळात ते सरकारी काम करत राहतील. किंग चार्ल्स कर्करोगानं ग्रस्त असल्याच्या वृत्तानंतर, ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी त्यांना लवकरात लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. ते लवकरच पूर्ण ताकदीनिशी परतेल यात मला शंका नाही, असं त्यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे म्हटलं.
वयाच्या 73 व्या वर्षी राज्याभिषेक : राणी एलिझाबेथ व्दितीय यांच्या मृत्यूनंतर, चार्ल्स तिसरे ब्रिटनचे राजे झाले. गेल्या वर्षी मे महिन्यात त्यांचा राज्याभिषेक झाला होता. तेव्हापासून त्यांना 'किंग चार्ल्स तिसरे' असं संबोधलं जातं. विशेष म्हणजे ते वयाच्या 73 व्या वर्षी राजे झाले आहेत.
विल्यम आणि हॅरी ही दोन मुलं : चार्ल्स यांचा जन्म 14 नोव्हेंबर 1948 रोजी बकिंगहॅम पॅलेस येथे झाला. जेव्हा त्यांची आई राणी एलिझाबेथ द्वितीयचा राज्याभिषेक झाला तेव्हा ते 4 वर्षांचे होते. 1969 मध्ये, वयाच्या 20 व्या वर्षी, राणीनं त्यांची कॅर्फर्नॉन कॅसल येथे 'प्रिन्स ऑफ वेल्स' म्हणून नियुक्ती केली. चार्ल्स यांनी 29 जुलै 1981 रोजी लेडी डायना स्पेन्सरशी लग्न केलं. त्यांना प्रिन्स विल्यम आणि प्रिन्स हॅरी ही दोन मुले आहेत. 28 ऑगस्ट 1996 रोजी हे लग्न तुटलं. 9 एप्रिल 2005 रोजी त्यांनी कॅमिलाशी लग्न केलं.
हे वाचलंत का :