ETV Bharat / health-and-lifestyle

जागतिक रेडक्रॉस दिवस का आहे इतका महत्वाचा, घ्या जाणून - WORLD RED CROSS DAY 2024 - WORLD RED CROSS DAY 2024

World Red Cross Day 2024: आज जागतिक रेडक्रॉस दिवस जगभरात साजरा केला जात आहे. हा दिवस सर्वांसाठीचं खूप खास आहे.

World Red Cross Day 2024
जागतिक रेडक्रॉस दिवस 2024 ((फोटो आईएएनएस))
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 8, 2024, 11:34 AM IST

मुंबई - World Red Cross Day 2024: दरवर्षी आज 8 मे रोजी जागतिक रेडक्रॉस दिवस जगभरात साजरा केला जातो. हा दिवस मानवतेसाठी खूप खास आहे. रेड क्रॉस ही एक संस्था आहे आणि रेड क्रेसेंट ही एक चळवळ आहे. या संस्था एकमेकांशी जोडलेल्या आहेत. रेड क्रॉसद्वारे जगभरातील लोकांच्या मदतीसाठी काही उपक्रम केले जातात. आंतरराष्ट्रीय रेड क्रॉस आणि रेड क्रेसेंट चळवळ 1863 मध्ये सुरू झाली आणि स्विस व्यापारी हेन्री ड्युनंट यांच्याकडून प्रेरित होती. रेड क्रॉसची स्थापना हेन्री ड्युनंट यांनी केली होती.

रेडक्रॉस दिवसाचं महत्व : हेन्रीचा जन्म 8 मे 1828 रोजी जिनिव्हा, स्वित्झर्लंड येथे झाला. त्यामुळे त्यांच्या जन्मदिनानिमित्त 8 मे हा जागतिक रेडक्रॉस दिन म्हणून साजरा केला जातो. त्यांना रेडक्रॉस आणि त्याच्या अद्भुत कार्यासाठी नोबेल शांतता पारितोषिक देण्यात आले आहे. रेड क्रॉस या संस्थेची स्थापना 161 वर्षांपूर्वी म्हणजेच 1863 मध्ये झाली. आज 8 कोटींहून अधिक लोक त्याचे स्वयंसेवक आहेत. जगभरात जवळपास प्रत्येक देशात त्याच्या शाखा आहेत. हा दिवस विविध नैसर्गिक आपत्ती, युद्ध आणि इतर संकटांमुळे पीडित लोकांना मदत करणाऱ्यांना समर्पित आहे. आंतरराष्ट्रीय रेड क्रॉस संघटनेच्या निर्णयांनुसार सर्व राष्ट्रांमध्ये शांतता राखणे हा आहे.

रेडक्रॉस दिनाची थीम : जागतिक रेडक्रॉस दिन 2024 ची थीम 'मी आनंद देतो आणि जे मी आनंद देतो ते पुरस्कार आहे'. सीरियात अनेक युद्ध होतात, त्यावेळी रेड क्रॉस स्वयंसेवक पीडितांसाठी देवदूत म्हणून काम करतात. नैसर्गिक आपत्ती, सशस्त्र संघर्ष आणि वैद्यकीय सेवा, निवारा आणि अन्न यांसह इतर संकटांमुळे प्रभावित झालेल्या लोकांना रेड क्रॉस संस्था तात्काळ मदत देत असते. आपत्कालीन परिस्थितीत रेडक्रॉस संस्था काम करते. रेड क्रॉसद्वारे लसीकरण कार्यक्रम, रक्तदान, आरोग्य शिक्षण आणि रोग प्रतिबंधक यासह अनेक उपक्रम राबवल्या जातात. ही संस्था प्रथमोपचार प्रशिक्षण देखील प्रदान करते. आज या विशेष दिवशी तुम्ही देखील काही पीडित लोकांची मदत करू शकता.

हेही वाचा :

  1. बाजारात विकले जातंय भेसळयुक्त प्लास्टिकचं तांदूळ, 'या' टिप्सचा वापर करून भेसळीपासून वाचवा आरोग्य - Tips To Test Fake Rice
  2. 'जागतिक वसुंधरा दिना'निमित्त पर्यावरणाचं रक्षण करण्याची घ्या शपथ... - world earth day 2024
  3. जागतिक मालवणी भाषा दिन : मराठी भाषेचं वैभव समृद्ध करणारी 'मालवणी' भाषा - Malvani Language Day

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.