मुंबई - 20 मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय 'हॅपिनेस डे' या नावाने जगभर साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्रांच्या सभेत 12 जुलै 2012 रोजी झालेल्या ठरावामध्ये 20 मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय 'आनंद दिन' म्हणून घोषित करण्याच्या निर्णयाला मंजूरी देण्यात आली. तेव्हापासून दरवर्षी हा दिवस आनंद आणि उत्साहात सेलेब्रिट केला जातो.
विश्व आनंद दिवसाचं महत्त्व काय आहे?
हा आनंदाचा दिवस आहे, हे नक्कीच! आनंदात राहणे ही मानवाचे मुलभूत ध्येय आहे. हे ओळखून युनायटेड नेशन्स जनरल असेंब्लीने जगातील मानवाच्या आर्थिक वृद्धीसाठी सर्वांना सामावून घेईल, न्याय आणि सर्वाना आनंद देईल अशा कल्याणकारी गोष्टींना प्रोत्साहन देण्याचे आवाहन केले आहे.
मानवी हक्कांच्या समर्थनासाठी पर्यावरणाच्या शाश्वत विकासाचे ध्येय समोर ठेवून सरकार आणि आंतरराष्ट्रीय संस्थांनी गुंतवणूक केली पाहिजे. शांतता आणि सामाजिक सुव्यवस्था राखण्यासाठी तसेच कर आकारणी, कायदेशीर संस्था आणि सार्वजनिक सेवांच्या वितरणात सरकारचा प्रभाव मानवी जीवनाच्या समाधानाशी संबंधित असायला हवा. यासाठी संयुक्त राष्ट्रसंघ कोणत्याही वयोगटातील प्रत्येक व्यक्तीला, तसेच प्रत्येक वर्ग, व्यवसाय आणि सरकारला आंतरराष्ट्रीय आनंद दिनाच्या उत्सवात सहभागी होण्यासाठी आमंत्रित करते.
आनंद हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. जीवनात असे काहीतरी शोधणे महत्वाचे आहे ज्यामुळे आपल्याला आनंद मिळू शकतो आणि आपल्या जीवनात आपल्याला प्रेरणाही मिळू शकेल. माणसात अनेक भावनांचा संचय असतो, मात्र आनंद आणि आशा हेच मानवी प्रगतीसाठी मदत कारक ठरु शकतात.
आपण करत असलेल्या अनेक गोष्टी यातून आनंद मिळवण्याने आपले उद्याचे अस्तित्व उज्वल बनू शकते. आनंद मानवी जगण्यासाठी महत्त्वपूर्ण आहे कारण त्यामुळेच आपल्याला चांगल्या भविष्यावर विश्वास ठेवण्यास मदत होते.
मानवी कल्याणाची चर्चा जेव्हाही होते ती सर्व जग सुखी आणि आनंदी बनावे हाच यामागचा प्रमुख हेतू असायला हवा. विश्व कल्याणाचा विचार करताना संत तुकारामांनी लिहिलेला, "आनंदाचे डोही आनंद तरंग । आनंदची अंग आनंदाचें ॥" हा अभंग याच उदात्त हेतूचा आहे हे जाणून घेतलं तरी या विश्वव आनंदी दिवस किंवा आंतरराष्ट्रीय हॅपिनेस डेचं मानवाच्या दृष्टीन असलेलं महत्त्व लक्षात येतं.
हेही वाचा -