ETV Bharat / health-and-lifestyle

काळवंडलेल्या काखेमुळे परेशान आहात? हे घरगुती उपाय करून पहा - TIPS FOR DARK UNDERARMS

काळवंडलेल्या काखेमुळे पुरुषांसह महिला देखील त्रस्त आहेत. महागडे प्रोडक्ट वापरून देखील काखेचा काळपटपणा कमी होत नाही. जाणून घ्या काळपटपणा कमी करण्याचे घरगुती उपाय.

Tips for Dark Underarms
काळवंडलेली काख (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Health Team

Published : Oct 18, 2024, 12:42 PM IST

Updated : Oct 18, 2024, 3:18 PM IST

Tips for Dark Underarms: शरीराच्या इतर भागाप्रमाणेच काखेची त्वचा काळी पडते. परुषच नाही तर महिला सुद्धा या समस्येनं त्रस्त आहेत. यामुळे आवड असूनही महिलांना स्लिव्हलेस कपडे परीधान करणं टाळावं लागतं. तर अनेकांना चारचौघात खुलून हात वर करताना लाज वाटते. त्यावर उपाय म्हणून अनेक जण महागडे स्किन केअर प्रोडक्ट्स वापरतात. मात्र, पाहिजे तसा परिणाम मिळत नाही. उलट अनेकदा त्वचेवर रसायनांचा विपरीत परिणाम होण्याची शक्यता असते. परंतु, आता तुम्हाला काळवंडलेल्या काखेबद्दल काळजी करण्याची गरज नाही. कारण, काही घरगुती उपाय वापरून तुम्ही या समस्येपासून सुटका मिळवू शकता. त्यासाठी फॉलो करा या टिप्स.

  • काख काळवंडण्याची कारणं
  • त्वचेला रंग प्रदान करणाऱ्या पेशी जेव्हा नेहमीपेक्षा वेगानं वाढतात तेव्हा काख काळवंडण्याची शक्यता असते.
  • हेअर रिम्हूवरच्या सहाय्यानं काखेतील केसं वारंवार काढल्यास देखील काखेचा रंग काळा पडू शकतो.
  • शेविंग केल्यानं सुद्धा काखेचा रंग काळा पडतो.
  • काळवंडलेल्या काखेवर उपाय
  • कोरफड: अंडरआर्म्सचा काळेपणा कमी करण्यासाठी कोरफडीचा पल्प खूप उपयुक्त आहे. कोरफडीचा पल्प काखेत लावा आणि 20 मिनिटांनी धुवा. असं केल्यास ही समस्या काही दिवसातच कमी होते, असं तज्ञांचं म्हणणं आहे. "इंटरनॅशनल जर्नल ऑफ डर्मेटोलॉजी" मध्ये प्रकाशित झालेल्या एका अहवालानुसार, संशोधकांना असं आढळून आलं की, जेव्हा महिलांनी त्यांच्या काखेला दिवसातून दोनदा कोरफड जेल लावलं, तेव्हा काळे डाग कमी होतात. या संशोधनात न्यूयॉर्क येथील माउंट सिनाई स्कूल ऑफ मेडिसिनचे डॉ. डेव्हिड डब्ल्यू. टेंग यांनी सहभाग घेतला. त्याचा दावा आहे की, कोरफडीचा पल्प लावल्यानं अंडरआर्म्सचा काळेपणा कमी होतो.
  • बेकिंग सोडा: एका भांड्यात दोन चमचे बेकिंग सोडा घ्या त्यात थोडं पाणी मिसळा. ही पेस्ट काळ्या डागावर लावल्यास चांगले परिणाम मिळतील, असं तज्ञांचं म्हणणं आहे.
  • अ‍ॅपल सायडर व्हिनेगार : ही समस्या कमी करण्यासाठी एका भांड्यात दोन चमचे बेकिंग सोडा आणि अ‍ॅपल सायडर व्हिनेगर घालून चांगलं मिसळा. नंतर हे मिश्रण काळ्या डागावर लावा आणि ५ मिनिटांनी स्वच्छ करा.
  • दही आणि लिंबाचा रस: एका भांड्यात एक चमचा दही, थोडं लिंबाचा रस, चिमूटभर हळद आणि एक चमचा बेसन एकत्र करून चांगलं मिक्स करा. हे मिश्रण काखेला लावा आणि २० मिनिटांनी पाण्यानं धुवा. यामुळे काखेचा काळपटपणा काहीचा कमी करता येऊ शकतो, असा तज्ञांचा दावा आहे.
  • दररोज नारळाचं तेल लावून १५ मिनिटांनी पाण्यानं धुतल्याने चांगले परिणाम मिळतात.
  • काळ्या डागांवर दररोज लिंबू लावल्यास काही दिवसांतच समस्या कमी होईल.
  • काळ्या डागांवर बटाट्याचा रस किंवा बटाट्याचे बारीक तुकडे लावा. नंतर स्वच्छ करा.

(डिस्क्लेमर: ही सामान्य माहिती केवळ वाचनासाठी दिलेली आहे. ईटीव्ही भारत या माहितीच्या वैज्ञानिक मान्यतेबाबत कोणतीही पुष्टी करत नाही. अधिक माहितीसाठी डॉक्टरांकडून सल्ला घ्यावा.)

हेही वाचा

  1. काळवंडलेल्या मानेमुळे त्रस्त आहात? अशी करा चुटकीसरशी सुटका
  2. 'ही' लक्षणं दिसताच डॉक्टरांचा सल्ला घ्या! तुम्हालाही असू शकतो 'ब्रेन स्टोक'
  3. चमकदार चेहऱ्यासाठी वापरा भोपळ्याचा फेसपॅक; चारचौघात उठून दिसाल

Last Updated : Oct 18, 2024, 3:18 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.