Mosambi Juice: मोसंबी अनेक आरोग्यवर्धक पोषक घटकांनी समृद्ध आहे. मोसंबीच्या ज्यूसामध्ये व्हिटॅमिन सी, फायबर, पोटॅशियम, झिंक, आयर्न आणि अँटिऑक्सिडंट्स पुरेशा प्रमाणात आढळतात. मोसंबीच्या सेवनामुळं शरीरात पोषक घटकांची कमतरता भासत नाही. थकवा दूर करण्यासाठी मोसंबी उत्तम पर्याय आहे. यामुळं रोगप्रतिकराशक्ती वाढते. यकृताच्या अनेक समस्यांवर मोसंबी रामबाण आहे. एवढेच नव्हे तर त्वचा आणि केसांसंबंधित समस्या देखील दूर करण्यासाठी मोसंबी फायदेशीर आहे.
- पोटाच्या समस्या दूर: मोसंबीमध्ये असलेल्या फ्लेव्होनॉइड्समुळे पचनक्रिया सुरळीत होते. तसंच बद्धकोष्ठतेची समस्या देखील दूर होते. पचनक्रिया संबंधित समस्यावर उपचार करण्यासाठी मोसंबीच्या रसामध्ये चिमूटभर मीठ घालून प्यावं.
- डोळ्यांसाठी उपयुक्त: मोसंबीच्या रसामध्ये अँटिऑक्सिडंट्स गुणधर्म आढळतात. यामुळं डोळ्यांच्या समस्या दूर होतात. यात असलेले अँटिबॅक्टेरियल आणि अँटिबॅक्टेरियल आणि गुणधर्म मॅक्युलर डिजेनेरेशन आणि डोळ्यांचं संक्रमण टाळण्यासाठी फायदेशीर आहेत.
- कर्करोगाचा धोका कमी: मोसंबीमध्ये असलेल्या पोषक घटाकांमुळं कर्करोगापासून बचाव होवू शकतो. तसंच कर्करोगाच्या पेशंची वाढ थांबवण्यात देखील मोसंबी लाभदायक आहे.
- त्वचेसाठी फायदेशीर: नियमित मोसंबी ज्यूस प्यायल्यास चेहऱ्यावरील काळे डाग कमी होतात आणि चेहऱ्याचा रंग उजाळतो.
- हाडांचं आरोग्य सुधारतं: मोसंबी ज्यूसमध्ये आढळणाऱ्या पोषक घटकांमुळं हाडांचं आरोग्य सुरक्षित राहतं. तसंच ऑस्टियो आणि संधिवाताचा त्रास होण्यापासून संरक्षण मिळतं.
- केसांसाठी उपयुक्त: मोसंबीमध्ये पुरेशा प्रमाणात जीवनसत्व आढळतात. यामुळं केस गळतीची समस्या दूर होते. शिवाय केसांची वाढ होण्यासाठी देखील मोसंबी ज्यूस उपयुक्त आहे. याचबरोबर केसांमधील फाटे आणि कोंड्यावर मोसंबी रामबाण उपाय आहे.
संदर्भ
https://www.jpmhh.org/html-article/14193
(डिस्क्लेमर: ही सामान्य माहिती केवळ वाचनासाठी दिलेली आहे. ईटीव्ही भारत या माहितीच्या वैज्ञानिक मान्यतेबाबत कोणतीही पुष्टी करत नाही. अधिक माहितीसीठी डॉक्टरांकडून सल्ला घ्यावा.)
हेही वाचा