Diwali Makeup Hacks: दिवाळी हा एक दिवसाचा सण नसून कमीत कमी आठवडाभर चालणारा उत्सव आहे. दिवाळी हा केवळ दिव्यांचा आणि आनंदाचा सण नाही तर कुटुंब आणि मित्रांसोबत वेळ घालवण्याचाही सण आहे. अशा परिस्थितीत प्रत्येकाला, विशेषत: महिलांना त्यांचा चेहरा उजळलेला आणि आकर्षक दिसावा, असं वाटते. परंतु सण-उत्सवाची धांदल, बदलती जीनशैली, खाण्यापिण्याच्या अयोग्य सवयी आणि त्वचेची काळजी न घेल्यामुळे ऐन सणासुदीच्या काळात चेहऱ्यावरची चमक कमी होऊ लागते. अशा परिस्थिती सणाची तयारी करताना त्वचेची काळजी घेणं फार महत्वाचं आहे.
- काय म्हणतात डॉक्टर: त्वचा रोग तज्ञ डॉ. आशा सकलानी याच्या मते, दिवाळीच्या सणात फटाक्यांचा धूर तसंच इतर कारणांमुळे होणारं प्रदूषण, मेकअपचा दीर्घकाळ वापर तसंच गोड किंवा तळलेले पदार्थ खाल्यामुळे अनेकांना त्वचेसंबंधित समस्या उद्भवतात. असा परिस्थितीमध्ये त्वचा स्वच्छ आणि चमकदार ठेवणे आव्हानात्मक असते. परंतु तुम्ही त्वचेच्या काळजीसंबंधित आवश्यक डाएटबरोबर डीप क्लीनिंग, हायड्रेशन आणि मेकअप रिमूव्हिंगची काळजी घेतल्यास त्वचेची चमक आणि सौंदर्य केवळ दिवाळीतच नाही तर त्यानंतरही टिकून राहू शकते.
- त्वचेची काळजी कशी घ्यावी: डॉ. आशा सकलानी याच्या मते, कामाच्या गर्दीत त्वचेची निगा राखणे खूप महत्वाचे आहे. यासोबतच मेकअप काढणे, कमीत कमी केमिकल्स, चांगल्या दर्जाची उत्पादने वापरणे यासारख्या मेकअप संबंधित खबरदारीला प्राधान्य देणे गरजेचे आहे. या काळात आहाराकडे देखील लक्ष दिलं पाहिजे तेलकट पदार्थांच्या सेवनामुळे देखील त्वचेसंबंधित समस्या उद्भवतात.
- आठवड्यातून एकदा स्क्रबः आठवड्यातून एकदा स्क्रब वापरा जेणेकरून त्वचेच्या मृत पेशी काढून टाकल्या जातील. स्क्रब केल्यानंतर त्वचेला मॉइश्चरायझर लावण्यास विसरू नका. याशिवाय, तुम्ही बाहेरून घरी आल्यानंतर त्वचेवरील मेकअप, धूळ आणि प्रदूषणाचे कण काढून टाकण्यासाठी डीप क्लीनिंग करा. यासाठी चांगल्या मेकअप क्लिनिंग ऑइल किंवा क्रीम तसेच फेस वॉश देखील वापरता येईल.
- हायड्रेशनची काळजी घ्या: त्वचा हायड्रेट ठेवण्यासाठी पुरेसे पाणी प्या आणि दिवसातून दोनदा मॉइश्चरायझर वापरा. यामुळे त्वचा मऊ आणि कोमल राहते.
- फेस पॅक वापरा: त्वचेला सुट होणारा फेस पॅक चेहरा आणि मानेला लावा. बेसन, दही आणि हळद यांचे मिश्रण यासारखे घरगुती फेस पॅक देखील त्वचा उजळण्यास मदत करतात. यामुळे त्वचेला नैसर्गिक चमक येते.
- सनस्क्रीन लावा: दिवाळीच्या खरेदीसाठी अनेक वेळा बाहेर जावं लागते. सूर्याच्या हानिकारक किरणांपासून त्वचा सुरक्षित राहावी याकरिता सनस्क्रीन वापरा.
- डोळ्यांची काळजी घ्या: मेकअप आणि कमी झोप यामुळे डोळ्याखाली डार्क सर्कल येतात. डार्क सर्कल कमी करण्यासाठी बदामाचे तेल किंवा काकडीचा रस डोळ्याभोवती लावा. याशिवाय आजकाल बाजारात चांगल्या दर्जाचे आय पॅकही उपलब्ध आहेत जे वापरता येतात.
(डिस्क्लेमर: ही सामान्य माहिती केवळ वाचनासाठी दिलेली आहे. ईटीव्ही भारत या माहितीच्या वैज्ञानिक मान्यतेबाबत कोणतीही पुष्टी करत नाही.)