Iron Rich Foods : निरोगी जीवन जगण्यासाठी शरीराल लोहाची आवश्यकता असते. आपण घेतलेल्या अन्न पदार्थांपासून व्हिटॅमिन, मिनरल्स, कॅल्शियम, फायबर आदी पोषक घटक मिळतात. परंतु, शरीरात लोहाची कमतरता भासल्यास अनेक समस्या उद्भवतात. लोहाच्या कमतरतेमुळे शरीर केवळ कमकुवतच नाही तर अशक्त देखील होतं. ऐवढंच नाही तर हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी झाल्यानं किडनीच्या अनेक समस्या उद्भवू शकतात. जर तुम्हाला या समस्येचा सामना करावा लागत असेल तर, तुमच्या आहारात काही पदार्थांचा समावेश करा. ज्यामुळे शरीरातील हिमोग्लोबिनची कमतरता दूर होईल. जाणून घेऊया लोहाची कमतरता भरून काढण्यासाठी कोणत्या पदार्थांचा आहारात समावेश करावा.
भाजलेले फुटाणे : भाजलेले फुटाणे प्रथिने, फोलेट, फॅटी अॅसिड, फायबरचे एक उत्तम स्त्रोत आहे. एक कप फुटाण्यांमध्ये 4.7 मिलीग्राम लोह असते. हे व्हिटॅमिन सी देखील प्रदान करते. भाजलेल्या फुटाण्याचे नियमित सेवन केल्यास शरीरातील लोहाची कमतरता भरून निघते. याशिवाय भाजलेल्या फुटाण्यामध्ये मॅंगनीज, तांबे आणि मॅग्नेशियम असते. मॅग्नेशियम आणि तांबे जळजळ कमी करतात. यामुळे रक्तवाहिन्यांना आराम मिळतो. तसंच भाजलेल्या हरभऱ्यामध्ये फॉस्फरस पुरेशा प्रमाणात असतो. यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहातो. भाजलेल्या फुटाण्यासोबतच वाटाणे, मसूर, राजमा, पांढरा राजमा इत्यादींमध्ये भरपूर प्रमाणात लोह असते आणि तुम्ही ते दुपारच्या जेवणातही खाऊ शकता.
डाळिंब: डाळिंबात व्हिटॅमिन के, व्हिटॅमिन सी, फायबर, पोटॅशियम आणि प्रथिने मुबलक प्रमाणात असतात. तसंच डाळिंबात व्हिटॅमिन सी भरपूर असते. अशक्तपणा दूर करण्यासाठी डॅाक्टर डांळिबाची शिफारस करतात. डाळिंबात व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते जे शरीरात लोह शोषण्यास मदत करते.
नाचणी: नाचणीमध्ये भरपूर लोह असते. जे रक्तपेशींच्या निर्मितीसाठी आणि ॲनिमियाशी लढण्यासाठी आवश्यक असते. ग्राउंड नाचणीमध्ये अंकुरलेल्या नाचणीपेक्षा जास्त लोह असते. प्रति 100 ग्रॅम नाचणीमध्ये 51 मिलीग्राम लोह असते.
अंजीर: अंजीरामध्ये भरपूर जीवनसत्त्वे आणि लोह असतं. रात्री पाण्यात अंजीर भिजू घालून ठेवा. सकाळी अंजीर खा आणि अंजीराच पाणी प्या यामुळे हिमोग्लोबिनची पातळी वाढेल.
बीट्स: बीट्समध्ये भरपूर प्रमाणात लोह असते. जे हिमोग्लोबिनची पातळी वाढवण्यास मदत करतात. अवढेच नाही तर शरीरातील अशक्तपणा टाळण्यास देखील मदत होते. लोह आहारातील फायबर, नैसर्गिक शर्करा, मॅग्नेशियम, सोडियम आणि पोटॅशियमचा समृद्ध स्रोत देखील आहे. जे आपल्या आरोग्यास सर्व बाजूंनी फायदेशीर ठरते.
(डिस्क्लेमर: ही सामान्य माहिती केवळ वाचनासाठी दिलेली आहे. ईटीव्ही भारत या माहितीच्या वैज्ञानिक मान्यतेबाबत कोणतीही पुष्टी करत नाही. अधिक माहितीसीठी डॉक्टरांकडून सल्ला घ्यावा.)