ETV Bharat / health-and-lifestyle

आकारानं लहान दिसणारा ‘हे’ फळ आहे आरोग्यवर्धक - IS IT GOOD TO DRINK LEMON DAILY

लिंबू व्हिटॅमिन सी आणि अँटिऑक्सिडंट्सचा समृद्ध स्रोत आहे. चला जाणून घेऊया रोज लिंबू खाण्याचे आरोग्यदायी फायदे.

Is It Good To Drink Lemon Daily
लिंबू खाण्याचे फायदे (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Health Team

Published : Oct 29, 2024, 5:30 PM IST

Updated : Oct 29, 2024, 5:36 PM IST

Is It Good To Drink Lemon Daily: आकारानं लहान असला तरी लिंबू हे पोषक घटकांचे पॉवरहाऊस आहे. नियमित लिंबू सेवन केल्यानं आरोग्यविषयक अनेक फायदे मिळतात. लिंबू व्हिटॅमिन सी ने समृद्ध आहे. यामध्ये अँटिऑक्सिडंट्स भरपूर असतात. यामुळे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होण्यास मदत होते. लिंबूमुळे पचनक्रिया सुधारते. तसंच वजन नियंत्रित ठेवण्यासाठी आणि त्वचेसंबंधित आरोग्य सुधारण्यासाठी लिंबू फायदेशीर आहे. केसांची काळजी घेण्यासाठीही देखील लिंबू खूप फायदेशीर आहे. चला जाणून घेऊया लिंबू खाण्याचे आरोग्यदायी फायदे.

  • हृदयाचे आरोग्य सुधारते: लिंबूमध्ये व्हिटॅमिन सी आणि वनस्पती संयुगे असतात. जे उच्च रक्तदाब आणि कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी चांगले आहेत. रक्तवाहिन्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी आणि रक्तवाहिन्यांमधील अडथळे रोखण्यासाठी लिंबू सेवन करणं चांगलं आहे. लिंबू सेवनानं हृदय आणि रक्तवाहिन्यासंबंधी आजारांचा धोकाही कमी होतो. यामुळे लिंबूचा आहारात समावेश करा.
  • पचन सुधारते: लिंबू पाचन समस्यांवरील सर्वात प्रभावी उपायांपैकी एक आहे. जर तुम्हाला अपचन आणि बद्धकोष्ठता सारख्या समस्यांचा सामना करावा लागत असेल तर तुमच्या आहारात लिंबू घ्या. यामुळे पचनाच्या समस्या, पोटदुखी, छातीत जळजळ इत्यादीपासून मुक्ती मिळण्यास मदत होते. पचनक्रिया सुधारण्यासाठी लिंबूचे नियमित सेवन फायदेशीर ठरते.
  • वजन कमी करण्यासाठी: लिंबूमध्ये खूप कमी कॅलरीज असतात. तसंच पुरेशा प्रमाणात फायबर देखील आढळतात. हे भूक नियंत्रित करण्यास मदत करते आणि अन्नाची लालसा कमी करण्यासाठी देखील फायदेशीर आहे. जेवणापूर्वी लिंबू पाणी प्यायल्यास वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते.
  • किडनी स्टोन: लिंबूमध्ये सायट्रेटचे प्रमाण जास्त असते. जे किडनी स्टोन तयार होण्यास प्रतिबंध करते. त्यामुळे नियमित लिंबू पाणी प्यायल्यानं किडनी स्टोनचा धोका कमी होतो.
  • त्वचेचं आरोग्य सुधारते: लिंबूमध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स त्वचेचं फ्री रॅडिकल्सपासून संरक्षण करतात. हे सुरकुत्या कमी करण्यास आणि जखमा भरूण काढण्यास देखील मदत करते. तसंच तारुण्य टिकवून ठेवण्यासाठीही लिंबू फायदेशीर आहे.
  • केसांची काळजी: केसांचे आरोग्य राखण्यासाठीही लिंबू फायदेशीर आहे. लिंबाचा रस टाळूवर लावल्यास कोंडा आणि केस गळती यासारख्या समस्यांपासून सुटका मिळते. हे केसांना नैसर्गिक चमक प्रदान करते. परंतु, केसांना लिंबू लावताना काळजी घेणं गरजेचं आहे. केसांना लिंबू कमी प्रमाणात लावलं पाहिजे.
  • प्रतिकारशक्ती वाढवते: लिंबूमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. जे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यास मदत करते. सर्दी आणि फ्लूचा धोका कमी करण्यासाठी देखील हे चांगलं आहे.

संदर्भ

https://interscience.org.uk/v3-i1/8-ijahm.pdf

(डिस्क्लेमर: ही सामान्य माहिती केवळ वाचनासाठी दिलेली आहे. ईटीव्ही भारत या माहितीच्या वैज्ञानिक मान्यतेबाबत कोणतीही पुष्टी करत नाही. अधिक माहितीसाठी डॉक्टरांकडून सल्ला घ्यावा.)

हेही वाचा

  1. कॉफी की ग्रीन टी? आरोग्यासाठी काय जास्त फायदेशीर
  2. फक्त डोळ्यांसाठीचं नाही तर अनेक आजारांवर रामबाण आहे ‘हे’ मूळ

Last Updated : Oct 29, 2024, 5:36 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.