Health Benefits Of Carrot: गाजराचा हलवा खायला सर्वांना आवडतं. हिवाळ्यात गाजराचा हंगाम असतो. अशात गाजराचा हलवा हमखास तयार केला जातो. हंगामी गाजर खाण्यात जी मजा आहे ती मजा इतर ऋतूंमधील गारज खाण्यात नाही. गाजराशिवाय सॅलड तयार होतच नाही. एवढेच नाही तर कच्चे गाजर खाण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. गाजरामध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन के, पोटॅशियम, कॅल्शियम आणि लोह यासारखे अनेक आवश्यक पोषक घटक असतात. यामध्ये असलेल्या फायबरमुळे पचनक्रिया सुरळीत होते. तसंच बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते. यामध्ये आढळणारं व्हिटॅमिन ए डोळ्यांच्या दृष्टीसाठी खूप फायदेशीर आहे. जाणून घ्या कच्चे गाजर खाण्याचे आरोग्यदायी फायदे.
- दृष्टी सुधारते: गाजर हे व्हिटॅमिन ए चे उत्कृष्ट स्रोत आहे. व्हिटॅमिन ए डोळयातील पडदा मजबूत करण्यास मदत करते. यामुळे कमी प्रकाशात पाहण्याची क्षमता सुधारते. गाजरांमध्ये बीटा-कॅरोटीन सारखे शक्तिशाली अँटिऑक्सिडंट असतात. जे डोळ्यांना ऑक्सिडेटिव्ह तणावापासून वाचवतात आणि मोतीबिंदूचा धोका कमी करतात.
- रक्तदाब नियंत्रित: कच्च्या गाजरमध्ये पोटॅशियम भरपूर प्रमाणात असते. पोटॅशियम शरीरातील सोडियमचे प्रमाण संतुलित ठेवण्यास मदत करते. सोडियम रक्तदाब वाढवण्याचं काम करते. याशिवाय कच्च्या गाजरामध्ये फायबरचं प्रमाण मुबलक असते. फायबर पचनक्रिया सुधारते आणि शरीरातील कोलेस्टेरॉलची पातळी कमी करते. ज्यामुळे हृदयविकार आणि उच्च रक्तदाबाचा धोका कमी होतो.
- रोगप्रतिकारक शक्ती मजबूत: कच्चे गाजर आणि त्यांचा ज्युस रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्याचा नैसर्गिक मार्ग आहे. दररोज गाजर सेवन केल्यानं शरीराला आवश्यक पोषक तत्वं मिळतात. ज्यामुळे रोगाशी लढण्याची क्षमता वाढते. यातील जीवनसत्त्वे आणि पोषक घटक रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करतात आणि आपल्याला निरोगी ठेवतात.
- वजन कमी करण्यासाठी फायदेशीर: कच्च्या गाजराचा ज्युस केवळ वजन कमी करण्यातच मदत करत नाही, तर तुमचे आरोग्यही अनेक प्रकारे सुधारते. यामध्ये असलेल्या फायबरमुळे पोट जास्त काळ भरलेलं असतं. ज्यामुळे तुम्हाला पुन्हा पुन्हा खाण्याची इच्छा होत नाही. त्यात कॅलरी देखील खूप कमी आहे. त्यामुळे तुम्ही कोणत्याही समस्येशिवाय वजन कमी करू शकता.
- कोलेस्ट्रॉल नियंत्रित: गाजराचा रस प्यायल्यानं वजन कमी होण्यास मदत होतेच शिवाय हृदय निरोगी राहते. यामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स खराब कोलेस्टेरॉलची पातळी कमी करून हृदयविकाराचा धोका कमी करतात. तसंच, कच्च्या गाजरमध्ये असलेले पोटॅशियम, रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत करते. जे निरोगी हृदयासाठी खूप महत्वाचे आहे. हार्वर्ड हेल्थ पब्लिशिंगच्या मते, गाजराचे अनेक फायदे आहेत.
संदर्भ
https://www.health.harvard.edu/staying-healthy/the-pros-and-cons-of-root-vegetables
(डिस्क्लेमर: ही सामान्य माहिती केवळ वाचनासाठी दिलेली आहे. ईटीव्ही भारत या माहितीच्या वैज्ञानिक मान्यतेबाबत कोणतीही पुष्टी करत नाही. अधिक माहितीसाठी डॉक्टरांकडून सल्ला घ्यावा.)
हेही वाचा