ETV Bharat / health-and-lifestyle

'ही' आहेत महाराष्ट्रातील रोमँटिक स्थळं; एकदा भेट द्याच

नवीन वर्षामध्ये तुमचाही फिरायला जाण्याचा बेत असेल तर खाली दिलेल्या ठिकणांना अवश्य भेट द्या.

BEST PLACES IN MAHARASHTRA
मराष्ट्रातील रोमँटिक ठिकाण (Etv Bharat)
author img

By ETV Bharat Lifestyle Team

Published : Nov 30, 2024, 4:57 PM IST

BEST PLACES IN MAHARASHTRA : नवीन वर्ष सुरू व्हायला अवघा एक महिना बाकी आहे. नवीन वर्षात अनेक जणांचा बाहेर फिरायला जाण्याचा प्लॉन असतो. तुम्ही देखील आपल्या जीवनसाथीसोबत एकटं वेळ घालवण्याचा विचार करत आहात काय? महाराष्ट्रातील असे काही ठिकाणं आहेत. जे नैसर्गिक साधनसंपत्तीनं समृद्ध आहेत. हे ठिकाणं नेहमी पर्यटकांना आकर्षित करतात. चला तर पाहूया महाराष्ट्रातील रोमॅंटिक पर्यटन ठिकाणं.

महाबळेश्वर : सातारा जिह्यातील महाबळेश्वर थंड हवेचं ठिकाण आहे. हे शहर मुंबई पासून 228 कि. मी. अंतरावर आहे. धबधबे, संदुर दऱ्या, निर्मळ तलावांकरिता महाबळेश्वर ओळखलं जातं. नवीन जोडप्यांसाठी हे एक रोमॅंटि स्पॅाट असून एकदा तरी भेट देण्यासारखं आहे. येथील नयनरम्य ठिकाणं आणि वातावरण मन मोहून टाकणारं आहे. याला महाराष्ट्राचं नंदनवन तसंच डोंगराची राणी म्हणून देखील ओळखलं जातं. येथील खास ठिकाणं म्हणजे, विल्सन पॉइंट, लीग्नमाला धबधबा, एलीफंट पॉइंट, वेण्णा लेक, पंचगगा मंदिर, आर्थर सीट पॉइंट, कृष्णाबाई मंदिर आदी आहेत. महाबळेश्वर निसर्गाच्या कुशीत असल्यामुळे येथे सुट्टीचा आनंद घेण्यासाठी अनेक कुटुंब येतात.

BEST PLACES IN MAHARASHTRA
महाबळेश्वर (ETV Bharat)

लोणावळा: रोमॅंटिक गेटवे तसंच आरामदायक रिसॉपर्ट शोधणाऱ्या जोडप्यांसाठी लोणावळा लोकप्रिय ठिकाणांपैकी आहे. येथील घनदाट जंगल, नयनरम्य निसर्ग, टेकड्या, किल्ले, मंत्रमुग्ध करणाऱ्या धबधबांनी वेढलेला लोणावळा आल्हाददायक आहे. लोणावळ्यावरून पाच किलोमीटर अंतरावर खंडाळा हे थंड हेवेचे ठिकाण आहे. तसंच लोणावळ्याजवळील कार्ला टेकड्यांमधील डयूक्स नोज पॉइंट ट्रॅकिंगसाठी उत्तम आहे.

BEST PLACES IN MAHARASHTRA
लोणावळा (ETV Bharat)

माथेरान: हे भारतातील सर्वात लहान हिल स्टेशन आहे. येय़े शार्लोट लेक, शिवाजीज् लॅडर, वन ट्री हिल, सनसेट पॉइंट, हनिमून हिल पॉइंट, पॅनोरमा पॉइंट, लुईसा पॉइंट, माथेरान मार्केट, अलेक्झांडर पॉइंट ही पर्यटन स्थळं आहेत. येथे विविध जातीची जवळपास 150 प्रकारचे वृक्ष आढळतात. तसंच येथील जंगलामध्ये औषधी वनस्पतीही आहेत. हे ठिकाण शांत वातावरणासाठी ओळखलं जातं. येथील शांत वातावरण मन प्रफुल्लीत करणारं आहे.

BEST PLACES IN MAHARASHTRA
माथेराण (ETV Bharat)

अलिबाग: अलिबागचं नाव घेताच आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो तो शातं आणि स्वच्छ समुद्रकिनारा. अलिबागला मिनी गोवा म्हणून देखील ओळखलं जातं. त्यासोबतच अलिबागचे सीफूड प्रसिद्ध आहेत. सेनापती सरखेल कान्होजी आंग्रे यानी हे शहर सतराव्या शतकात बसविले. अक्षी, सासवणे, मांडवा, वरसोली, रेवस, कोरलई हे समुद्रकिनारे असलेले परिसर देखील अलिबागला लागून आहेत.

लवासा : लवासा हे ठिकाण पुण्याजवळ आहे. हे ठिकाणं 7 टेकड्यांवर विस्तारलेले आहे. निर्मळ तलाव, युरोपियन शैलीतील वास्तुकला, सुंदर लॅंडस्केप याकरिता हे प्रसिद्ध आहे. ज्यांना शांत आणि चांगल्या वातावरणात रोमॅंटिक गेटवेचा आनंद घ्यायचा आहेत त्याच्यासाठी हे उत्तम ठिकाण आहे. येथील घाणागड किल्ला, टेमघर धरण, वरसगाव धरण, प्रोमेनाड भटकंतीसाठी चांगलं ठिकाण आहेत.

BEST PLACES IN MAHARASHTRA
लवासा (ETV Bharat)

हेही वाचा

  1. केरळमधील ‘हे’ सर्वोत्तम प्रेषणीय स्थळ तुम्हाला माहित आहेत का?
  2. देवभूमी उत्तराखंड टूर: IRCTC सुपर टूर पॅकेज, अगदी स्वस्त दरात!
  3. मुंबईची अद्भूत लोकल रेल्वे; तुम्हाला माहिती आहेत का 'या' गोष्टी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.