Health Benefits Of Green Beans : विविध भाज्यांमध्ये शरीरास आवश्यक विविध घटकांचा समावेश असतो. पूर्वी हंगाम असला तरच या भाज्या उपलब्ध व्हायच्या. आता मात्र, कोणत्याही ऋतुमध्ये त्या उपलब्ध होतात. त्यापैकीच एक आहे फरसबी. डोळे आणि हृदय निरोगी ठेवण्यासाठी फरसबीच्या शेंगा उपयुक्त आहेत. याबात अधिक जाणून घेऊया.
तज्ज्ञांच्या मते, बिन्स ही पौष्टिक भाजी आहे. या बिन्सचे विविध प्रकार आहेत. यामध्ये व्हिटॅमिन ए, सी आणि के असतं. तसंच बीन्स फॉलिक अॅसिड आणि कॅल्शियमचं चांगले स्त्रोत आहे. त्यात भरपूर फायबर देखील असतं हे खाल्ल्यानं पचनसंस्था निरोगी राहते आणि अनेक आरोग्यदायी फायदे होतात. ग्रीन बीन्स म्हणजेच फरसबीमध्ये प्लेवोनॉइड्स असतं.
शरीराला ऊर्जा देते: यामध्ये भरपूर लोह असतं. यामुळे अशक्तपणा, थकवा आदी समस्या दूर होतात. फरसबी खाल्ल्यानं शरीरात लाल रक्तपेशी निर्माण होण्यास मदत होते. तसंच चयापचय वाढवण्यासाठी आहारात बिन्सचा समावेश करू शकता.
हाडांचं आरोग्य: बिन्समध्ये व्हिटॅमिन के, ए आणि कॅल्शियम मुबलक प्रमाणात असतात. हे सर्व व्हिटॅमिन्स हाडं निरोगी ठेवण्यास मदत करतात. जर तुम्हाला सांधेदुखीचा त्रास होत असेल किंवा ती बळकट करायची असतील तर फरसबिन्स तुमच्यासाठी उत्तम पर्याय असू शकतो.
हृदयाचं आरोग्य: बिन्समध्ये कॅल्शियम आणि फ्लेव्होनॉइड्स भरपूर प्रमाणात असतात. फ्लेव्होनॉइड्स हे पॉलीफेनॉलिक अँटिऑक्सिडंट आहे. जे सामान्यतः फळं आणि भाज्यांमध्ये आढळतात. यामुळे हृदयाचं आरोग्य सुधारण्यास मदत होते. तसंच रक्ताच्या गुठळ्या होण्यास प्रतिबंध करतात.
डोळ्यांसाठी फायदेशीर: कॅरोटीनॉइड समृद्ध बीन्स डोळ्यांसाठी चांगलं असतात. तुम्हाला डोळे निरोगी ठेवायचे असतील तर बिन्सचा समावेश आहारात करा. फरसबी ल्युटीन आणि झेक्सॅन्थिननं समृद्ध असतात. यामुळे दृष्टी सुधारण्यास मदत होते.
त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर: पोषक तत्वांनी समृद्ध, बीन्स निरोगी त्वचा आणि केसांसाठी चांगले आहे. याशिवाय हे नखे मजबूत ठेवण्यासाठी मदत करते. तुम्ही नियमितपणे बिन्स खाल्लं तर ते आरोग्यासाठी फायदेशीर आहे.
NIH नुसार , उच्च रक्तदाब, रक्तातील कोलेस्टेरॉल, मधुमेह आणि लठ्ठपणा हे हृदयविकारासाठी कारणीभूत आहेत. अनेक अभ्यासकांनी वनस्पती-आधारित आहार पद्धती, तसेच विशिष्ट अन्नपदार्थ आणि घटकांचा शोध लावला आहे. ज्यामुळे कार्डिओमेटाबॉलिक रोग प्रतिबंध, संरक्षण आणि पूर्ववत करण्यामध्ये मुख्य पोषक घटकांची भूमिका ओळखली जाते.
एका राष्ट्रीय सर्वेक्षणात 2000 हून अधिक प्रौढांचा अभ्यास करण्यात आला अभ्यासातून असं दिसून आलं की, बिन्स हृदय आणि रक्तवाहिन्यासंबंधी, चयापचय आणि गॅस्ट्रोइंटेस्टाइनल आरोग्य सुधारण्यास मदत करते.
संदर्भ
https://www.ncbi.nlm.nih.gov/pmc/articles/PMC7915747/
https://nutritionsource.hsph.harvard.edu/legumes-pulses/
(डिस्क्लेमर: ही सामान्य माहिती केवळ वाचनासाठी दिलेली आहे. ईटीव्ही भारत या माहितीच्या वैज्ञानिक मान्यतेबाबत कोणतीही पुष्टी करत नाही. अधिक माहितीसीठी डॉक्टरांकडून सल्ला घ्यावा.)