National Ayurveda Day 2024: दरवर्षी 29 ऑक्टोबर रोजी आयुर्वेद दिवस साजरा करण्यात येतो. यंदा जगभरातील 150 पेक्षा जास्त देश आयुर्वेद दिवस साजरा करणार आहेत. सन 2016 पासून धन्वंतरी जयंती (धनत्रयोदशीच्या) मुहूर्तावर आयुर्वेद दिवस साजरा केला जातो. यानिमित्तानं आयुष मंत्रालय नवी दिल्ली येथील ऑल इंडिया इन्सिट्यूट ऑफ आयुर्वेद येथे विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. आयुर्वेद दिनाच्या निमित्तानं जाणून घेऊया गुडघेदुखी आणि हाडाच्या वेदना कमी करण्यासाठी उपयुक्त घरगुती उयाय.
- यंदाची थीम: दरवर्षी वेगवेगळ्या थीमवर नॅशनल आयुर्वेद डे साजरा केला जातो. जागतिक आरोग्यासाठी आयुर्वेद नवकल्पना ही यंदाच्या आयुर्वेद दिनाची थिम आहे.
गुडघेदुघखी ही एक सामान्य समस्या झाली आहे. व्हिटॅमिन डी, आर्यन आणि कॅल्शियमच्या कमतरतेमुळे तसंच वाढत्या वयोमानामुळे स्नायू आणि टिश्यूचे नुकसान होते. परिणामी गुडघेदुखाची समस्या उद्भवते. गुडघेदुखीवर आयुर्वद तज्ञ डॉ. गायत्री देवी यांनी काही उपाय सांगितले आहेत.
- गुळवेल किंवा गिलोय: गुळवेल सांधेदुखीवर उपयुक्त ठरू शकते. सांधेदुखीच्या आणि गुडघ्याच्या असाहाय्य वेदना कमी करण्यासाठी गुळवेलीचा रस पिण्याचा सल्ला डॉक्टर देतात. गुळवेलीमध्ये अॅंटिइंफ्लेमेटरी आणि संधिवाताविरोधी गुणधर्म आहेत. जे संधिवात कमी करण्यासाठी फायदेशीर आहे. तुम्ही गुळवेल पावडर कोमट दुधासोबत घेवू शकता. यामुळे सांधेदुखीची समस्या दूर होईल.
- लिंबू: गुडेघेदुखीवर लिंबाचा रस अत्यंत फायदेशीर आहे. लिंबाच्या रसामध्ये सायट्रिक अॅसिड शरीरातील यूरिक अॅसिड कमी करते. यामधील अॅंटीइंफ्लेमटरी गुणधर्म शरीराची वेदना, जळजळ आणि सूज कमी करण्यास मदत करतात. गडघेदुखी कमी करण्याठी लिंबाची साल गरम तिळाच्या तेलात भिजवून गुडघ्यावर ठेवल्यास तुम्हाला आराम मिळू शकतो.
- आलं: गुडघेदुखी, सांधेदुखी किंवा स्यायूंमधील ताण कमी करण्यासाठी आलं उत्तम आहे. यामध्ये अॅंटिअल्सर, अॅंटिऑक्सिडट्स आणि अॅंटीइंफ्लेमेट्री गुणधर्म असतात. जे रोगप्रतिकार शक्ती मजबूत करण्यासाठी फायदेशीर आहेत. तुम्ही आल्याचा चहा किंवा आल्याचं पाणी पिऊ शकता. किंवा आल्याची पेस्ट बनवून वेदना होणाऱ्या जागी लावल्यास वेदना कमी होवू शकतात.
- हिरव्या पालेभाज्या: ब्रोकोली आणि कोबी सारख्या हिरव्या पालेभाज्यांचा आहारात समावेश करा. यामुळे शरीरात सूज आणणारे अन्झाइम्स कमी होतात. परिणामी हाडं मजबूत होण्यासाठी रोजच्या आहारात पालेभाज्यांचा समावेश करा.
- फळं: ब्लू बेरी, स्ट्रॉबेरी, चेरी आणि संत्री यासारख्या फळांमध्ये लायकोपीन आणि व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात आढळतात. ज्यामुळे हाडांची सूज कमी होण्यास मदत होते.
(डिस्क्लेमर: ही सामान्य माहिती केवळ वाचनासाठी दिलेली आहे. ईटीव्ही भारत या माहितीच्या वैज्ञानिक मान्यतेबाबत कोणतीही पुष्टी करत नाही. अधिक माहितीसाठी डॉक्टरांकडून सल्ला घ्यावा.)