ETV Bharat / health-and-lifestyle

आजच लावा हे 'एप्रिल फुल'चं रोप, एप्रिल महिन्यातच उमलणारं 'एप्रिल फुल' !! - April flower - APRIL FLOWER

April Fool Day 2024: एप्रिल महिन्यात एप्रिल लिली हे फुल जन्माला येत असतं. हे लिलीचं फुलं खूप आकर्षक आहे. अनेकांना लिली फुलांचा मोह होतो. आज या 'एप्रिल फूल'च्या दिवशी लिलीचं झाड लावून हा दिवस साजरा करा.

April flowers
'एप्रिल फुल'चं रोप,
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 1, 2024, 12:21 PM IST

मुंबई - April Fool Day 2024: प्रत्येकानं त्यांच्या लहानपणी एकदा तरी 'एप्रिल फुल बनाया' गाणं गायलं असेल. या गाण्याचा उल्लेख करत आहोत कारण आज 1 एप्रिल आहे. 1 एप्रिलला अनेकजण एप्रिल फूल डे साजरा करतात. या दिवशी अनेकजण आपल्या ओळखीच्या एखाद्याला मुर्ख बनवण्याचा प्रयत्न करतात. त्यांचे प्रयत्न पूर्ण झाल्यावर ते आनंदानं त्याला 'एप्रिल फूल' म्हणतात आणि हा दिवस साजरा करतात. या वेगवान जीवनात, वर्षातील हा एक दिवस तुमचा तणाव दूर ठेवण्यासाठी साजरा केला जातो. वर्षभर लोक या दिवसाची वाट पाहत असतात. दरम्यान आज आपण एप्रिल महिन्यात उमलणाऱ्या फुलबद्दल समजून घेणारआहोत, ज्याचं नाव एप्रिल फुल. या फुलाला एप्रिल लिली असंही म्हणतात.

एप्रिल लिली विविध रंगामध्ये येते : हे फुल खूप आकर्षक असते. या फुलांना विविध रंग असतात. जंगलात आणि डोंगराळ प्रदेशातील गवताळ मैदानात हे फुल पाहायला मिळतं. एप्रिल महिन्यात ही फुले बहरतात. या महिन्यामध्ये तुम्ही ही फुले पाहू शकता. या फुलांचा बुकेमध्ये देखील वापर केला जातो. एप्रिलमध्ये उमलणारं हे फुल खूप खास आहे. लिली कोणत्याही बागेत सुगंध दरवळते. अनेकांना लिली फुलं आवडते. योग्यरित्या लागवड केल्यास कमीतकमी काळजी घेतल्यानंतर ही फुले 'एप्रिलमध्ये बहरतात. 'एप्रिल फूल' फुलदाणीमध्ये नेत्रसुखद दिसतात. लिली हे फुल लिलियम वंशातील आहेत.

एप्रिल लिलीच्या प्रजाती : ओरिएंटल्स, ओरिएनपेट्स, आणि एशियाटिक प्रजातींच्या प्रकारांसह अनेक लोकप्रिय लिली प्रजाती अस्तित्वात आहेत. लीली फुल हे उंच टोकाला लागतं, त्यामुळे लवकरच दिसून येतं. युरोप, उत्तर अमेरिका आणि आशिया खंडामध्ये लिली वाढतात. दरम्यान, अनेक ठिकाणी 100 पेक्षा जास्त प्रजातीची लागवड केली जात आहे. दरम्यान आज एप्रिल फूल आहे. तुम्ही आज हे फुल घेऊन हा दिवस खूप सुंदर प्रकारे साजरा करून शकता. याशिवाय तुम्ही आज या विशेष दिवसाला एप्रिल लिलीचं झाड लावून तुमच्या घराची शोभा वाढवू शकता.

हेही वाचा :

  1. अजय देवगण आणि आर माधवन अभिनीत चित्रपट 'शैतान' लवकरच होणार ओटीटीवर रिलीज - shaitaan Movie
  2. अमिताभ बच्चनला आठवला धोकादायक स्टंट्स, ना सुरक्षा कवच ना व्हिएफएक्स - Amitabh Bachchan dangerous stunts
  3. बोनी कपूरनं 'नो एंट्री'च्या सीक्वलची केली घोषणा ; 'मिस्टर इंडिया'बद्दल केला खुलासा - Boney Kapoor

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.