ETV Bharat / health-and-lifestyle

'जागतिक रंगभूमी दिना'निमित्त जपू मराठी रंगभूमीचा समृद्ध वारसा - World Theater Day 2024 - WORLD THEATER DAY 2024

World Theater Day 2024 : आज 27 मार्च रोजी जगभर 'जागतिक रंगभूमी दिन' साजरा केला जातो. मराठी माणसाचं रंगभूमीवरील प्रेम सर्वश्रुत आहे. इथे सातत्यानं नवनवीन प्रयोग केले जातात. मराठी रंगभूमीला समृद्ध वारसा लाभलाय. हा वारसा जपणाऱ्या रंगकर्मी आणि नाट्यरसिकांना रंगभूमी दिनानिमित्त शुभेच्छा देऊ या.

World Theater Day 2024
जागतिक रंगभूमी दिन 2024
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 27, 2024, 1:43 PM IST

Updated : Mar 27, 2024, 3:01 PM IST

मुंबई - World Theater Day 2024 : 27 मार्च हा दिवस 'जागतिक रंगभूमी दिन' म्हणून साजरा केला जातो. 1961 मध्ये पहिल्यांदा युनेस्कोच्या इंटरनॅशनल थिएटर इन्स्टिट्यूटने हा दिवस साजरा करायला सुरुवात केली. तेव्हापासून दरवर्षी हा दिवस जगभरातील रंगकर्मी आवर्जून हा दिवस साजरा करतात.

जागतिक रंगभूमीवर अनेक प्रयोग होत असताना मराठी रंगभूमीही त्याबाबतीत अजिबात मागे नाही. भारतीय रंगभूमीमध्ये सर्वाधिक लोकप्रिय नाटकाची परंपरा मराठीमध्ये अखंडपणे सुरू आहे. महाराष्ट्रातल्या रंगभूमीवर वैविध्यपूर्ण विषयांची दीर्घ परंपरा आहे. नाशिक येथील गुहेतील शिलालेखांमध्ये सातवाहन शासक गौतमीपुत्र सातकर्णी यांची आई गौतमी बालश्री यांच्या नाटकाचा एक प्रारंभिक संदर्भ सापडतो. मराठी रंगभूमीला जवळ जवळ 170 हूनही जास्त वर्षांची परंपरा आहे. 1843 ला नाटकाला डोक्यावर घेतलेल्या प्रेक्षकानं आजही ही रंगभूमी प्रयोगशील ठेवली आहे. 19 व्या शतकाच्या मध्यापासून सुरू झालेला मराठी रंगभूमीचा प्रवासाची 1950 आणि 1960 च्या दशकात भरभराट झाली. स्वातंत्र्योत्तर काळात बंगाली, कन्नड आणि मराठी रंगभूमीवर अनेक प्रयोग झाले आणि नाट्यकलेनं आघाडी घेतली आहे.

मराठीमध्ये सुरुवातीला पौराणिक कथावंर आधारित नाटकांची निर्मिती झाली. सांगलीमध्ये विष्णूदास भावे यांनी 'सीता स्वयंवर' हे नाटक मराठी रंगभूमीवर सादर केलं. 1880 मध्ये अण्णासाहेब किर्लोस्करांच्या 'संगीत शाकुंतल' या कालिदासाच्या अभिज्ञानकुंतलम् या कलाकृतीवर आधारित मराठी रंगमंचाने एक वेगळे रंगभूमीचे रूप धारण केलं. त्यांच्या नाटय़संस्थेच्या यशाने किर्लोस्कर नाट्यमंडळी मराठी रंगभूमीवर व्यावसायिक पुनरावृत्तीचा मार्ग मोकळा झाला आणि त्यानंतर नाटक कंपन्यांची निर्मिती झाली.

मराठी रंगभूमीच्या सुरुवातीच्या काळात कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर, गोविंद बल्लाळ देवल, राम गणेश गडकरी आणि अण्णासाहेब किर्लोस्कर या नाटककारांचं वर्चस्व होतं. संगीत नाटकांनी मराठी रसिकांच्या मनात खूप मोठं स्थान मिळवलं. याच काळात बाल गंधर्व, केशवराव भोळे, भाऊराव कोल्हटकर, मास्टर दीनानाथ मंगेशकर यांच्यासारखे दिग्गज गायक-अभिनेता रंगभूमीवर घडले.

मराठी रंगभूमी समृद्ध होत असताना तमाशा आणि दशावतार या पारंपरिक लोककलांनीही आपला वारसा निर्माण केला. मराठी रंगभूमी मोठी करण्यात अनेक दिग्गज नाटककार, दिग्दर्शक आणि कलाकारांचं मोठं योगदान आहे. आजही मराठी माणसाचं पहिलं प्रेम नाटकच राहिलं आहे. आज 'जागतिक रंगभूमी दिना'चं महत्त्व समजून घेत असताना नाटक हे एक असं माध्यम आहे, जिथं जिवंत माणसं जिवंत माणसांशी संवाद साधत असतात. नाटक ही एक जिवंत कला आहे. ते सांस्कृतिक अभिसरणाचं प्रभावी माध्यम आहे. जिवंत माणसे एकाच कालखंडात जगत असतात. त्यामुळे त्या त्या काळातल्या माणसांबरोबर त्या त्या काळातल्या प्रश्नांची, विचारांची देवाण घेवाण नाटकाच्या माध्यमातून प्रभावीपणे केली जाते. नाटकाचा प्रत्येक प्रयोग हा पहिल्यापेक्षा वेगळा असतो. प्रत्येकवेळी एका नाविन्याचा प्रत्यय प्रत्यय येतो. म्हणून नाटकाचा 'शो' नाही तर 'प्रयोग' असतो. दरवेळी प्रेक्षकांना नाटकातून काही तरी नवीन गवसत असतं. नाटकाला अभिव्यक्तीचं सर्वात प्रभावी माध्यम मानलं जातं. आजच्या या दिवशी सर्व प्रयोग करणाऱ्या रंगकर्मींना जागतिक रंगभूमी दिनाच्या शुभेच्छा देऊया.

हेही वाचा -

जगभरात आज साजरा केला जातोय 'जागतिक जल दिन', काय आहे या 'जीवनाचं' महत्त्व? - world water day 2024

World Happiness Day:विश्व आनंद दिवस 2024 : चराचरात आनंद पसरवण्याचा दिवस

Summer tips for skin : तुमची त्वचा आणि केस उष्णतेच्या लाटेपासून वाचवायचे असतील तर या टिप्स जरुर वापरा

Last Updated : Mar 27, 2024, 3:01 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.