हैदराबाद, Menopause and heart disease : रजोनिवृत्ती म्हणजे मेनोपॉज थोडक्यात सांगायचं झालं तर मासिक पाळीचा शेवटचा टप्पा. साधारणपणे प्रत्येक महिलेची पाळी वयाच्या 45 ते 50 दरम्यान थांबते. मात्र, बदलत्या लाईफस्टाइलमुळे हल्ली 35 वर्षामध्येच महिलांची मासिक पाळी पूर्णपणे बंद होत आहे. एखाद्या महिलेला 12 महिने पीरियड्स नाही आलेत तर ती महिला मनोपॉजपर्यंत म्हणजेच रजोनिवृत्तीपर्यंत पोहचली,असं म्हटलं जातं. मेनोपॉजच्या काळात महिलांमधील इस्ट्रोजेन, प्रोजेस्टेरॉन तसंच टेस्टोस्टेरॉन हार्मोन्सची पातळी कमी होण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे रिप्रॉडक्टिव्ह प्रक्रिया बंद होते. मेनोपॉज ही एक नैसर्गिक बायोलॉजिकल प्रोसेस असली तरी त्याचे संकेत आणि लक्षणं आधीपासूनच दिसू लागतात. परंतु एका संशोधनात असं आढळून आलं की, रजोनिवृत्तीच्या कालावधीत महिलांच्या हृदयाच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. परिणामी हृदयविकाराचा धोका वाढू शकतो.
संशोधन काय सांगते : यूकेमध्ये आयोजित ईएससी कॉंग्रेस ( ESC Congress) 2024 मध्ये ( 30ऑगस्ट ते 2 सप्टेंबर) सादर केलेल्या नवीन संशोधनात असं समोर आलं की, महिलांच्या एकूण मृत्यूंपैकी 40 टक्के मृत्यू हे हृदयविकारानं झालेत.
रजोनिवृत्तीनंतर हृदयविकाराचा धोका का वाढतो? - युनिव्हर्सिटी ऑफ टेक्सास साउथवेस्टर्न मेडिकल सेंटर, यूएस 2015 मध्ये झालेल्या एका अभ्यासाच्या लेखिका डॉ. स्टेफनी मोरेनो यांच्या मते, रजोनिवृत्तीनंतर महिलांमध्ये हृदयविकाराचा धोका जास्त असतो. कारण या काळात त्यांच्या शरीरात अनेक हार्मोनल बदल होतात. रजोनिवृत्तीनंतर एस्ट्रोजन हार्मोन कमी होत जातो. रजोनिवृत्तीपूर्वी शरीरात एस्ट्रोजन अधिक असतो. त्यामुळे धमण्यांना धोका पोहोचत नाही. परंतु शरीरात एस्ट्रोजन कमी प्रमाणात असलं तर महिला सुरक्षिततेची हमीही कमी होते. ज्यामध्ये कोरोनरी आर्टरी डिसीजसारख्या समस्यांचा समावेश आहे.
हृदय आणि रक्तवाहिन्यासंबंधी रोग (CVD) हे स्त्रियांच्या मृत्यूचे प्रमुख कारण आहे. महिलांमध्ये होणाऱ्या एकूण मृत्यूंपैकी 40 टक्के मृत्यू सीव्हीडीमुळे होतो. स्त्रियांना हृदय आणि रक्तवाहिन्यासंबंधी आजार (CVD) पुरुषांपेक्षा दहा वर्षांनंतर विकसित होतात. परंतु स्त्रियांना CVD होण्याची शक्यता कमी असते. रजोनिवृत्तीनंतर धोका वाढतो.
स्त्री आणि पुरुष दोघांवर अभ्यास : हा अभ्यास 1346 पुरुष आणि 1246 महिलांवर करण्यात आला. पुरुषांच वय सरासरी 43 वर्षे होतं तर महिला तीन गटात विभाजित करण्यात आल्या होत्या. मेनोपॉजचे तीन गट आहेत. त्यातील पेरी गटासाठी 42 वर्षे, पोस्ट गटासाठी 54 वर्षे आणि प्री गटासाठी 34 वर्षे होतं. एकूण स्त्रियांपैकी 440 (35%) प्री-मेनोपॉझल, 298 (24%) पेरी-मेनोपॉझल आणि 508 (41%) पोस्ट-मेनोपॉझल होतं.
एलडीएल-पी (LDL-P) मध्ये वाढ : 7 वर्षांच्या सरासरी पाठपुराव्याच्या कालावधीत, तीनही महिला गटांमध्ये एलडीएल-पी (LDL-P) मध्ये वाढ झाली होती. परंतु पेरी आणि पोस्ट गटांमध्ये सर्वाधिक टक्केवारीतील बदल 8.3 टक्के आढळून आलं. पुरुषांच्या तुलनेत, उपचारानंतरच्या गटामध्ये एचडीएल-पीमध्ये 4.8 टक्के नकारात्मक बदलासह सर्वात जास्त टक्केवारी बदल होता.
पुरुषांच्या तुलनेत पेरी-ग्रुपमध्ये लहान-सघन एलडीएलमध्ये 213 टक्क्यांच्या बदलासह मोठ्या टक्केवारीत बदल झाला. हे टक्केवारीतील बदल पूर्व आणि रजोनिवृत्तीनंतरच्या दोन्ही गटांपेक्षा 15 टक्के जास्त आहे.
तज्ञ काय म्हणतात : डॉ. मोरेनो म्हणाले की, रजोनिवृत्तीनंतर महिलांच्या लिपोप्रोटीन प्रोफाइलमध्ये लक्षणीय आणि प्रतिकूल बदल झाले आहेत. त्यापैकी सर्वात प्रमुख म्हणजे एलडीएल कणांमध्ये वाढ त्यामुळे हे बदल रजोनिवृत्तीनंतरच्या स्त्रियांमध्ये हृदयविकाराच्या वाढीचे स्पष्टीकरण करण्यास मदत करू शकतात.
- रजोनिवृत्तीची सर्वसामान्य लक्षणं
- हेवी ब्लिडिंग
- अनियमित मासिक पाळी
- झोपे संबंधित अडचणी
- रात्री घाम येणे
- हॉट प्लशेस
- सांधेदुखी
- अशक्तपणा
- थकवा
- भावनिक बदल
- मेनोपॉज स्टेज
- पेरीमेनोपॉज : महिलांमध्ये साधारणपणे 47 व्या वर्षी ही स्टेज निर्माण होते. यात मासिक पाळी अनियमित होते. परंतु पूर्ण बंद होत नाही. यात हॉट प्लॅशेसचं लक्षणं दिसून येतं तरीसुद्धा महिला गर्भधारणा करू शकतात.
- मेनोपॉज : म्हणजे मासिक पाळी पूर्ण बंद होणे.
- पोस्टमेनोपॉज : म्हणजे शेवटची पाळी येणे
यात दिलेली माहिती European Society Of Cardiology या वेबसाईट वरून घेतली आहे
(डिस्क्लेमर: ही सामान्य माहिती केवळ वाचनासाठी दिलेली आहे. ईटीव्ही भारत या माहितीच्या वैज्ञानिक मान्यतेबाबत कोणतीही पुष्टी करत नाही. अधिक माहितीसीठी डॉक्टरांकडून सल्ला घ्यावा. )