ETV Bharat / health-and-lifestyle

लठ्ठपणामुळे मानसिक आरोग्यावर परिणाम होतो? जाणून घ्या तज्ज्ञ काय म्हणतात - The Hidden Toll of Obesity

author img

By ETV Bharat Health Team

Published : Sep 5, 2024, 4:12 PM IST

The Hidden Toll of Obesity : आधुनिक आहार आणि जीवनशैलीमुळे अनेक जण लठ्ठपणाने ग्रस्त आहेत. लठ्ठपणामुळे शरीरात अनेक समस्या निर्माण होतात. लठ्ठपाणामुळे लोक चिंता करू लागतात आणि नैराश्याचे शिकार होतात. लठ्ठपाणामुळे लोकांचे मानसिक आरोग्य कशाप्रकारे बिघडत आहे, याची माहिती हैद्राबादच्या आशा हॉस्पिटलचे मानसोपचार तज्ज्ञ डॉ आलम भावना यांनी दिलीय. वाचा सविस्तर..

The Hidden Toll of Obesity
Etv Bharat (GETTY IMAGES)

हैदराबाद The Hidden Toll of Obesity : आधुनिक जीवनशैलीशी जुळवून घेणारे बहुतेक लोक लठ्ठपणाच्या समस्येनं त्रस्त आहेत. लठ्ठपणा ही सध्या आरोग्यासंबंधित भेडसावणारी मोठी समस्या आहे. केवळ भारतच नाही तर जगभरातील लोक लठ्ठपणामुळे त्रस्त आहेत. त्यामुळे अनेकजण वजन कमी करण्यासाठी धडपड करतात. लठ्ठपणामुळे मधुमेह, उच्च रक्तदाब आणि हृदयविकारासह इतर शारीरिक आरोग्य विषयक समस्या उद्भवतात. तसंच मानसिक ताण वाढतो. हैद्राबादच्या आशा हॉस्पिटलचे मानसोपचार तज्ज्ञ डॉ आलम भावना यांनी लठ्ठपणाच्या समस्येपासून मुक्ती मिळवण्यासाठी महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. जास्त वजनाचा मानसिक आरोग्यावर कसा परिणाम होतो. यामुळे मानसिक विकार, नैराश्य, चिंता आणि तणाव निर्माण होतो.

लठ्ठपणामुळे मानसिक ताण: लठ्ठपणा किंवा लठ्ठपणाची समस्या जनुकशास्त्र, जीवनशैली यासह विविध कारणांमुळे लोकांना प्रभावित करते. जास्त वजन आणि लठ्ठपणामुळे अनेक शारीरिक समस्यांना तोंड द्यावं लागते. लठ्ठपणानं ग्रस्त असलेले बरेच लोक त्यांच्या शारीरिक स्वरूपावर असमाधानी असतात. त्यामुळे त्यांचा स्वाभिमान कमी होतो आणि त्यांच्यामध्ये अपराधीपणाची भावना निर्माण होते, अशी माहिती डॉ.आलम भावना यानी दिली. फिगर बेढप झाल्यामुळे त्यांचा मानसिक ताण वाढतो. त्यामुळे ते इतरांसोबत फारसे सामंजस्य करत नाही. परिणामी त्यांच्या मानसिक ताणात आणखी भर पडते.

  • लठ्ठपणाशी संबंधित प्रमुख मानसिक समस्या
  • नैराश्य : लठ्ठपणामुळे मेंदूतील हार्मोनल संतुलन बिघडू शकते. त्यामुळे एकाग्रते संबंधित समस्या उद्भवू शकतात. तसंच निराशेची भावना निर्माण होते. सामाजिक दृष्टिकोन आणि वजनाबद्दल नकारात्मक टिपण्यामुळे देखील उदासीनता वाढते. अभ्यासात असं आढळून आलं की, लठ्ठ व्यक्तींना सरासरी वजन असलेल्या लोकांपेक्षा नैराश्याचा त्रास होण्याची शक्यता जास्त असते.
  • खाण्याचे विकार: लठ्ठ लोकांमध्ये अति खाणं सामान्य आहे. कारण नकारात्मक भावनांचा सामना करण्यासाठी ही लोक अन्न जास्त ग्रहण करतात. यामुळे अस्वास्थ्यकर पदार्थांचे अतिसेवन होते आणि वजन वाढते.
  • चिंता: लठ्ठपणा आणि चिंता यांचा जवळचा संबंध आहे. चिंतेमुळे आपण जास्त खावू शकतो.
  • व्यसन: व्यसनाच्या आहारी गेलेल्या लोकांना लठ्ठपणाचा त्रास होतो. अल्कोहोल आणि मादक पदार्थांच्या सेवनामुळे वजन वाढणे आणि आरोग्य समस्या निर्माण होतात.

उपचारात्मक उपाय काय आहेत? डॉ. भावना यावर याच्या मते, लठ्ठपणाचे प्रभावीपणे व्यवस्थापन करण्यासाठी मानसिक आरोग्य समस्यांचे निराकरण करणे महत्त्वाचे आहे. यासाठी खालील उपाय करा.

  • समुपदेशन: समुपदेशनात सहभागी होण्याने व्यक्तींना त्यांचा तणाव आणि अनुभव एक्सप्लोर करण्यात मदत होते. यामुळे आत्मविश्वास आणि भावनिक लवचिकता वाढते.
  • संज्ञानात्मक वर्तणूक थेरपी (CBT): CBT व्यक्तींना नकारात्मक विचारांच्या पद्धती सकारात्मक विचारांमध्ये बदलण्यास मदत करू शकते. अस्वास्थ्यकर वर्तन बदलण्यासाठी देखील फायदेशीर आहे.
  • औषधोपचार: काही प्रकरणांमध्ये, नैराश्य आणि चिंता कमी करण्यासाठी अँटीडिप्रेसंट औषधे (उदा. एस्किटलोप्रॅम आणि बुप्रोपियन) लिहून दिली जाऊ शकतात. व्यसनाधीन लोकांसाठी, naltrexone आणि bupropion सारखी औषधे भूक कमी करण्यास मदत करू शकतात.
  • जीवनशैलीत बदल: मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी जीवनशैलीत बदल करणे महत्त्वाचे आहे, असं डॉ. आलम भावना यांनी सांगितलं.
  • नियमित व्यायाम: शारीरिक हालचालींमुळे एंडोर्फिनची पातळी वाढू शकते. यामुळे तुमचा मूड सुधारू शकतो आणि तणाव कमी होवू शकतो.
  • योग आणि ध्यान: नियमित ध्यान केल्यास तुम्ही मानसिकदृष्टा चांगले राहू शकते.

माफक प्रमाणात खाणे : अन्न सेवनाचे निरीक्षण करणे. जास्त खाण्याच्या भावनिक ट्रिगरकडे लक्ष देणे. यामुळे वजन नियंत्रित करण्यास आणि मानसिक आरोग्य सुधारण्यास मदत होते. डॉ. भावनाच्या मते, आरोग्य आणि तंदुरुस्त राहण्यासाठी शारीरिक आणि मानसिक दोन्ही पैलूं जबाबदार आहेत.

(डिस्क्लेमर: ही सामान्य माहिती केवळ वाचनासाठी दिलेली आहे. ईटीव्ही भारत या माहितीच्या वैज्ञानिक मान्यतेबाबत कोणतीही पुष्टी करत नाही. अधिक माहितीसीठी डॉक्टरांकडून सल्ला घ्यावा.)

हेही वाचा

  1. वयानुसार कसा आणि किती करावा व्यायाम ? कोणता आहे हाडं मजबूत करणारा व्यायाम, जाणून घ्या - How Does It Improve Bone Health
  2. फक्त अन्नच नाही, पोटाची चरबी वाढण्यामागं 'ही’ आहेत मुख्य कारणं - Causes For Belly Fat

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.