TIPS TO SLEEP BETTER AT NIGHT: निरोगी जीवन जगण्याकरिता झोप आवश्यक आहे. पुरेशा प्रमाणात झोप न घेतल्यास अनेक आजारांचा शिरकाव शरीरामध्ये होवू शकतो. तसंच योग्य प्रमाणात झोप न घेणे जीवघेणे देखील ठरू शकते. तज्ञ म्हणतात की, व्यक्तीने दिवसातून किमान 7 ते 9 तास झोपलं पाहिजे. परंतु बहुतेक लोकांना त्यांच्या व्यस्त जीवन पद्धतीमुळे पुरेशी झोप मिळत नाही. झोप न येण्यामागे अनेक कारणं देखील असू शकता. यामुळे हृदयरोग, किडनीचे आजार, उच्च रक्तदाब, मधुमेह, स्ट्रोक, लठ्ठपणा आणि नैराश्य यासह अनेक आरोग्य समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे पुरेशी झोप गरजेची आहे. यामुळे रात्री चांगली झोप येण्यासाठी काही गोष्टी लक्षात ठेवाव्यात.
- मध्यम अन्न: झोपण्यापूर्वी जास्त खाऊ नका. याचा झोपेवर परिणाम होऊ शकतो. झोपण्याच्या दोन ते तीन तासा पूर्वी माफक प्रमाणातच खावं. यामुळे तुम्हाला चांगली झोप येईल.
- नियमित व्यायाम करा: सुदृढ जीवन जगण्याकरिता व्यायाम मोठी भूमिका बजावते. शारीरिक आरोग्यासोबतच मानसिक आरोग्य राखण्यासाठीही व्यायाम चांगला पर्याय आहे. झोपेशी संबंधित समस्यांवरही व्यायाम हा एक उत्तम मार्ग आहे. नियमित व्यायाम केल्यानं तुम्हाला चांगली झोप येण्यास मदत होईल.
- तणाव कमी करा: तणावामध्ये कित्येकांना चांगली झोप येत नाही. तणाव हा झोपेचा अडथळा आहे. तणावग्रस्त व्यक्तीच्या शरीरात स्ट्रेस हार्मोन्स तयार होतात. हे झोपेमध्ये व्यत्यय आणू शकते. त्यामुळे चांगली झोप येण्यासाठी तणाव कमी करणे महत्त्वाचे आहे.
- वेळेवर झोपा: झोपण्याची योग्य वेळ ठरवणे महत्त्वाचे आहे. हे तुम्हाला झोप येण्यास मदत करेल.
- मोबाईलचा अतिवापर: मोबाईलच्या अतिवापरामुळे निद्रानाशाची समस्या होवू शकते. यामुळे रात्री झोपण्यापूर्वी फोन वापरण्याची सवय टाळा.
- कॉफी टाळा: झोपण्यापूर्वी कॉफी पिणे टाळा. कॉफी हे एक चांगले पेय आहे जे शरीराला ऊर्जा देण्यास मदत करते. हे तुम्हाला जागृत राहण्यास आणि झोपेवर परिणाम करण्यास मदत करू शकते. त्यामुळे झोपण्यापूर्वी दोन ते तीन तास आधी कॉफी पिणे टाळा.
- चरबीयुक्त पदार्थ टाळा: रात्री तळलेले आणि चरबीयुक्त पदार्थ टाळा. मसालेदार पदार्थ टाळणे देखील चांगले. यामुळे तुम्हाला चांगली झोप येण्यास मदत होईल.
(डिस्क्लेमर: ही सामान्य माहिती केवळ वाचनासाठी दिलेली आहे. ईटीव्ही भारत या माहितीच्या वैज्ञानिक मान्यतेबाबत कोणतीही पुष्टी करत नाही. अधिक माहितीसाठी डॉक्टरांकडून सल्ला घ्यावा.)
हेही वाचा