Superfood For diabetes Patients: भारतामध्ये मधुमेहाच्या रुग्णांनी शिखर गाठलं आहे. हा एक असा आजार आहे ज्यावर कायमस्वरूपी औषध नाही. तसंच मधुमेह आजार मुळापासून नष्ट केला जावू शकत नाही. यामुळे मधुमेहाच्या रुग्णांना खाण्यापिण्यासंबंधित अनेक पथ्य पाडावी लागतात. मधुमेह असलेल्या लोकांना रक्तातील साखरेची पातळी प्रत्येक वेळी तपासत रहावं लागते. परंतु कार्ब्स, फायबर, स्टार्च, प्रथिने, फॅट्स नसलेल्या पदार्थांचं सकाळी सेवन केल्यास मधुमेह नियंत्रणात राहू शकतो. चला तर जाणून घेऊया मधुमेही रुग्णांनी सकाळी कोणते पदार्थ खावेत जेणेकरून साखरेची पातळी नियंत्रणात राहील.
- कोंब आलेले मूंग: प्रथिनेयुक्त आहार मधुमेहाच्या रुग्णासाठी फायदेशीर आहे. तुम्ही अंकुरलेले मूंग सकाळी खावू शकता. अंकुरलेले मूंग प्रथिनांचा चांगला स्रोत आहेत. तसंच साखरेची पातळी नियंत्रीत ठेवण्याकरिता हे उपयुक्त आहेत. याच्या नियमित सेवनानं रक्तातील साखरेची पातळी कमी होते.
- कोरफड रस: मधुमेहाच्या रुग्णांसाठी कोरफडीचे ज्युस फायदेशीर आहे. हे मधुमेह बऱ्याच अंशी आटोक्यात आणतं. यात असलेले पोषक तत्वे इन्सुलिन आणि मॅग्नेशियम वाढवण्याचे काम करतात. तसंच रक्तातील ग्लुकोजची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी कोरफड ज्यूस उपयुक्त आहे. सकाळी उपाशी पोटी काही प्रमाणात कोरफडीचा रस प्यायल्यास रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते.
- मेथी पाणी: मेथीच्या दाण्यांचं पाणी मधुमेह नियंत्रित ठेवण्यासाठी फायदेशीर आहे. एक चमचा मेथीच्या बिया रात्रभर पाण्यात भिजू घाला आणि सकाळी ते पाणी प्या. सोबत मेथी दाणे चावून खा, असं केल्यास रक्तातील साखरेचे प्रमाण नियंतणात राहते.
- लिंबू आणि गरम पाणी: मधुमेह असलेल्या रुग्णांनी सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाण्यात लिंबाचा रस घालून प्यायल्यास चांगला लाभ होईल. यामुळे शरीरातील विषारी घटक बाहेर फेकले जातात. यामुळे शरीर डिटॉक्स होते. तसंच वजन कमी करणाऱ्यांसाठी हे ड्रिंक फायदेशीर आहे.
संदर्भ
https://pmc.ncbi.nlm.nih.gov/articles/PMC10384771/
(डिस्क्लेमर: ही सामान्य माहिती केवळ वाचनासाठी दिलेली आहे. ईटीव्ही भारत या माहितीच्या वैज्ञानिक मान्यतेबाबत कोणतीही पुष्टी करत नाही. अधिक माहितीसाठी डॉक्टरांकडून सल्ला घ्यावा.)