मुंबई-safety tips in rain मुंबईत बेकायदेशीर असलेले महाकाय होर्डिंग कोसळून १४ जणांचा मृत्यू झाला. अशा दुर्घटनेपासून संरक्षण करण्यासाठी पावसाळ्यात होर्डिंगपासून विशेषत: तुटलेल्या किंवा होर्डिंगचे अँगल भक्कम नसतील तर त्यापासून लांब राहा. होर्डिंग तुटण्याच्या स्थितीत असल्यास त्याची माहिती प्रशासनाला किंवा संबंधित यंत्रणेला कळवा.
- मुसळधार पाऊस सुरू असताना उंच भागात किंवा झाडांजवळ थांबणं टाळा. रस्त्यावर पाणी तुंबण्याची शक्यता असते. अशा परिस्थितीत गाडीत अडकून पडणं टाळण्यासाठी सुरक्षित ठिकाणी जाऊन थांबा.
- काही इमारती प्रशासनाकडून धोकादायक असल्याचे जाहीर होते. अशा इमारतीच्या जवळ थांबण्याचं टाळा.
- कार किंवा दुचाकी चालविताना अथवा पावसाळ्यात रस्त्यावरून चालताना मॅनहोल असण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी मॅनहोवर झाकण लावलेले नसते. मॅनहोल पाण्यात असताना डोळ्यांना दिसत नाही. त्यामुळे तुंबलेल्या पाण्यातून जाणं टाळा.
- वाळलेली, जुनी झाडे ही पावसानं तसेच वादळानं अचानक कोसळू शकतात. तेव्हा रस्त्यानं चालताना सतर्क राहा. जर धोकादायक स्थिती दिसली तर वेळीच स्वत:ची काळजी घ्या.
विद्युत खांबापासून सुरक्षा
- मुसळधार पावसात विद्युत खांबाच्या वायर तुटू शकतात. त्यातून विद्युत प्रवाह वाहू शकतो. अशा स्थितीत विद्युत खांबापासून सुरक्षित अंतर ठेवा. विद्युत खांबाला स्पर्श करू नका. विद्युत खांबातून विद्युत प्रवाह वाहत असेल तर इतरांनाही सतर्क करा.
- विजांचा गडगडाट होताना वीज कोसळण्याची सर्वाधिक शक्यता असते. झाडाखाली थांबू नका. स्वत:जवळील मोबाईल बंद करून ठेवा.
- शक्यतो पावसात हवामानाची स्थिती चांगली होईपर्यंत घरी थांबा.
- आपत्कालीन स्थितीत पोलीस, रुग्णवाहिका, महापालिका आणि अग्नीशमन दलाचे टोल फ्री क्रमांक मोबाईलच्या संपर्क यादीत जोडा.
- वीज पुरवठा खंडित होण्याची शक्यता लक्षात घेऊन मोबाईल चार्जिंग करून ठेवा.
- वीजेचा गडगडाट, वादळ आणि मुसळधार पाऊस असताना सुरक्षेला सर्वाधिक प्राधान्य द्या.
- हवामानाचा अंदाज किंवा इशारा याबाबत अपडेट माहिती घ्या. पुराच्या ठिकाणी जाण्याचे टाळा.
- वाहन चालवताना वेग मर्यादित ठेवा. चारचाकीचे हेडलाईट सुरू ठेवा. तसेच वायपर वापरा. बॅटरी, पिण्याचं पाणी आणि प्रथमोपचार पेटी जवळ ठेवा.
हेही वाचा-