हैदराबाद Potato Health Benefits : बटाटा हा अनेकांच्या आवडत्या भाज्यांपैकी एक आहे. भारतामध्ये प्रत्येकाच्या किचनमध्ये बटाटे सर्वाधिक वापरलं जातं. याला भाज्यांचा राजा देखील म्हटलं जातं. परंतु भारतातच नव्हे तर, अमेरिकेत देखील सर्वात लोकप्रिय भाज्यांपैकी बटाटा एक आहे. बटाट्याची भाजी असली की लहान मुलांची औरच मजा असते. मुलं व्यवस्थित जेवतात. परंतु बटाट्याच्या आरोग्यदायी फायद्यांबाबत आपल्यामध्ये अनेक गैरसमज आहेत. कारण बटाट्यामध्ये कार्बोहायड्रेट्स आणि स्टार्चचे प्रमाण जास्त असते. परंतु यूसी डेविल हेल्थ डायटेटिक इंटर्न एड्रिएन पॉसनरने केलेल्या अभ्यासानुसार बटाटे आरोग्यासाठी फायदेशीर आहेत.
- बटाट्याचे प्रकार
- फिंगरलिंग बटाटे : लहान, बोथट, बोटाच्या आकाराचे बटाटे. हे बटाटे तळण्यासाठी आणि भाजण्यासाठी उत्तम प्रकारे वापरले जावू शकतात.
- रसेट बटाटे : हे अंडाकृती आकाराचे असतात. गडद तपकिरी पोत असलेले मोठे बटाटे
- गोड बटाटा (रताळे) : एक मोठा बटाटा (रताळे) चमकदार नारिंगी पोत ज्याला गोड चव असते.
- पांढरे आणि लाल बटाटे : हा कमी साखरेचा बटाटा आहे. यामध्ये मध्यम स्टार्च असतात. यावर पांढऱ्या किंवा लाल रंगाची पोत असते. तळणे, उकळणे आणि वाफाळण्यासाठी सर्वोत्तम आहेत.
- जांभळा बटाटा : जांभळ्या-काळ्या त्वचेचा आणि जांभळा, अंडाकृती आकाराचा बटाटा मुख्यता ग्रिलिंग आणि बेकिंगसाठी वापरला जातो.
- बटाट्याचे आरोग्यदायी फायदे
- पचनास चांगलं : जर तुम्हाला पचनासंबंधित समस्या असेल बटाट्याचे सेवन करा यामुळे गॅस किंवा पोटदुखीचा त्रास होत नाही. बटाट्यामध्ये व्हिटॅमिन बी पुरेशा प्रमाणात असतो. त्यामुळे गॅसच्या समस्येपासून तुम्हाला आराम मिळू शकते.
- रोगप्रतिकार शक्ती वाढते : बटाट्यामध्ये व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात आढळते. व्हिटॅमिन सी मुळे रोगप्रतिकार शक्ती मजबूत होते. तसंच बटाट्यामध्ये असलेले फायबर आणि अँटिऑक्सिडंट गुणधर्म रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यास मदत करतात.
- वजन नियंत्रित राहते : बटाटे खाल्ल्याने लठ्ठपणा वाढतो असं अनेक लोक मानतात. परंतु बाटाट्यामध्ये फायबरचे प्रमाण चांगले असते. यामुळे बटाटं खाल्ल्यास लवकर भूक लागत नाही.
- हृदयाचे कार्य सुलभ करते : बटाट्यामध्ये पोटॅशियमचे प्रमाण जास्त असते. हृदयाचे कार्य सुरळीत होण्यासाठी हे खूप फायदेशीर आहे. कोणत्याही प्रकारचे हृदयविकार किंवा मूत्रपिंडाचे आजार असलेल्या लोकांमध्ये सीरम पोटॅशियमची पातळी जास्त असल्यास बटाटे खाणं हानिकारक ठरू शकते.
- हाडांसाठी चांगला : बटाट्यामध्ये कॅल्शियम आणि कार्बोहायड्रेट्सचे आढळतात. यामुळे बटाटे खाणं हाडांसाठी फायदेशीर आहे. तुम्हाला तुमची हाडे मजबूत करायचे असतील तर बटाट्याचा आहारात समावेश करू शकता.
- मधुमेहींनी बटाटं खाणं चागलं आहे का? जर तुम्हाला मधुमेह असेल तर बटाटे खाणं टाळणे चांगलं. 70 पेक्षा जास्त ग्लायसेमिक इंडेक्स असल्यामुळे, बटाटे मधुमेहींच्या आरोग्यावर विपरित परिणाम करू शकतात. परंतु जर रक्ताची पातळी नियंत्रणात असेल तर थोड्या प्रमाणात (50 ग्रॅम) बटाटं खावू शकता.
- जास्त सेवन ठरू शकते हानिकारक : बटाट्याचे अति प्रमाणात सेवन करणे आरोग्यासाठी हानिकारक आहे. जास्त अधिक खाल्ल्याने वजन वाढते. बटाट्यामध्ये कार्बोहायड्रेट्स जास्त प्रमाणात आसतात. यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढते आणि मधुमेहाचा धोका वाढतो. तसंच बटाट्याच्या अति सेवनामुळे पोटॅशियमची पातळी वाढते. यामुळे हायपरक्लेमियाचा धोका वाढतो. त्यामुळे उलट्या होणे, धाप लागणे अशा समस्या निर्माण होतात.
यात दिलेली माहिती https://health.ucdavis.edu/blog/good-food/potato-health-benefits-and-why-you-should-eat-more-spuds/2022/05 या वेबसाईट वरून घेतली आहे.
(डिस्क्लेमर: ही सामान्य माहिती केवळ वाचनासाठी दिलेली आहे. ईटीव्ही भारत या माहितीच्या वैज्ञानिक मान्यतेबाबत कोणतीही पुष्टी करत नाही. अधिक माहितीसीठी डॉक्टरांकडून सल्ला घ्यावा. )