मुंबई - World Environment Day 2024 : दरवर्षी 5 जून हा दिवस जगभरात जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा केला जातो. पर्यावरणाच्या संरक्षणाबाबत लोकांना जागरूक करणं खूप महत्त्वाचं आहे. निसर्गाशिवाय मानवी जीवन या पृथ्वी तलावर राहणार नाही. त्यामुळे झाडं, वनस्पती, जंगलं, नद्या, तलाव, पर्वत ,जमीन यांचं महत्त्व समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे. पर्यावरणाला सौंदर्यवान बनवायचं असले तर झाडं लावणे खूप आवश्यक आहे. जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्याचा निर्णय 1972 मध्ये संयुक्त राष्ट्र महासभेनं केला होता. जागतिक पर्यावरण परिषदेत चर्चा झाल्यानंतर, 5 जून 1974 रोजी पहिला जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात आला. दरवर्षी जागतिक पर्यावरण दिनाची एक खास थीम असते. गेल्या वर्षी ही थीम प्लास्टिक प्रदूषण उपायांवर आधारित होती.
जागतिक पर्यावरण दिनाची थीम : दरम्यान यावर्षी जागतिक पर्यावरण दिन 2024 ची थीम आहे 'आमची जमीन, आमचे भविष्य.' या अंतर्गत जमीन पुनर्संचयित करणं, वाळवंटीकरण आणि दुष्काळ या गोष्टींवर भर दिल्या जाणार आहे. आज जागतिक पर्यावरण दिनानिमित्त विविध शाळांमध्ये मुलांना पर्यावरण रक्षणाबाबत जागरूक करण्यासाठी अनेक प्रकारचे कार्यक्रम आयोजित केलं जातात. वृक्षतोड आणि वाढत्या प्रदूषणामुळे पर्यावरण प्रदूषित होत आहे. खराब हवेमुळे लोकांचा श्वास कोंडत आहे. दुषित हवामानामुळे शहरातील अनेक लोकांना श्वसन, हृदय आणि फुफ्फुसाचे आजार होत आहेत. दिवसेंदिवस ग्लोबल वार्मिंग वाढत आहे. मानवी जीवन फक्त पृथ्वीवरच शक्य आहे, म्हणून ते राहण्यायोग्य ठेवणे ही आपली जबाबदारी आहे.
पर्यावरणाचे रक्षण करा : संपूर्ण मानवजातीचं अस्तित्व निसर्गावर अवलंबून आहे. प्रदूषणापासून पर्यावरणाचे रक्षण केलं पाहिजे. पर्यावरणाचं रक्षण करून मानवाचा विकास शक्य आहे. सौरऊर्जेचा वापर वाढला पाहिजे. विनाकारण ऊर्जा वाया न घालवण्याची सवय लावायला हवी. पाण्याचा वापर देखील सांभाळून करायला पाहिजे. याशिवाय जलस्रोताना स्वच्छ ठेवायला पाहिजे. प्लास्टिकचा वापर कमीत कमी करायला हवा. कागद जपून वापरा, टॉयलेट पेपर बनवण्यासाठी दररोज 27,000 झाडं जगभर कापली जातात. त्यामुळे टॉयलेट पेपर वापरणे बंद केलं पाहिजे. वाहनांचा वापर कमीत कमी करा. शक्यतो सार्वजनिक वाहतूकीचा वापर करायला हवा.
काय केले पाहिजे
- आपण वर्षातून किमान दहा झाड लावले पाहिजे.
- तलाव, नद्या, प्रदूषित करू नका.
- वीजेचा विनाकारण वापर करू नका.
- प्लास्टिक आणि पॉलिथिनचा वापर थांबवा.
- कागद आणि कापडापासून बनवलेली पिशवींचा वापर करा.
- सायकलचा वापर करा.
- प्राण्यावर प्रेम करा, त्यांची निगा राखा.
हेही वाचा :