Rasmalai Recipe: बहुतांश घरी दिवाळी-दसऱ्यासारख्या मोठ्या सणांची लगबग सुरू झाली आहे. अशात प्रत्येककडं गोड मेजवानीचा खास बेत असतो. मात्र, अशा सणांमध्ये बाजारात भेसळयुक्त मिठाईचा बोल-बाला असतो. दरम्यान आपण भेसळयुक्त मिठाई खाणं टाळतो. यामुळे अनेक प्रकारचे गोड पदार्थ खाण्याचा आनंद आपल्याला लुटता येत नाही. मात्र, आता काळजी करू नका. कारण, आम्ही तुम्हाला स्वादिष्ट सरमलाईची सिंपल आणि भेसळमुक्त रेसिपी सांगणार आहोत. घरच्या घरी तयार करून तुम्ही या सणांचा गोडवा वाढवू शकता.
रसमलाई बंगाली स्वीट असून ती दुधापासून तयार केली जाते. या पदार्थाचा पोत मऊ आणि तोंडात वितळणारा असतो. चला जाणून घेऊया हा गोड पदार्थ कसा तयार करावा.
रसमलाई तयार करण्यासाठी लागणारे साहित्य
- दूध - 1 लिटर
- लिंबाचा रस - 2 टीस्पून
- रसमलाईच्या रसासाठी लागणारे साहित्य
- दूध - अर्धा लिटर
- साखर - 7 टीस्पून
- वेलची पावडर - एक चमचा
- केशर - चिमूटभर
- पिस्ता- 2 चमचे
- बदामाचे तुकडे - 2 टेस्पून
- पिवळा खाद्य रंग - एक टीस्पून
साखरेच्या पाकासाठी लागणारे साहित्य
- साखर - दीड कप (350 ग्रॅम)
- पाणी - 4 कप
कृती
- सर्वप्रथम एका पातेल्यामध्ये 1 लिटर दूध घ्या. दूध चांगलं उकळा.
- यानंतर गॅस बंद करा. दूध थंड होईपर्यंत थांबा. आता दूधामध्ये लिंबाच रस घालून दूध नासवून घ्या. लक्षात ठेवा गरम दूधामध्ये लिंबाच रस घातल्यास रसमलाई मऊ होत नाही.
- आता नासलेलं दूध पुन्हा गॅसवर ठेवा आणि ते पूर्णपणे दह्यासाराखं होईपर्यंत गरम करा.
- दूध आणि पाणी वेगळं झाल्यावर गॅस बंद करा आणि एक कप साधं पाणी घाला.
- पातळ सुती कापड घेऊन एका रिकाम्या भांड्यात दूध गाळून घ्या. नंतर कपड्यांवरील नासलेल्या दुधाच्या लगद्यात पाणी घालून दोनदा धुवून घ्या. यामुळे लिंबाचा आंबटपणा निघून जाईल. यानंतर तो लगदा कापडात घट्ट बांधून तास भर टांगून ठेवा. असं केल्यास त्यातील पाणी निघून जाईल.
- कपड्यातील पूर्ण पाणी निघाल्यानंतर एक मिक्सिंग बाऊल घ्या त्यात तयार झालेला लगदा बारीक वाटून घ्या. त्यानंतर त्यापासून लहान आकाराचे गोळे तयार करा आणि हलके दाबून घ्या. तयार केलेले गोळे बाजूला ठेवा.
- आता सारखेचा पाक तयार करण्यासाठी गॅसवर एक पातीलं ठेवा. त्यात साखर आणि पाणी घाला आणि उकळी येईपर्यंत चांगलं शिजवा.
- यानंतर तयार केलेले दूधाचे गोळे सारखरेच्या पाकामध्ये घाला आणि 20 मिनिटं चांगले शिजू द्या.
- आता गॅसवर एक पॅन ठेवा आणि दूध गरम करा. दूध तापायला लागल्यावर त्यात साखर, वेलची पावडर आणि केशर टाकून एकदा मिक्स करा.
- यानंतर त्यात बारीक चिरलेल्या पिस्त्या आणि बदामाचे तुकडे घालून दूध 6 ते 7 मिनिटे उकळा. दूध पिवळे होण्यासाठी पिवळा फूड कलर घाला.
- आता गॅस मध्यम आचेवर ठेवा आणि दूध थोडं घट्ट होईलपर्यंत उकळा. उकळल्यानंतर गॅस बंद करा आणि मिश्रण थंड होऊ द्या.
- एका भांड्यात बर्फाचे तुकडे घ्या आणि त्यात अर्धा चमचा साखर घाला. त्यानंतर त्यात साखरेच पाक आणि दूधाचे गोळे घाला. असं केल्यास रसमलाईचे गोळे मऊ होतात आणि लवकर थंड होतात.
- तयार झालेली रसमलाई लगेच खावू नका. हे मिश्रण किमान 4 ते 5 तास रेफ्रिजरेटरमध्ये ठेवा नंतर सर्व्हिंग बाऊलमध्ये काढून सर्व्ह करा. अशा प्रकारे तयार आहे तुमची रसमलाई.
(डिस्क्लेमर: ही सामान्य माहिती केवळ वाचनासाठी दिलेली आहे. ईटीव्ही भारत या माहितीच्या वैज्ञानिक मान्यतेबाबत कोणतीही पुष्टी करत नाही. अधिक माहितीसीठी डॉक्टरांकडून सल्ला घ्यावा.)